‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गणपती रुईया नाक्याचा
सध्या कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे प्रोमो भलतेच गाजत आहेत. यात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. ती रुईया कॉलेजची बी एम एम पदवीधर आहे. तिने याआधी ‘मेरे रंग में रंगनेवाली’, यह रिश्ता या कहलाता हैं’ या हिंदी मालिकांत भूमिका केल्या आहेत. तसेच ‘सावधान इंडिया’, ‘यह इष्क नहीं आसान’ या मालिकेतही काम केले आहे.
आपल्या गणपती उत्सवाबद्दलच्या आठवणी सांगताना अक्षया म्हणते,” माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा येतो. आम्ही सर्व मित्र मैत्रिणी एकत्रजमतो. दरवर्षी घरी येणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या परिवारात कायम वाढ होत असते आणि हा बाप्पाचा उत्सव हे एक गेट टुगेदर होऊन जाते. रुईया कॉलेजची असल्याने अर्थातच रुईयाचा गणपती अर्थात ‘विद्यार्थ्यांचा राजा’ हा मला खूप जवळचा वाटतो. रुईया कॉलेजच्या या ‘विद्यार्थ्यांचा राजा’ असलेल्या बाप्पाचे आगमन मी कधीच विसरणार नाही . आम्ही सगळे रुईया कॉलेजातील
विद्यार्थी विद्यार्थिनी आगमनाच्या ढोल ताशाच्या गजरात बेभान होऊन नाचतो. आमच्या रुईयाच्या गणपतीसाठी दरवर्षी एक संकल्पना असते आणि त्या सजावटीसाठी सुद्धा आम्ही मदत करत असतो. हा आपल्या घरचाच बाप्पा आहे, अशी आमची भावना असते. मी या बाप्पाला देखील एक दिवस प्रसाद देते. तिथे आरतीसाठी देखील आवर्जून उपस्थित असते. तसेच आम्ही मित्र मैत्रिणी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर सुद्धा या उत्सवाच्या निमित्ताने रुईया नाक्यावर एकत्र भेटतो. मग एक दिवस ठरवून सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी सुद्धा गणपती दर्शनाला जातो. आमच्या कॉलनीत देखील सार्वजनिक गणेशोत्सव असतो. त्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत माझा सहभाग असतो. आता मात्र यावर्षी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ च्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने यावर्षी घरच्या गणपतीला आणि रुईयाच्या आमच्या ‘विद्यार्थ्यांचा राजा’ असलेल्या गणपतीच्या दर्शनाला जाता येत नाही, याची खंत जाणवत आहे, हे नक्की.”