मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
तर अक्षय कुमार जाणार इंग्लंडला
जगभर करोनानं थैमान घातलं आहे. सर्व जग कोरोनाच्या जाळ्यात असतांना आपला ॲक्शन किंग म्हणजे अक्षय कुमार मात्र आगामी चित्रपटाच्या नियोजनामध्ये गुंतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अक्षयनं पुढील वर्षात येणा-या त्याच्या चित्रपटाची स्क्रीप्ट ओके करुन शुटींगच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बेल बॉटम असं या चित्रपटाचं नाव असून गुप्तहेराच्या जीवनावर आहे. 2 एप्रिल 2021 रोजी हा ॲक्शन पट रिलीज होईल, अशी घोषणा अक्षयनं केली आहे.
1980 च्या सुमारास घडलेल्या ख-या घटनेवर आधारीत हा चित्रपट असेल. एका भारतीय गुप्तहेराची आपबिती, बेल बॉटममध्ये आपल्याला बघता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अक्षयनं या कथेवर काम केलं. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचे शुटींग इंग्लडमध्ये करण्याच्या बेतात अक्षय कुमार आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी काढण्याचे काम चालू असून अक्षयची टीम लवकरच इंग्लडला जाणार आहे. असं झालं तर लॉकडाऊननंतर शुटींग चालू होणार बेल बॉटम हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारसह वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरैशी यांच्या भूमिका आहे. रंजीत तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. बेल बॉटमची कथा असीम अरोरा आणि परवेज शेख यांनी लिहीली आहे. वासू भगनानी, जैकी भगनानी, मोनिषा आडवाणी आणि निखिल आडवाणी या सर्वांची चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. बेल बॉटम याचं नावानं कन्नड चित्रपटही आलेला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी वर्मा यांच्या या कन्नड चित्रटाचा हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा होती. पण अक्षय कुमारनं या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. फक्त नाव आणि गुप्तहेर हे दोनच समान धागे या चित्रपटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाकी या दोन्ही चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा अक्षय कुमारनं केला आहे.
एकूण काय इकडे या कोरोनानं कितीही थैमान घातलं असलं तरी आपला खिलाडी जोरात आहे. अक्षयचे सूर्यवंशी, लक्षमी बम, गुड न्यूज, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अंतरंगी असे चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत उभे आहेत. या चित्रपटांच्या कामात सध्या अक्षय व्यस्त आहे. त्यानं नुकताच बेल बॉटम चित्रपटाच्या सहकलाकारांबरोबर फोट ट्विट केला आहे. लॉकडाऊनमध्ये जवळपास पाच महिने चित्रपटांचे शुटींग थांबले होते. आता अक्षयच्या पुढाकाराने कॅमे-यामागची हालचाल वाढणार आहे. यामुळे कलाकार जेवढे उत्सुक आहेत, त्यापेक्षा प्रोडक्शनची टीम अधिक उत्सुक आहे. बेल बॉटम चित्रपटात भारतीय गुप्तहेराची परदेशातली कामगिरी दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी ही सर्व टीम लवकरच लॉकडाऊनमुळे आलेले सर्व नियम पाळत इंग्लडला जाण्याच्या तयारीत आहे. अक्षयचा गुड न्यूज कधी येईल तेव्हा येईल. पण त्याच्या चाहत्यांसाठीच हिच गुड न्यूज ठरणार आहे. बेल बॉटम कधी येईल त्याचीच आता प्रतीक्षा…