‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
निझामांचा वन्समोर!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील राजे ,महाराजे,संस्थानिक यांचा स्थानिक जनता व राजकारणावरील दबदबा कायम होताच. याचा अनुभव हैद्राबादच्या सागर थिएटर च्या मालकाला आला.साल होतं १९५६.होमी वाडीयांचा ’हातिमताई’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. आपल्या हैद्राबादचा जयराज या सिनेमाचा नायक आहे हि वार्ता तत्कालीन हैद्राबादचे निजाम उस्मान अली यांच्या कानावर गेली.
निजामाने हा सिनेमा आपल्या संपूर्ण परिवारासमवेत पाहायचे ठरवले.तसा संदेश थिएटर मालकाकडे गेला.निजामाचे प्रस्थ मोठे त्यांचा कुटुंब कबीला देखील महाकाय असल्याने या सिनेमाच्या स्पेशल शो चे आयोजन केले गेले.’ सिर्फ सियासती हजरात ’ करीता असलेल्या शो करीता झाडून सर्व नवाब परीवार पोचला.त्यात त्यांच्या जनान खान्यातील बायका, सरदार, मुलाजिम,रिश्तेदार यांचा सारा लवाजमा होता.त्यांच स्वागत करायला स्वत: सिनेमाचा नायक जयराज व थिएटर मालक उपस्थित होते.सर्व जण स्थिर स्थावर झाल्यावर सिनेमा सुरू करण्याचा हुकुम झाला.
सिनेमा सुरू झाल्यावर थॊड्याच वेळात म.रफीने गायलेलं,अख्तर रूमाणी यांच गाणं ज्याला संगीत एस एन त्रिपाठी यांच होतं पडद्यावर सुरू झालं.गाण्याचे बोल होते.’परवर दिगारे आलम तेराही है सहारा’ गाणं मध्यावर आलं असताना नवाब साहेब उठले आणि जोरात ओरडले ’रोको ,रोको,रोको’.नवाब साहेबांची आज्ञा म्हणजे हैद्राबादेत साक्षात परमेश्वराचीच आज्ञा.ताबडतोब थिएटर मधील दिवे लावण्यात आले.घाबरत घाबरत हात जोडत थिएटर मालक नवाबांकडे गेला व म्हणाला ’ हुजुर नाचीझ से कोई गलती हुयी है क्या..?’ नवाबाने मानेनेच नकार दिला.
’फिर पिक्चर क्यूं रोक दी ?’ यावर नवाब साहेब हसत हसत म्हणाले ’अल्ला कसम क्या बेहतरीन तर्ज बनाई है…हम इसे दुबारा शुरू से देखना चाहते है..’ निमूटपणे सिनेमाची रिळे उलट्या दिशेला फिरवित संपूर्ण गाणं पुन्हा दाखवलं गेलं.एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल अकरा वेळेला ! आज हा सिनेमा विस्मृतीत गेला असला तरी हे गाणं हिच या सिनेमाची एकमेव आठवण उरली आहे.
गीत : परवर दिगार –ए- आलम तेरा हि है सहारा (हातिमताई)