‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेलो नावाची मोहिनी
जेनिफर लोपेझ ही हॉलिवूडची राणी आज वयाची पन्नाशी ओलांडतेय… करोडो… अरबोंची मालकीण असणारी जेनिफर अजूनही तरुणीला लाजवेल अशा उत्साहात वावरत असते… आपल्याला विश्वास वाटणार नाही एवढे व्यवसाय ती करतेय…
जेलो नावाची जादू…
काही व्यक्ती या एवढ्या जिद्दीच्या असतात की, त्या ज्याच्यावर बोट ठेवतात… त्या गोष्टी त्यांच्या होऊन जातात. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर लोपेझ ह्या अशा व्यक्तींपैकीच एक. आज जेनिफर वयाची पन्नाशी ओलांडतेय… पण जेनेफर कडे बघितलं की वाटतं का तिने वयाची पन्नाशी पार केलीय हे… नक्कीच नाही… रेड कार्पेटवर जेनिफर आली की देशविदेशातील कॅमेरामनची लगबग उडते… तिच्या लाखो छबी काढल्या जातात… जेनिफर म्हणजेच फॅशनचं दुसरं नाव…
न्युयॉर्कमध्ये जन्मलेली जेनिफर आज यशस्वी अभिनेत्री म्हणून हॉलिवूडवर हुकमत करत आहे. यासोबत तिच्या नशिल्या आवाजीची नशाही तेवढीच आहे. ती जेलो या नावानं हॉलिवूडमध्ये ओळखली जाते. जेनिफर अभिनेत्री म्हणून हॉलिवूडमध्ये दाखल झाली. पण त्यानंतर ती गायिका, निर्माता, फॅशन डिझायनर, टेलिव्हजन निर्माता म्हणून काम करु लागली. आता जेलो बिझनेस बुमन म्हणून ओळखली जाते. काही मोठी हॉटेल सुद्धा जेनिफरच्या नावावर आहेत. जेजे उत्तम तेते आपल्याला हवं असा जेनिफरचा स्वभाव.. त्यामुळं एका साधारण घरात लहानाची मोठी झालेली जेनिफर आता राजवाड्यासारख्या भव्य प्रासादामध्ये राहतेय. तिची सध्याची संपत्ती किती आहे, याचा कोणालाही अंदाज नाही. अमेरिकेच्या सर्व राज्यांमध्ये जेलोची घरं आणि संपत्ती असल्याची चर्चा आहे… फोर्ब्स मासिकाने तिला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मानाचे स्थान दिले आहे.
जेनिफर ओळखली जाते ती आपल्या अभिनयामुळे.. छोट्या पडद्यावर तिची कारकीर्द सुरु झाली. इन लिविंग कलर या हास्य कार्यक्रमात जेनिफर डान्सर होती. त्यानंतर सेलिना, एंजल आईस सारख्या चित्रपटांमधून तिनं हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. द सेल, द वेडींग प्लानर, मेड इन मैनहट्टन, शॅल वी डान्स सारख्या चित्रपटामधून तिची लोकप्रियता वाढली… आणि पुरुष सहकलाकांहून अधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जेनिफरची ओळख झाली. बरं फक्त अभिनयापुरती जेलो मर्यादीत नव्हती. तिच्याकडे अभिनयाबरोबर नशिला आवाज आणि नृत्याचे चांगले कसब आहे. जेलोनं आपला पहिला अल्बम ऑन द 6 आणला… त्यापाठोपाठ जेलो आला… त्यानंतर धिस इज मी हा अल्बम आला… जेनिफरचा नशिला आवाज… तिचे नृत्यकौशल्य आणि कपड्यांची भन्नाट फॅशन या जोरावर जेनिफर गायिका म्हणूनही प्रसिद्ध झाली. जगभरात तिचे 70 मिलियन अल्बम विकले गेल्याची नोंद झाली आहे… ग्रॅमी पुरस्कारामध्ये जणू जेनिफरचं नावचं लिहिलं गेलं. रिबर्थ, गेट राईट, होल्ड यू डाऊन हे तिचे अल्बम टॉपलिस्ट मध्ये काही वर्ष कायम राहिले.
लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना लोपेझनं निर्मितीच्या क्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवलं. डान्स लाईप हा तिचा पहिला कार्यक्रम. टीएलसी चॅनलवरील काही कार्यक्रम लोपेझनं तयार केले. स्वतः फॅशनच्या बाबतीत लोपेझ प्रचंड चोखंदळ आहे. तिने स्वतःचाच ब्रॅण्ड तयार केलाय. JLO बाई जेनिफ़र लोपेज़
या नावानं तिचा फॅशन ब्रॅण्ड आहे. यात जीन्सचा प्रामुख्याने समावेश आहे. बरं आपल्या कपड्याचा प्रसार करण्यासाठी जेनिफर काय करेल याचा भरवसा नाही. एकदा ती न्यू यॉर्कच्या रस्त्यावरून चालत असतानाचा तिचा एक फोटो वायरल झाला. त्यात तिने फक्त शर्ट घातलेला दिसला. आणि तिची पॅन्ट बरीच खाली आल्यासारखे वाटत होते. पण फोटो निट बघितल्यावर ती पॅन्ट नसून जीन्सच्या डिझाइनचे डेनीमचे बूट होते. फॅशनमध्ये अग्रेसर असलेल्या जेलोची कॅलिफोर्निया मध्ये मोठं हॉटेलही आहे. जेनिफर परफ्युमची निर्मितीही करते. तिची लाईव्ह लक्स, ग्लो आफ्टर डार्क, डेसियो फारेवर, डेसियो फॉर मेन, सनकिस्ड ग्लो सारखे परर्फ्युम आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंना विकले जातात. याशिवाय ती नयोरिकन प्रॉडक्शनची मालकीण आहे.
जेनिफर लोपेझ ही खरतर एका जिद्दीची कहाणी आहे. सामान्य घरातील मुलगी ते बिझनेस वुमन… अभिनेत्री… गायिका… असा तिचा प्रवास आहे… हा प्रवास असाच पुढे चालू रहाणार आहे…