एक रुपया सायनिंग अमाउंट घेवून मधुबालाने हा सिनेमा केला!
पन्नासच्या दशकामध्ये मधुबाला (Madhubala) रसिकांच्या दिलाची राणी बनली होती. तिच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ होत होते. प्रत्येक जण तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होता. दिग्दर्शक शक्ती सामंत यांना देखील आपल्या चित्रपटात मधुबाला घ्यायचे होते. १९५६ साली त्यांनी स्वतःचे ‘शक्ती फिल्म’ नावाचे बॅनर उभे केले आणि पहिला चित्रपट निर्माण केला ‘हावडा ब्रिज’. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री होता. या सिनेमासाठी त्यांनी नायक म्हणून अशोक कुमार यांची निवड केली. ज्यावेळी अशोक कुमार यांनी शक्ती सामंत यांना नायिके बाबत विचारले त्यावेळी शक्तीदा ने ,”दादा मुनी मला माझ्या पहिल्या सिनेमात मधुबाला (Madhubala) ला घ्यायचे आहे माझ्या पहिल्याच सिनेमाची नायिका मधुबाला असावी असे मला मनोमन वाटते. पण ती माझ्या सिनेमात काम करेल का?” त्यावर अशोक कुमार म्हणाले ,”का नाही? मी (Madhubala) तिच्याशी बोलून बघतो.” अशा पद्धतीने अशोक कुमारने शक्ती सामंत आणि मधुबाला यांची एक मीटिंग फिक्स केली.
शक्ती सामंत मधुबाला (Madhubala) ला या सिनेमाची स्टोरी आणि तिचे कॅरेक्टर समजावून सांगू लागले. ते मधुबाला ला म्हणाले,” या सिनेमात तुझी भूमिका हे एका ख्रिश्चन मुलीची आहे. आणि तिला नीट हिंदी बोलता येत नाही. ती बम्बैया या टाईप हिंदी बोलते!” मधुबाला (Madhubala) ला काहीच कळाले नाही. तिने विचारले ,” मला काहीच कळाले नाही दादा तुम्हीच मला सांगा!” त्यावर दादांनी तिला सांगितले यातील तुझे कॅरेक्टर अशा पद्धतीने बोलेल. हम आदमी अच्छा मांगता. तुम खाली पिली फोकट क्यू भाव खाता. हम तुमसे शादी करना मांगता. हमारा दिल बोलता तुम अच्छा आदमी लगता.” मधुबाला ही बोलीभाषा ऐकून एकदम खुश झाली. अशा प्रकारची भूमिका तिने या पूर्वी नव्हती केली! ती जोरजोरात हसू लागली. कारण एक तर शक्ती सामंत यांचे देखील हिंदी तसे बंगाली टोनचे होते. या बंगाली टोनला ते ओठाचा चंबू करून बोलत होते. त्यांचे ते हिंदी मधुबाला (Madhubala) ला खूपच मनोरंजक वाटले. तिने मध्येच त्यांना थांबवून हसत सांगितले,” बस दादा बस… हम तुम्हारे फिल्म मे काम करना मांगता!” शक्ती सामंत खुश झाले. पहिल्याच सिनेमात मधुबाला क्या बात है! दिल गार्डन गार्डन हो गया.
=====
हे देखील वाचा : या कव्वालीमधील चूक मनमोहन देसाईंनी दुरुस्ती केली…
=====
शक्तिदांनी तिला सायनिंग अमाऊंट बद्दल विचारले. त्या काळात मधुबाला (Madhubala) एका सिनेमाचे ७५ हजार रुपये घेत होती. सुरुवातीला शक्ती दा तिला सायनिंग अमाऊंट वीस हजार रुपये देणार होते. परंतु मधुबालाला या सिनेमातील भूमिका इतकी आवडली की तिने शक्तिदांना सांगितले,” दादा, मला हा चित्रपट करायचा आहे .पैशाचा काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सिनेमा तयार करा रिलीज झाल्यानंतर मला पैसे द्या.” परंतु शक्ती सामंत म्हणाले,” असे नाही. काहीतरी शगुन म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट साइन करताना पैसे घ्यायलाच पाहिजे!” शक्तिदांना भीती होती की, काहीही पैसे न घेता जर आपण साईन केले आणि उद्या जर हिने नकार दिला तर? पण मधुबाला म्हणाले,” दादा आप बिलकुल फिकर मत करो. तुम्ही काही काळजी करू नका आणि शगुन म्हणत असाल तर हा फक्त एक रुपया मला द्या!” तिने अक्षरशः एक रुपया घेऊन कॉन्ट्रॅक्ट साईन केले. भूमिका आवडली की, कलाकार किती आनंदाने ती साकारतो हे पाहायचे असेल तर हावडा ब्रिज हा सिनेमा पाहायला पाहिजे. या सिनेमातील मधुबालाच्या (Madhubala) अभिनयातील सहजपणा तिला भूमिका आवडल्याने आला होता. अतिशय उत्स्फुल्लपणे ती पडद्यावर वावरली. अतिशय खेळकर वातावरणात सिनेमा तयार झाला आणि सिनेमा सुपर डुपर हिट झाला. हा सिनेमा हिट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे या सिनेमाचं फडकतं ओ पी नय्यर यांचे संगीत. यातील ‘आईये मेहरबान या गाण्याने कहर लोकप्रियता हासील केली. मधुबाला शक्ती सामंत यांची फॅन झाली आणि तिने लगेच हा सिनेमा चालू असताना त्यांचा पुढचा इंसान जाग उठा आणि जाली नोट हे शक्ती सामंत यांचे पुढचे दोन सिनेमे देखील लगेच साइन करून टाकले!