‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ हे गाणं ‘आनंद’ सिनेमासाठी लिहीलंच नव्हतं!
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ज्या सिनेमाची माईलस्टोन म्हणून नोंद झाली आहे तो ऋशिकेश मुखर्जींचा ’आनंद’सिनेमा! यात एक गाणं (Song) होतं ’कहीं दूर जब दिन ढल जाये सांझ की दुल्हन बदन चुराये चुपकेसे आये’. या गीताचा किस्सा फार मनोरंजक आहे. मूळात हे गाणं गीतकार योगेश यांनी ’आनंद’ करीता लिहिलच नव्हत! हे गाणं (Song) अनिल धवन , जया भादुरी यांच्या ’अन्नदाता’(१९७२) साठी लिहिलं होतं. मग हे ’आनंद’ मध्ये कसं आलं? याचा हा किस्सा. आनंद आणि अन्नदाता या दोन्ही सिनेमाचे गीतकार (योगेश) व संगीतकार (सलील चौधरी) एकच होते. हे गाणं ’अन्नदाता’ साठी योगेशने लिहिले आणि त्याची रिहर्सल चालू होती. एकदा दुपारी त्याच म्युझिक रूम मध्ये ’आनंद’च्या गाण्याची सीटींग होती. दुपारी जेंव्हा ऋशिदा,राजेश खन्ना व अमिताभ तिथे पोचले व त्यांनी ’अन्नदाता’चे हे गीत ऐकले व या गाण्याच्या ते प्रेमातच पडले! तिघांना गीताचे बोल आणि चाल बेहद आवडली.
ऋशिदा सरळ ‘अन्नदाता’च्या निर्मात्याकडे म्हणजे एल बी लछमन यांच्या कडे गेले व हे गाणं आपल्या सिनेमाकरीता देण्याची विनंती केली. त्यावर लछमन म्हणाले ’अरे भाई ये मेरी फिल्म का गाना है. मैं आपको कैसे दूं?’ पण यांचा आग्रह चालूच होता. पण लछमन ऐकायला तयार नव्हते, पेच मिटेना. ऋशिदांनी आयडीया केली. अन्नदाताचे दिग्दर्शक असित सेन हे बंगाली बाबू त्यांचे चांगले मित्र होते. त्यांनी सेन यांना गळ घालून आपल्या ’आनंद’ मधील सिच्युएशन करीता हे गाणं किती योग्य आहे ते पटवून दिले. दिग्दर्शक असित सेन यांनी निर्मात्याला समजावून सांगितले. ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या सिनेमाची स्टोरी लाईन त्यांना ऐकवली आणि हे गाणे (Song) ‘आनंद’ साठीच किती परफेक्ट आहे ते सांगितले. शेवटी मनाचा मोठेपणा दाखवत एल बी लछमन राजी झाले पण एका अटीवर. गीतकार योगेश यांनी याच सिच्युएशनचे आणखी एक गाणे ’अन्नदाता’ करीता लिहावे.
गीतकार योगेश ने ही अट मान्य केली, काही दिवसात ’अन्नदाता’ साठी गाणं लिहिलं “नैन हमारे सांझ सकारे, देखें लाखों सपने, सच ये कहीं होंगे या नहीं, कोई जाने ना, कोई जाने ना, यहाँ” हे गीत (Song) देखील मुकेशनेच गायलं. पण हे गाणं चांगल असूनही ‘त्या’ गाण्याइतकं गाजलं नाही.’अन्नदाता’ हा चित्रपट देखील तिकीट्बारीवर फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. इकडे ’आनंद’ ने मात्र सिनेमाची परीभाषाच बदलून टाकली. या चित्रापटात सर्व गाणी योगेश यांनीच लिहिली होती फक्त एक गाणे ‘मैने तेरे लिये हि सात रंग के सपने चुने …’ हे मुकेश यांनी गायलेलं गीत गुलजार यांनी लिहिलं होतं. यातील ‘ ना जिया लागेना …’ हे लताच्या स्वरातील गीताची (Song) चाल बंगाली मध्येच सलील चौधरी यांनी १९६९ चाली वापरली होती. हे मूळ बंगाली गीत लता गायले आहे. आणि अतिशय गोड आहे. ’कहीं दूर जब दिन ढल जाये’ या गाण्याच्या रेकॉर्डींग नंतर ऋशिदांनी आणखी एक गाणं योगेशला लिहायला सांगितलं ते होतं ’जिंदगी कैसी है पहेली हाय कभी तो हंसाये कभी ये रूलाये..’ या गाण्याबाबत (Song) पण एक किस्सा आहे तो पुन्हा कधी तरी..
======
हे देखील वाचा : दादा कोंडके यांचे दोन गुरु भालजी आणि बाळासाहेब!
=====
जाता जाता थोडंस अन्नदाता या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट अतिशय अप्रतिम बनला होता. अनिल धवन आणि जया भादुरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भुमिका होत्या. या दोघांचा ‘पिया का घर’ हा चित्रपट या काळात चांगलाच लोकप्रिय ठरला होता. ‘अन्नदाता’ खऱ्या अर्थाने लक्षात राहिला तो ओमप्रकाश या अभिनेत्याच्या भूमिकेमुळे. यात सलील चौधरी यांनी अतिशय अप्रतिम असं संगीत दिलं होतं. लताचे ‘रातो की साये..’ आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील ‘ओ मेरी प्राण सजनी चंपावती आजा..’ हे गाणे (Song) त्या काळात चांगलीच गाजली होती. अप्रतिम कथानक, चांगलं दिग्दर्शन आणि मधुर गाणी असून देखील चित्रपट अयशस्वी ठरला!