‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
एखादे गीत कधीकधी वेगळ्याच चित्रपटासाठी लिहिलं जातं आणि मग ते दुसऱ्याच चित्रपटासाठी चित्रित केलं जातं . जयश्री गडकर ‘अमृतवेल ‘ चित्रपटाची निर्मिती करत होत्या . पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना गाणी लिहिण्यासाठी बोलावले . आठ दिवस सुरेश भट यांचे वास्तव्य हॉटेलमध्ये होते, पण त्यांना गाणी सुचत नव्हती . शेवटी बजेट न परवडल्याने सुरेश भट यांनी हॉटेल सोडावे असे ठरले . जेव्हा हॉटेल मधून ते आमदार निवास येथे गाडीतून जात होते ,तेव्हा सुरेश भट जयश्री गडकर यांना म्हणाले ,” मला पटकन एक वही किंवा कागद द्या ,मला शब्द सुचत आहेत . ” त्यांनी पटकन गाणे लिहून जयश्रीबाईंना दिले . ते शब्द होते “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ” . निर्माती या नात्याने जयश्रीबाईंनी भट यांना पंधरा हजार रुपयांचा चेक दिला . तेव्हा भट म्हणाले ,” काव्य ही ईश्वराची देणगी आहे ,ते मला आत्ता पटकन सुचले ,त्याचे मी पैसे घेणार नाही . ” त्यांनी धनादेश परत केला . काही कारणास्तव तो चित्रपट पूर्ण झालाच नाही . पण मग पुढे जब्बार पटेल यांनी ‘उंबरठा ‘ चित्रपटाकरिता हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित केले . संगीतकार अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर होते . हे गीत स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झाले आहे .
” सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ,तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मलाही अजूनही चांदरात आहे “
गणेश आचवल