‘नाटू नाटू’चा गोल्डन ग्लोबमध्ये डंका….
2023 ची सुरुवातच एस एस राजामौली यांच्यासाठी आनंदाची बहार घेऊन आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेल्या आरआरआरनं बॉक्स ऑफीसवर आपला डंका वाजवला. देशातच काय पण परदेशातही आरआरआरचा मोठा फॅन क्लब तयार झाला. या आरआरआरच्या नाटू नाटू गाण्यानं सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारावर (Golden Globe Awards) आपलं नाव कोरलं आहे. लॉस एंजेलिसमधील 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराचा शानदार सोहळा भारतीयांसाठी अधिक शानदार ठरला आहे. याचवेळी राजामौलींसाठी दुसरी आनंदाची बातमी मिळाली आहे. आरआरआरचा हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. या दोन आनंदाच्या बातम्या चाहत्यांना सांगताना, आरआरआरच्या सिक्वलचीही तयारी सुरु केल्याची आनंदवार्ता राजामौली यांनी सांगितली आहे. एकूण आरआरआर आणि राजामौंलीसाठी 2023 हे वर्ष गोल्डन ठरणार आहे, हे नक्की.
आरआरआरमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी 1920 च्या ब्रिटिश राजवटीतील भारताचे स्वातंत्र्य सैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या भूमिका साकारल्या आहेत. आरआरआरमध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटिश कलाकार रे स्टीव्हनसन, अॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्सऑफीसवर तुफानी ठरली. आता ऑस्करमध्येही त्याचा डंका वाजतोय. त्याचीच सुरुवात गोल्डन ग्लोबपासून (Golden Globe Awards) झाली आहे. गोडल्डन ग्लोबच्या शानदार समारंभात आरआरआरचे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनी यांच्यासह ज्युनिअर एनटीआर, अभिनेता राम चरणही उपस्थित होते. गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर झाल्यावर या सर्वांनी आनंद व्यक्त केला असून सोशल मिडीयावर टीम आरआरआरवर आनंदाचा वर्षाव होत आहे.
गोल्डन ग्लोज गोज टू ही घोषणा आणि नाटू नाटू गाण्याचे नाव आल्यावर टीम आरआरआरनं जल्लोष केला. नाटू नाटूचे संगीतकार एमएम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पुरस्कार स्विकारल्यावर कीरावानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली आणि कलाकारांचे आभार मानले. यावळी ते भावूक झाले होते. गोल्डन ग्लोबवर(Golden Globe Awards) आरआरआरचे नाव कोरल्यावर राजामौली यांनी आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे, राजामौली यांनी आरआरआर चा सिक्वेल येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी कथानकावर कामही सुरु केले आहे. आरआरआर ला गोल्डन ग्लोब्समध्ये सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट श्रेणीत देखील नामांकन मिळाले होते. मात्र हा पुरस्कार अर्जेंटिना 1985 या चित्रपटाला मिळाला.
गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी (Golden Globe Awards)1957 मध्ये पहिल्यांदा भारतीय चित्रपटाला नामांकन मिळाले होते. व्ही शांताराम यांच्या चित्रपटात स्वतः व्ही शांताराम मुख्य भूमिकेत होते आणि अभिनेत्री संध्याने त्यांच्यासोबत एक संस्मरणीय भूमिका साकारली होती. हा चित्रपट म्हणजे दो आंखे बारह हाथ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत पुरस्कार मिळाला. यानंतर 1983 मध्ये रिचर्ड अॅटेनबर्ग यांच्या गांधी चित्रपटासाठी नामांकन मिळाले. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्र, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (बेन किंग्सले) असे 5 गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले. 2009 मध्ये, संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांना स्लमडॉग मिलेनियरसाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्लेचा पुरस्कारही मिळाला. याशिवाय 1989 मधील सलाम बॉम्बे आणि 2002 मधील मान्सून वेडिंग या चित्रपटांनाही गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळाले आहे.
=====
हे देखील वाचा : रॉ एजंटच्या मिशनवर आधारित असलेला ‘मिशन मजनू’
=====
आता गोल्डन ग्लोब (Golden Globe Awards) नंतर ऑस्करमध्ये आरआरआर काय जादू करतोय हेही पाहण्यासारखे आहे. ऑस्करच्या शर्यतीमध्येही आरआरआर आहे. यासोबत चेल्लो शो, ऋषभ शेट्टीचा कांतारा, आर माधवनचा रॉकेट्री – द नंबी इफेक्ट, विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स आणि गंगूबाई काठियावाडी हेही ऑस्करच्या शर्यतीत सामील झाले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस ने 301 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 9 भारतीय चित्रपटांच्या नावांचाही समावेश आहे.
ऑस्कर 2023 साठी भारतातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी चेल्लो शो, या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. पान नलिन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा गुजराती चित्रपट आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा गावातील एका मुलावर आधारीत आहे. ऑस्कर सोहळ्याकडे आता भारतीयांचे लक्ष लागले आहे. आरआरआर सोबत कांतारा, द काश्मिर फाईल्स आणि रॉकेट्री – द नंबी इफेक्ट चित्रपटाकडूनही पुरस्काराची अपेक्षा आहे.