काय असणार देवमाणुस…..
झी मराठीवर सध्या देवमाणूस या नव्या मालिकेचे प्रोमो सुरु आहेत. सत्यघटनेवर आधारीत असलेल्या या मालिकेचे प्रोमोच भीतीदायक आणि हिसंक दृश्यांनी गाजले आहेत. एका गावातील डॉक्टरची आणि त्यानं फसवलेल्या महिला रुग्णांची कहाणी या मालिकेत आहे. यातच त्या डॉक्टरचं विकृत रुपही दिसणार आहे. अतिशय थंड डोक्यानं हा डॉक्टर त्याच्याकडे येणा-या महिला रुग्णांना प्रेमात पाडतो आणि नंतर त्यांची हत्या करतो…या डॉक्टरची भूमिका केली आहे किरण गाडकवाड यानं…
किरणनं यापूर्वी लागीरं झालं जी या मालिकेमध्येही खलनायकाची भूमिका केली होती. पण देवमाणूस मध्ये त्याने जो खलनायक साकारला आहे, तो अधिक हिंसक असल्याचे प्रोमोवरुन तरी दिसत आहे. त्यामुळेच किरणच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका 31 ऑगस्टपासून सुरु होत आहे. रात्रीस खेळ चाले ही मालिका बंद होत आहे, त्यावेळी रात्री 10.30 वा. देवमाणूस सुरु होईल. मालिकेचे नाव देवमाणूस असले तरी मालिका मालिकेचे प्रोमो बघितल्यावर अंगावर काटा उभा राहतो. आत्तापर्यंत देवमाणूसचे दोन प्रोमो जाहीर झाले आहेत.
गावात प्रॅक्टीस करणारा एक डॉक्टर आपल्या चांगूलपणानं गावक-यांची मने जिंकून घेतो. पण वास्तवात हा डॉक्टर वेगळा असतो. पहिल्या प्रोमोमध्ये एका महिलेची हत्या करतांना हा डॉक्टर दाखवला आहे. तर दुस-या प्रोमोमध्ये एक प्रेत खड्ड्यात पुरुन त्यावर झाड लावतांना या डॉक्टरला दाखवण्यात आले आहे. या दोन्हीही प्रोमोमध्ये मालिकेचे स्वरुप स्पष्ट होते. प्रोमो हे अतिरक्तरंजित झाल्याची टीकाही प्रेक्षकांनी केली आहे. पण या सर्वांत लक्षवेधी ठरला आहे तो किरण गायकवाड हा तरुण कलाकार. किरण लागिरं झालं जी या मालिकेमधून लोकप्रिय झाला.
भैय्यासाहेब ही खलनायिकाची भूमिका त्यानं केली होती. अजय आणि शितलच्या प्रेमात अडसर ठरणारा त्याचा भैय्यासाहेब चांगलाच लोकप्रिय ठरला. आता देवमाणूस मध्ये या मालिकेत किरण प्रमुख भूमिकेत असला तरी त्याची ही भूमिकाही खलनायिकी स्वरुपाची असल्यानं त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याच किरणचे अभिनेत्री मोनालिसा बागल सोबत मुंडावळ्या लावलेले फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा किरण आणि मोनालिसाच्या लग्नाची चर्चा होती. मात्र टोटल हुबलक या मालिकेच्या प्रमोशननिमित्त हे फोटो व्हायरल केल्याचं नंतर स्पष्ट झालं. एकूण किरण गायकवाड हा कलाकार सध्या चर्चेत आहे. किरण मूळ पुणेकर आहे. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं आहे. शालेय
जीवनापासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती. त्यामुळे शिक्षण पू्र्ण झाल्यावर किरण मुंबईत आला. त्यानं वायझेड, बसस्टॉप, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातूनही भूमिका केल्या आहेत. आता देवमाणूस या मालिकेतून किरणच्या अभिनयाची वेगळी बाजू पहायला मिळणार आहे.
https://www.facebook.com/kirangaikwadofficial/videos/991997194547631/समाजातील अपप्रवृत्तींविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मालिका केल्याचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी स्पष्ट केले. सध्या या मालिकेचे चित्रीकरण साता-यात होत आहे. ३१ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोवरुन अनेकांनी सोशल मिडीयावरुन नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात ही नारीजी म्हणजे किरणच्या अभिनयाची पावती आहे. आता 31 ऑगस्टपासून ही मालिका सुरु झाल्यावर किरण गायकवाडचा डॉक्टर कुठल्या सत्यघटनेवर आधारीत आहे हे स्पष्ट होईल…