Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मराठी कलाकारांची दमदार वेब एन्ट्री

 मराठी कलाकारांची दमदार वेब एन्ट्री
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

मराठी कलाकारांची दमदार वेब एन्ट्री

by Kalakruti Bureau 13/04/2020

हल्ली आपल्याला  काही वेगळं किंवा नव्या विषयांवर भाष्य करणाऱ्या अनेक वेब सिरीज बघायला मिळतात. नेटफ्लिक्स , प्राईम , वुट , हॉटस्टार सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म  अनेक नव्या वेबसिरिज येतात. हा वेब सिरीज चा बोलबाला खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक मराठी कलाकार आपल्याला हल्ली हिंदी आणि इंग्रजी वेब सिरीज मध्ये काम करताना दिसतात.अनेक गाजलेल्या वेब सिरीज मध्ये मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे आणि आपलं पात्र एकदम सुपर हिट केलंय. आज आपण अश्याच काही मराठी कलाकारांबद्दल जाणून घेऊ या ज्यांनी अनेक हिंदी , इंग्रजी वेब सिरीज मध्ये आपल्या अभिनयायाने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत. 

    सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज आपल्या सगळयांना माहीत आहेत यातली खूप गाजलेली पात्र अनेक मराठी कलाकारांनी साकारली आहेत. यातली अनेक पात्र ही प्रेक्षकांच्या मनात आज सुद्धा आहे.पोलीस इन्स्पेक्टर काटेकर ची भूमिका साकारणारा जितेंद्र जोशी, अंजली माथूर म्हणजे राधिका आपटे या दोघांची भूमिका या सिरीज मध्ये अगदी कमालीची आहे. या सोबत सुभद्रा च पात्र साकारणाऱ्या  राजश्री देशपांडे, तिकडे काटेकर ची बायको साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे, अमेय वाघ, स्मिता तांबे अशी अनेक मराठी कलाकार मंडळी या वेब सिरीज मधून झळकली आहेत. 

नुकतीच वुट वर आलेली ” असुर ” या क्राइम थ्रिल वेब सिरीज मधून अमेय वाघ आपल्या भेटीला आला होता. अमेय वाघ हा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येत असतो त्याने हा डिजिटल प्लॅटफॉर्म खूप वेगळ्या तऱ्हेन हाताळला आहे. अमेय वाघ ने रसूल शेख ची हटके भूमिका साकारली आहे, टेक्नॉलॉजी चं वेगळं थ्रिल आणि अमेय च्या कामाचं कौतुक यात करावं तितकं कमीच आहे.” द रायकर केस ” या नुकत्याच आलेल्या या वेब सिरीज मध्ये अनेक मराठी कलाकार आहेत. ही हिंदी वेब सिरीज असून यात दिग्गज अभिनेत्री अश्विनी भावे , अतुल कुलकर्णी , ललित प्रभाकर , मनवा नाईक अशी मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांची टीम यात बघायला मिळते. 

   हॉटस्टार वर आलेली ” सिटी ऑफ ड्रीम्स ” या कमालीच्या सिरीज मध्ये मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची वेगळीच बाजू मांडली आहे. २०१९ साली आलेल्या या वेब सिरीज मध्ये कौटुंबिक राजकारण अनुभवयाला मिळालं .प्रिया- सिद्धार्थ यांची भाऊ बहिणीची जोडी सगळ्यांची मन जिंकून घेतात आणि मग पुढे चालू होतो पॉलिटीकल फॅमिली ड्रामा.  अतुल कुलकर्णी , सचिन पिळगावकर , संदीप कुलकर्णी , उदय टिकेकर अशी बरीच मराठी मंडळी या सिरीज मध्ये दिसली. मराठी कलाकारांचा हा वेब कडे वाढणारा कल हा वाढत आहे. 

     मराठी कलाकार हे नाटक , चित्रपट , मालिका सोबत आता आपल्याला मराठीच्या सोबतीने हिंदी आणि इंग्रजी वेब सिरीज मधून देखील बघायला मिळतात. मराठी इंडस्ट्री साठी ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयाचा जोरावर काम मिळवत जातो. सध्याच्या जमान्यात सगळ्यांना वेब सिरीज ची एक वेगळीच कुतुहलता निर्माण झाली. मराठी कलाकार अगदी तोडीस तोड काम करत हिंदी आणि इंग्रजी वेब सीरिज मध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. कलाकारांच्या सोबत अनेक टेक्निकल टीम, दिग्दर्शक सुद्धा या सिरीज चा भाग आहेत.एकंदरीत मराठी कलाकार, दिग्दर्शक आणि टेक्निकल टीम असे सगळेच या वेब सिरीज शी जोडले गेले आहेत. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured movies Top Films Web series
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.