लता आणि आशाला घडवणारे संगीतकार निर्माण करणारा निर्माता!
भारतीय सिनेमांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोर येथे चित्रपट निर्मितीची मोठे केंद्र होते. इथून अनेक अप्रतिम चित्रपटांची निर्मिती तर झालीच पण अनेक नामवंत कलाकार भारतीय आणि पाकिस्तान चित्रपट सृष्टीला मिळवून दिले. यात प्रामुख्याने नाव घ्यायला पाहिजे निर्माता दिग्दर्शक दलसुखलाल एम पंचोली (Pancholi) यांचे. त्यांनी सिनेमामध्ये दिलेलं योगदान फार मोलाचं होतं. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘खजांची’ या चित्रपटाने भारतीय चित्रपट संगीताची व्याख्या आणि व्याकरण बदलून टाकले! तोवर चित्रपट संगीतामध्ये प्रामुख्याने शास्त्रीय राग संगीतावर आधारित चित्रपट गीते दिसत होती पण ‘खजांची’ या चित्रपटापासून पंजाबी ठेक्याचे संगीत भारतीय सिनेमाला मिळाले. (यातील ‘सावन के नजारे है आहा आहा…’ हे फडकते पंजाबी शैलीतील गाणे जबरदस्त हिट ठरले होते! कॉलेजला सायकली वरून जाणाऱ्या मुलींना चिडवण्यासाठी त्या काळचे रोड रोमिओ गे गाणे गात असत!) या चित्रपटाला संगीत होते गुलाम हैदर यांनी. दलसुखलाल पंचोली (Pancholi) अनेक कलावंतांचे गॉडफादर होते. आज प्रामुख्याने त्यांनी ब्रेक दिलेल्या दोन संगीतकारांबद्दल आवर्जून सांगायला पाहिजे कारण या दोन्ही संगीतकारांनी चित्रपट संगीतामध्ये मोलाची कामगिरी तर केलीच; शिवाय त्यांनी दोन अनमोल रत्न (लता मंगेशकर आणि आशा भोसले) भारतीय चित्रपट संगीताला मिळवून दिली! पंचोली (Pancholi) आणि गुलाम हैदर यांची भेट कशी झाली याचा खूप मजेशीर किस्सा आहे.
लाहोर मध्ये दलसुखलाल पंचोली चित्रपट निर्मितीमध्ये असताना त्यांचे मोठे नाव सिनेमाच्या दुनियेत झाले होते. एकदा स्टुडिओ जात असताना त्यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास सुरू झाला इतका की, डोके फुटते की काय? असे त्यांना वाटू लागले. त्यांनी ड्रायव्हरला ताबडतोब कुठल्यातरी केमिस्टच्या दुकानासमोर गाडी थांबवायला सांगितली. ड्रायव्हरने एका औषधाच्या दुकानासमोर गाडी थांबवली. पंचोली घाईघाईने गाडीतून उतरले आणि दुकानात गेले. ते एक आयुर्वेदिक औषधाचे दुकान होते. दुकानात उपस्थित असलेला सेल्समन तरुण आणि हसरा होता. त्याने पंचोली (Pancholi) यांचे स्वागत केले. त्यावर पंचोली त्याला म्हणाले, ”मित्रा, माझे डोके प्रचंड दुखते आहे. काहीतरी करून ताबडतोब हि डोकेदुखी कमी होईल असे औषध दे.” तो तरुण त्यांना म्हणाला,” सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी लगेच तुम्हाला औषध बनवून देतो.” असे म्हणत त्याने आत जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांना डोकेदुखी वरचे औषध बनवायला सांगितले. तो तरुण पुन्हा बाहेर आला. त्याने पंचोली यांना ओळखले होते. तो म्हणाला, ” सर मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही फार मोठे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आहात. मला संगीताची आवड आहे. मी तयार केलेल्या काही चाली तुम्हाला ऐकवू का?” पंचोली (Pancholi) साहेबांच्या डोके दुखत होते पण औषध तयार होण्यासाठी पाच दहा मिनिटे लागणार होती. त्यामुळे त्यांनी त्याला होकार दिला. लगेच त्या तरुणांनी हार्मोनियम समोर घेऊन काही चाली त्यांना ऐकवल्या.
पंचोली (Pancholi) यांना त्या चाली आवडल्या. तोवर औषध देखील तयार झाले होते. ते औषध समोर आले. पंचोली (Pancholi) यांनी ते औषध प्राशन केले. तिथे तयार केलेला मलम डोक्याला लावला. त्यांना थोडे बरे वाटू लागले. जाताना त्यांनी त्या तरुणाला सांगितले,” मित्रा उद्या मला तू अकरा वाजता या स्टुडिओ देऊन भेट.” दुसऱ्या दिवशी तो तरुण पंचोलींना भेटण्यासाठी स्टुडिओत गेला. ताबडतोब पंचोली (Pancholi) यांनी संगीत विभागातील काही व्यक्तींना तिथे बोलावले आणि सांगितले,” हा तरुण चांगलं वाद्य वाजवतो चांगल्या चाली तयार करतो याला आपल्या विभागात आजपासून कामाला घ्या.” तो तरुण खूप खुश झाला लवकरच त्याने आपल्या कर्तुत्वाने आपली गुणवत्ता सिद्ध केली. आणि तो चोटीचा संगीतकार झाला. हा संगीतकार म्हणजे संगीतकार गुलाम हैदर! ‘खजांची’,’खानदान’ ,’यमला जट’ ची गाणी प्रचंड गाजली. गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर यांच्या स्वराची जादू ओळखली होती आणि त्यांनी ‘मजबूर’ या चित्रपटातून लताचा स्वर जरा रसिकांपर्यंत पोहोचवला. त्याने सर्व संगीतकारांना सांगितलं होतं ,”या आवाजाकडे लक्ष ठेवा हा आवाज एक ना एक दिवस भारतीय चित्रपट संगीतातील वरच्या श्रेणीचा आवाज ठरणार आहे!” गुलाम हैदर यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. लता तर गुलाम हैदर यांना आपला ‘गॉडफादर’ ते उगाच नाही.फाळणी नंतर ते पाकिस्तानात निघून गेले.
फाळणी नंतर पंचोली (Pancholi) नेसत्या कपड्यानिशी भारतात आले. इथे त्यांनी चित्रनिर्मिती चालू केली. गुलाम हैदर पाकिस्तानात गेल्याने नव्या संगीतकाराचा शोध सुरु झाला. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणता १९४५ साली दिल्ली रेडिओवर सी एच आत्मा यांच्या स्वरातील ‘प्रीतम आन मिलो’ ही रेकॉर्ड काय वाजत असे. पंचोली यांना या गाण्याचे संगीत खूप आवडले हो. ते त्यांनी त्यांच्या लोकांना या गीताच्या संगीतकाराचा शोध घ्यायला सांगितला. आणि त्या संगीतकाराला टेलिग्राम करून त्यांनी मुंबईला बोलून घेतले. या टेलिग्राम मध्ये त्यांनी लिहिले होते की ,”माझ्या आगामी चित्रपटासाठी आपण संगीत देणार आहात!” हा टेलिग्राम वाचल्यानंतर तो संगीतकार प्रचंड खूष झाला कारण पंचोली (Pancholi) सारखा मोठा निर्माता दिग्दर्शक त्याला संगीतकार म्हणून घेत होता. तो ताबडतोब मुंबईला आला आणि त्याने चित्रपट संगीत द्यायचे कबूल केले. हा चित्रपट होता ‘आसमान’. चित्रपटाला फारसा यश मिळालं नाही. पण संगीतकार मात्र क्लिक झाला हा संगीतकार होता ओ पी नय्यर.
=====
हे देखील वाचा : पु ल देशपांडेचा १९५० सालचा सिनेमा पंचवीस वर्षानंतर चालला!
=====
याच ओ पी ने पुढे दोन दशक भारतीय सिनेमांमध्ये आपला वर चष्मा कायम ठेवला. त्यांचे वैशिष्ट्य असे होते की सर्व संगीतकार लता मंगेशकर यांचा स्वर वापरत असताना हा स्वर न वापरता देखील आपण संगीत यशस्वी करू शकतो या विश्वासावर त्यांनी संगीत दिले आणि ते खरं करून दाखवले. पन्नास च्या दशकामध्ये त्यांच्या संगीताचा प्राण स्वर ठरला होता आशा भोसले. आशा भोसले आणि ओ पी हे कॉम्बिनेशन भारतीय सिनेमासाठी एक दैदिप्यमान असा अध्याय आहे. आशा भोसले यांच्या स्वराला खऱ्या अर्थाने कुणी नावलौकिक मिळून दिला असेल तर तो ओ पी ने! आणि ओ पी यांचा शोध आणि निवड केली होती दल सुखलाल पंचोली यांनी. त्यामुळेच लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन गायिकांना स्वतंत्र ओळख करून देणाऱ्या संगीतकारांची ओळख पंचोली यांनी रसिकांना करून दिली. त्यामुळे पंचोली हे संगीतकारांना निर्माण करणारे निर्माते ठरले!