‘अवतार’2 चा जगभरात धुमाकूळ; सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार…
नावींच निळं जग…अर्थात अवतार ‘द वे ऑफ वॉटर’ जेम्स कॅमेरून दिग्दर्शित या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफीसवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जॅक सिली आणि नेतिरी यांच्या कुटुंबाची कथा असणारा हा चित्रपट तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आला. पण अवतारची (Avatar Review) जेवढी प्रतीक्षा झाली, त्याच्या दुप्पट बॉक्स ऑफीसवर तो यशस्वी ठरत आहे. या चित्रपटाच्या बजेटच्या दुप्पट गल्ला प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं मिळवला आहे. अजून काही आठवडे तरी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये हाऊसफुल बॅनरखाली चालणार अशी अपेक्षा आहे, त्यामुळे अवतार ‘द वे ऑफ वॉटर’ (Avatar Review) हा या वर्षातील आणि आगामी वर्षातीलही बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.
अवतारच्या (Avatar Review) पहिल्या भागात पॅंडोराच्या जगाचा परिचय करुन देण्यात आला. आता दुस-या भागात जॅक सिली आणि नेतिरी यांचे कुटुंब मोठं झालं आहे. त्यांना चार मुलं आहेत. हे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी जॅकचा प्रयत्न आहे. मात्र त्याच्यावरचा धोका अद्यापही गेलेला नाही. या कुटुंबावर हल्ला सुरु होतो.आपल्यामुळे सर्व गावाला त्रास नको म्हणून जॅक आपल्या कुटुंबाला घेऊन नव्या घराच्या शोधात बाहेर पडतो. पॅंडोरामध्ये रहाणारे सिलीचे कुटुंब आता समुद्राजवळ रहाणणा-या एका कबिल्याकडे येतात आणि आश्रय मागतात. जंगलात राहणारे हे कटुंब पाण्याखालच्या जगात कसे राहते, तिथे संघर्ष कसा करते आणि त्यांना मारण्यासाठी आलेल्या आकाशातील माणसांपासून स्वतःचे आणि कबिल्याचे….शिवाय समुद्रातील प्राण्यांचे कसे रक्षण करते, हे अवतार ‘द वे ऑफ वॉटर’ मध्ये पहायला मिळत आहे. यासोबत जेम्स कॅमेरुन यांनी केलेला जबरदस्त इफेक्ट या चित्रपटाची सर्वात मजबूत बाजू आहे.
प्रदर्शनानंतर अवतार ‘द वे ऑफ वॉटर’ (Avatar Review) अवघ्या 3 दिवसात 3600 कोटींचा गल्ला जमवला. जेम्स कॅमेरॉनच्या अवतार 2 ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवतार 2 जगभरात प्रचंड कमाई करत आहे. अवतार 2 या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्या वीकेंडलाच चित्रपटाने सर्व जुने रेकॉर्ड पुसून काढले. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात $435 दशलक्ष (सुमारे 3598 कोटी रुपये) चे रेकॉर्डब्रेक जागतिक कलेक्शन केले आहे. चित्रपटाने उत्तर अमेरिकेत $134 दशलक्ष, चीनमध्ये $59 दशलक्ष आणि उर्वरित जगामध्ये $242 दशलक्षचा व्यवसाय केला आहे. यामध्ये 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय फक्त भारतातूनच झाला आहे, हे आणखी विशेष. पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. पहिल्या दिवशी 41 कोटी, शनिवारी दुसऱ्या दिवशी 42 कोटी आणि रविवारी तिसऱ्या दिवशी 46 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. यासह त्याची एकूण कमाई 129 कोटींच्या पुढे गेली आहे.
अवतार 2 चे बजेट जवळपास 2000 कोटी आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच बजेटपेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली आहे. चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हिज्युअल यांचा वापर मंत्रमुग्ध कराणारा झाला आहे. अवतार चित्रपटाचा पहिला भाग 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 19 हजार कोटींची कमाई केली. यासोबतच हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. मात्र अवतारच्या (Avatar Review) दुस-या भागानं हा विक्रम मोडीत काढला आहे.
2009 मध्ये अवतार(Avatar Review) रिलीज होण्याआधीच, जेम्स कॅमेरुन यांनी जाहीर केले होते की पहिला चित्रपट यशस्वी झाल्यास त्याचा सिक्वेल करण्यात येईल. अवतारच्या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर 2010 मध्ये त्यांनी दोन सिक्वेलची घोषणा करण्यात आली. अवतार-2 सलग 8 वर्षे पुढे ढकलल्यानंतर 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज झाला. याशिवाय अवतार-3 20 डिसेंबर 2024 रोजी, अवतार-4 18 डिसेंबर 2026 रोजी आणि अवतार-5 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.अवतारपूर्वी एव्हेंजर्स एंडगेमच्या नावावर 20 हजार 332 कोटींचा व्यवसाय करण्याचा विक्रम होता. आता $250 दशलक्ष (रु. 1900 कोटी) च्या बजेटसह अवतार 2 आपला विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.
========
हे देखील वाचा : पाकिस्तान मधील पूजा भट्टचा चाहता भारतातील जेलमध्ये सडतोय!
========
अवतारचे आगामी 4 सिक्वेल येत आहेत, ज्यासाठी प्रत्येक भागासाठी $250 दशलक्ष (1900 कोटी) बजेट ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे, चित्रपटाच्या 5 सिक्वेलसह या फ्रेंचायझीचे एकूण बजेट 1237 दशलक्ष डॉलर्स (11,300 कोटी) आहे. ही जगातील सर्वात मोठी बजेट फ्रँचायझी बनली आहे. अवतार 2 मध्ये पहिल्या भागाप्रमाणेच केट विन्सलेट, सॅम वर्थिंग्टन, झो साल्दाना, स्टीफन लाँग, विन डिझेल, एडी फाल्को, क्लिफ कर्टिस हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भारतात हा चित्रपट 3800 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. 3-डी, 2-डी तंत्रांसोबत हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदीसह सर्व भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये आहे.
अवतार चा तिसरा चित्रपट ‘अवतार द सीड बेअरर’, चौथा चित्रपट ‘अवतार द तुलकुन रायडर’ आणि पाचवा चित्रपट ‘अवतार द क्वेस्ट ऑफ अवा’ या नावांनी असेल अशी माहिती समजते. अवतारच्या दुस-या भागाची आतापर्यंतची कमाई पाहता, दुसऱ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा सहज पार करेल, असा विश्वास आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या चित्रपटाला मागे सोडले आहे. मात्र, तो ‘KGF Chapter 2’ चा विक्रम मोडू शकला नाही. मात्र रोहीत शेट्टीच्या सर्कसला मात्र अवतारचा फटका बसू शकेल असा अंदाज आहे.
सई बने