‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शाहरुखने ठेवलं होतं संगीतकारांना डांबून!
फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी शाहरूख खानने ठेवलेलं संगीतकारांना डांबून
फिर भी दिल है हिंदुस्थानी चित्रपट आणि त्याची गाणी आजही आपल्याला लक्षात आहेत. त्याच्या निर्मितीचा एक किस्सा प्रचलित आहे.
या गाण्याची चाल संगीतकार जतिन ललित यांना सुचत नव्हती.सुरेल आणि चटपटीत संगीतरचना त्यांना लक्षात येत नव्हती. हे गीत प्रेक्षकांना सहज गाता येईल, अशा प्रकारची चाल त्यावेळी अपेक्षित होती. पण संगीतकार जतिन ललित सर्जनशील ब्लॉकमध्ये अडकले होते.
याबद्दल बोलताना जतिन पंडित सांगतात की शाहरूख खानबरोबर मला काम करायला फार आवडतं, याचं कारण तो आपल्या कामाशी पूर्णपणे कटिबध्द असतो आणि अशीच सर्जनशीलता अन्य कर्मचारी आणि कलाकारांकडूनही दाखविली जावी, अशी त्याची अपेक्षा असते.
या चित्रपटासाठी संगीत देत असताना शाहरुख खानने एका रात्री जतिन ललित यांना रेकॉर्डिंग स्टुडिओत कोंडून ठेवलं आणि त्यांच्या घरी निरोप पाठविला की घरी येण्यास उशीर होईल. या शीर्षकगीतासाठी त्याच रात्री चाल लावली पाहिजे, यावर तो ठाम होता.
या अनुभवाला दुजोरा देताना जतिन पंडित म्हणाला, “पण त्या रात्री आम्हाला संगीत देताना खूपच धमाल आली. सुरुवातीला आम्हाला धक्का बसला खरा आणि जावेदजींनी (कवी जावेद अख्तर) यांनीही त्याला सांगितलं की गाणी अशा प्रकारे बनत नाहीत, त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. पण शाहरूख खान आणि जूही चावला हे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.
अखेरीस त्या रात्री बऱ्याच विचारानंतर गाण्याचा मुखडा तयार केला आणि साऱ्या गाण्याचं सार हे त्या मुखड्यातच साठलेलं आहे. त्यानंतर ती चाल सुरळीतपणे सुचत गेली. मात्र आजही शाहरुख खान यांचा हा किस्सा सर्वांना लक्षात आहे.
हेच सारे अनुभव टीव्हीवर आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.झी टीव्ही’च्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा भेटू लागल्या आहेत. या वाहिनीवर ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या सांगीतिक कार्यक्रमाचेही जोरदार पुनरागमन झाले आहे. त्यात बॉलीवूडमधील आघाडीचे सेलिब्रिटी आपली कारकीर्द, प्रणय आणि बॉलीवूडमध्ये चर्चित असलेल्या सर्व विषयांवर आपली मते आणि वैयक्तिक आठवणी सादर करतात.
या कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत संगीतकार जतिन-ललित ही जोडी सहभागी होऊन अनुभवकथन करणार आहे.