‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जेव्हा किशोर कुमार यांच्या मागे सलील चौधरी छडी घेवून धावले…
संगीतकार सलील चौधरी आणि किशोर कुमार हे तसं ‘रेअर कॉम्बिनेशन’ होतं. अगदी या दोघांची लोकप्रिय गाणी काढायला गेलं, तर दोन्ही हातांची बोटे पुरे पडतील. पण ज्या ज्या वेळी एकत्र आले त्या त्या वेळी त्यांनी अप्रतिम गाणी रसिकांसाठी सादर केली.
या जोडीची छोटा सा घर होगा (नौकरी), मुन्ना बडा प्यारा अम्मी का दुलारा (मुसाफिर), चिल चिल चिल्लाके (हाफ तिकीट) ही गाणी पटकन आठवतात. किशोर कुमार यांनी सलील दांकडे काही बंगाली गाणी देखील गायली आहेत. या दोघांच्या एका गाण्याचा किस्सा खूप मजेदार आहे. (Untold story of Kishor Kumar and Salil Chowdhury)
१९७२ साली ‘अन्नदाता’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन असित सेन यांनी केले होते. गाणी योगेश यांनी लिहिली होती, तर संगीत सलील चौधरी यांच्या होते. (याच काळात सलील चौधरी आणि योगेश हेच कॉम्बिनेशन ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ करीता देखील होते. असीत सेन आणि ऋषिकेश मुखर्जी दोघेही ‘बिमल रॉय’ स्कूलचे विद्यार्थी. त्यामुळे अन्नदाता चित्रपटातील आणखी एका गाण्याचा भन्नाट किस्सा आहे. तो पुन्हा कधीतरी!)
या चित्रपटातील एका गाण्यासाठी किशोर कुमार यांना सलील दांनी बोलावले. आधी किशोरच्या खास शैलीमधील ‘ओ मेरी प्राण सजनी चंपावती आजा’ हे गाणं रेकॉर्ड झालं. नंतर सलील दा म्हणाले “किशोरदा, आपको इस फिल्म का और एक गाना गाना है.” (Untold story of Kishor Kumar and Salil Chowdhury)
दुसऱ्या दिवशी जेव्हा किशोर कुमार रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले त्यावेळी सलील चौधरींनी त्यांच्या दुसऱ्या गाण्याची धून त्याला ऐकून दाखवली. ही धून ऐकता ऐकता एकदम किशोर कुमार पटकन एका खुर्चीमध्ये बसले आणि ज्यावेळी धून संपली त्यावेळी डोक्याला हात लावून ते चक्क जमिनीवर खाली बसले.
संगीतकार सलीलने विचारले, “किशोरदा, ये अचानक क्या हुआ?” त्यावर किशोर कुमार म्हणाले, “सलीलदा आपकी ये धून बहुत कठिन है, ये गाना नही ग सकूंगा.” सलील दांना किशोरजींचे नखरे माहित असल्याने ते म्हणाले, “दादा तुमने इससे कठीण धून वाले गाने बडी अच्छी तरह से गाये है. ये तो बहुत आसान है.” पण किशोर कुमार काही ऐकायला तयार होईनात. तरी सलील दांनी त्यांना दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला यायला सांगितले. (Untold story of Kishor Kumar and Salil Chowdhury)
दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर कुमार रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले आणि सलील दांना म्हणाले, “दादा कल रात मैने एक सपना देखा. जानते हो क्या देखा?” हे ऐकून सलील दांसोबत आता इतर वादक देखील त्याची स्टोरी ऐकायला आले.
किशोर कुमार म्हणाले, “मैने सपने मे देखा तुम्हारे गाने कि कल कि धून मेरा पीछा कर रही है और मै जान बचा कर उससे दूर भाग रहा हूं. मै आगे धून पीछे, मै आगे धून पीछे. मैने तंग आकर कहा मै ये गाना नही गा सकता. बहुत कठीन है. फिर भी तुम्हारी धून मेरा पीछा नही छोड रही थी. इसलिये मै कल सपने मे भाग रहा था.”
सलिल दांना किशोर यांची ही स्टाईल माहीत होती. रात्रीच्या स्वप्नाची गोष्ट सांगता सांगता किशोर कुमार खरोखरच तिथून पळून जाऊ लागले. सलील दांनी त्यांना पकडले. पळत पळत ते म्हणाले, “दादा मै आपका गाना नही गा सकता.” (Untold story of Kishor Kumar and Salil Chowdhury)
त्यावर सलील चौधरी यांनी त्यांच्याकडची छडी घेतली व किशोरजींच्या मागे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये धावू लागले. दोघांचा लपाछपीचा खेळ सुरू झाला. कधी या वादकाच्या पाठीमागे, तर कधी त्या वादकाच्या पाठीमागे जाऊन किशोर कुमार लपू लागले व सारखे सारखे ओरडून सांगत होते, “मै गाना नही सकता..”
=============
हे देखील वाचा – पद्मिनी कोल्हापूरेच्या थोबाडीत मारण्यासाठी वापरला न्यूटनचा नियम!
=============
त्यावर सलील दा देखील हट्टाला पेटले, “आज मै तुझसे ये गाना गाकर हि दम लुंगा!” अखेर त्यांनी किशोरजींना पकडले, उभे केले आणि गाणे गाऊन घेतले. चित्रपटात हे गाणे नायक अनिल धवन सायकलवर बसून जाताना गाताना दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे गाण्यामध्ये हा भाव यावा म्हणून किशोर कुमार यांनी एका बाकावर बसून व्यवस्थित सायकलचा फिल आणत गाणे गायले. असा हा या दोघांचा रंजक किस्सा आणि ते गाणे होते “गुजर जाये दिन….”