Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

असं घडलं नटसम्राट मधील हे गाणं…

 असं घडलं नटसम्राट मधील हे गाणं…
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

असं घडलं नटसम्राट मधील हे गाणं…

by गणेश आचवाल 23/07/2020

आपल्या महाविद्यालयीन जीवनात सहज म्हणून बांधलेली एखादी चाल भविष्यात एखाद्या उत्कृष्ट चित्रपटात यशस्वी ठरू शकते. असं घडलं ‘नटसम्राट’ या चित्रपटातील ‘नात्यास नाव आपुल्या’ या गाण्याच्या बाबतीत. ‘नटसम्राट’ चित्रपटाचा संगीतकार अजित परब आहे. कॉलेजला असताना अजित परब, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, भूपाल पणशीकर असा त्यांचा ग्रुप होता.

कौशलने अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितांना चाल देऊन त्या गीतांचा ‘अमृताचा वसा’ नावाचा कार्यक्रम सुरु केला होता. त्यात अजित परब गायक होता. पण त्या ग्रुपमुळे प्रत्येकालाच मराठी कवितांना चाल देण्याचा एक छंद जडला होता. एकदा अजित परबने ‘कुसुमाग्रज’ यांच्या ‘नात्यास नाव आपुल्या’ या कवितेला चाल दिली होती. कमलेश आणि भूपाल ने सुद्धा काही कविता स्वरबद्ध केल्या होत्या.

अजितने ‘नात्यास नाव आपुल्या’ या कवितेला दिलेली चाल कौशल आणि सर्वांनाच आवडली होती. प्रतिभा दामले हिच्या आवाजात ते गीत ध्वनिमुद्रित केले होते. ते साल होते १९९६-९७. भविष्यात ते गाणे पुन्हा कधी कुठे वापरता येईल, असा काही तेव्हा विचार नव्हता. २०१५ साली ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अजित परब या चित्रपटाचा संगीतकार होता.

एकदा नाना पाटेकर शूटिंगच्या वेळी त्याला म्हणाले, “तू स्वतः पूर्वी एखादी केलेली चाल ऐकव ना.”

अजितला कुसुमाग्रजांची

“नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही”

ही कविता आणि त्याने दिलेली चाल आठवली. अजितने ती चाल ऐकवली. ‘नटसम्राट’ चित्रपट अर्थातच कुसुमाग्रजांच्या म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकाचं माध्यमांतर होतं. त्या चित्रपटासाठी गाणी करताना शिरवाडकरांचीच कविता आठवणे हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा. नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांच्यासह सर्वांनाच ती चाल आवडली. ते गीत चित्रपटात घ्यायचे ठरले.

संगीतकार या नात्याने अजितने फरक इतकाच केला की १९९६-९७ साली त्याने हे गीत दादऱ्यामध्ये बांधले होते. चित्रपटासाठी त्याने हे गीत स्वरबद्ध करताना केरव्याचा वापर केला. हे गीत विभावरी आपटे यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झाले. मुळात विभावरी आपटे यांच्या स्वरात अतिशय निरागसता, शुद्धता, साधेपणा आणि प्रगल्भता आहे आणि त्यामुळे विभावरी आपटे यांनी हे गीत गावे असे ठरले. या गाण्याचे चित्रण पाहिले की तुम्हाला लक्षात येईल की या गाण्यात चित्रपटातील वेगवेगळे प्रसंग दिसतात.

१९९६-९७ साली स्वरबद्ध केलेले कुसुमाग्रजांचे गीत २०१५ साली त्यांच्याच कथानकावर आधारित ‘नटसम्राट’ साठी पुन्हा रेकॉर्ड होणे, हे त्या गाण्याचे भाग्य म्हटले पाहिजे. या गीतासाठी संगीतकार अजित परब याचे खूप कौतुक झाले. मुख्य म्हणजे अनेकांनी  त्याला सांगितले की हे गीत ऐकताना संगीतकार श्रीनिवास खळे यांची आठवण झाली. हा अजितला मिळालेला उत्तम अभिप्राय होता. हे गीत खरोखरच आपल्याला १९६० -७० च्या दशकातील काळाची आठवण करून देते. संगीतातील मेलडी पुन्हा या गीताने अनुभवायला मिळते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Movie Marathi songs music songs
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.