दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
टॉम क्रूझच्या स्टंटची हवा….
हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझनं (Tom Cruise) वयाची साठी पार केलीय. मात्र टॉमसाठी वय हा फक्त एक आकडा आहे. कारण टॉम क्रूझच्या आगामी चित्रपटातील एका अक्शन सीनची झलक बघितल्यावर त्याचे जगभरातील चाहते फिदा झाले आहेत. टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल या चित्रपटाच्या आगामी भागाची शुटींग सुरु आहे. नव्या वर्षात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. टॉमनं वयाच्या साठाव्या वर्षी या चित्रपटासाठी काही हटके सीन दिले आहेत. टॉमच्या या साहसामुळे मिशन इम्पॉसिबलचा सातवा भाग आतापासून चर्चेत आला आहे.
हॉलीवूडमधील 60 वर्षीय अभिनेता, टॉम क्रूझ (Tom Cruise) त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी तसेच अप्रतिम स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक अॅक्शन चित्रपट देणाऱ्या टॉम क्रूझचे नाव मिशन इम्पॉसिबल या चित्रपटाबरोबर जोडले गेले आहे. अलीकडेच, टॉमने या चित्रपटाच्या आगामी भागासाठी, मिशन इम्पॉसिबल 7 शुट केलाला व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला. त्यामुळे मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागात काय असेल याची हलकी झलक टॉमच्या चाहत्यांना मिळाली आहे. मिशन इम्पॉसिबल – डेड रेकनिंग हा चित्रपट 14 जुलै 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
मिशन इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन हा अमेरिकन अॅक्शन स्पाय चित्रपट आहे. जो क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट मिशन इम्पॉसिबल – फॉलआउट (2018) याचा सिक्वेल आहे. मिशन इम्पॉसिबल या चित्रपट मालिकेतील सातवा चित्रपट आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ(Tom Cruise), विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, हेली एटवेल, शी विघम, पॉम क्लेमेंटिफ, इसाई मोरालेस, रॉब डेलेनी, हेन्री झेर्नी आणि कॅरी एल्वेस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टॉम क्रूझ (Tom Cruise) हा अभिनेता आपल्या लूकने चाहत्यांना वेड लावतोच, पण आपल्या स्टंटनेही चाहत्यांची मन जिंकतो. आता हा टॉम साठ वर्षाचा झाला असला तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत कमी झाली नाही. याच टॉमच्या चाहत्यांसाठी मिशन इम्पॉसिबल-7 हा चित्रपट मोठी पर्वणी ठरणार आहे. टॉमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर मिशन इम्पॉसिबल 7च्या मेकिंगची झलक शेअर केली आहे. यासोबतच त्याने विमानातून उडी मारून चाहत्यांचे आभारही मानले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्याने केलेले हे स्टंट आश्चर्यचकीत करीत आहे.
या व्हिडिओमध्ये टॉम क्रूझ पॉवर पॅक्ड अॅक्शन करताना दिसत आहे. या अॅक्शन सीक्वेन्समध्ये तो हेलिकॉप्टरमधून उडी मारत आहे. एवढ्या उंचीवरून त्याला अशी उडी मारताना पाहून चाहत्यांची धडधड वाढतेय. व्हिडिओमध्ये टॉम विमानात बसलेला दिसत आहे. खाली पर्वत आणि समुद्र दिसत आहेत. या व्हिडिओसोबत टॉमनं मेसेजही शेअर केला आहे. त्यात सर्वांना नमस्कार, आम्ही दक्षिण आफ्रिकेत आहोत आणि आम्ही मिशन इम्पॉसिबल-डेड रेकनिंग’चे शूटिंग करत आहोत, असे चाहत्यांसाठी खास लिहिलं आहे. शिवाय तुमचे आभार मानल्याशिवाय हे वर्ष संपू नये असे मला वाटते, असं म्हणत टॉमनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. टॉमनं या चित्रपटासाठी तीव्र अॅक्शन सीनमध्ये, चेस सीक्वेन्स दरम्यान मोटरसायकल चालवताना एका खडकावरून उडी मारतांनाचा सिनही केला आहे. पडद्यावर हे दृष्य बघतांनाही चाहत्यांच्या ह्दयाची धडधड वाढणार आहे. या स्टंटसाठी टॉमनं बरीच मेहनत घेतली आहे. त्यानं सरावासाठी एका दिवसात 30 उड्या घेतल्या. नियोजित प्रमाणे उडी मारण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाचा वापर केला आणि बराच सराव केल्यानंतर हा सीन ओके करण्यात आला.
=====
हे देखील वाचा : काजोलच्या लेकीची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?
=====
2022 साली टॉप गन मॅव्हरिक सारखा सर्वोत्कृष्ट अॅक्शन थ्रिलर चित्रपट आपल्या चाहत्यांना भेट देणाऱ्या टॉम क्रूझच्या (Tom Cruise) चाहत्यांना प्रतीक्षा असते ती मिशन इम्पॉसिबलच्या पुढच्या भागाचीच.14 जानेवारी 2019 रोजी, टॉमने मिशन इम्पॉसिबलच्या पुढच्या भागांची घोषणा केली होती. अंतर्गत काही वाद आणि कोविडच्या महामारीमुळे टॉमचे हे मिशन इम्पॉसिबलचे वेळापत्रक थोडे बदलले असले तरी टॉमनं आपल्या चित्रपटासाठी एकापेक्षा एक असे अक्शन सीन दिले आहेत. टॉमनं हे सीन देतांना कुठेही डुलपीकेट वापरला नाही हे विशेष. या चित्रपटाचे चित्रिकरण नॉर्वेमध्ये, स्ट्रांडा, इटली आणि रोमच्या काही भागांमध्ये झाले आहे. टॉमनं (Tom Cruise) या चित्रपटासाठी अंतराळातही शुटींग केल्याची चर्चा आहे. अर्थात पुढच्या वर्षी प्रदर्शित होणा-या या चित्रपटासाठी आत्तापासूनच उत्सुकता वाढली आहे.
सई बने