‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चतुर ‘पडोसन’…
किशोरकुमार-महमूद या जोडीच्या ‘पडोसन’ (१९६८) या सिनेमाने विनोदी सिनेमाचा एक मापदंड निर्माण केला. हजार हशे वसूल करणारी हि प्रसन्न कॉमेडी पुढच्या अनेक सिनेमाची रोड मॅप ठरली. या सिनेमाच्या निर्मितीची कथा सिनेमा इतकीच रंजक आहे. ज्योती स्वरूपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील सुनील दत्तने साकारलेली ‘भोला’ची भूमिके करीता महमूदची पहिली पसंती पंचम तथा आर डी बर्मन होती.कारण आर डी ने महमूदच्या ‘भूत बंगला’ या सिनेमात एक छॊटी भूमिका केली होती. पण सचिनदांनी पंचमला संगीतावर लक्ष केंद्रीत करायला सांगितल्याने त्याने नकार दिला. सुनील दत्त मिलन,खानदान या कौटुंबिक भूमिकाच्या टाईप्ड साच्यातून बाहेर पडू इच्छित होता, त्यामुळे आनंदाने त्याने होकार दिला. सायराचा तेंव्हा नुकताच निकाह झाला होता. त्या वेळी दिलीपकुमारच्या ’राम और शाम’ च्या शूटींग करीता मद्रासला होता. सायराने महमूदला ’पडोसन’ची शूटींग मद्रासलाच करायला भाग पाडले.मग काय ’राम और शाम’ व ’पडोसन’ दोन्ही सिनेमाचे चित्रीकरण एकाच स्टुडिओत सुरू झाले.
महमूद त्या वेळी सायराला म्हणाला “ओव्हर नाईट मे तुम्हारा स्टेटस बदल गया है, कल तक मै तुमको बेटी कहके बुलाता था आज तुमको भाभी कहना पडेगा.’ सुनील दत्त – सायराचा हा पहिलाच सिनेमा. सायराचा जंगली प्रदर्शित झाला होता त्या वेळी सुनीलने तिला टेलीग्राम करून लिहिले होते ” यू आर अॅन अॅसेट टू जंगली. आय हॅव नेव्हर सीन सच अॅन इनोसंट फेस” त्यामुळे सायरा सुनील सोबत काम करायला उत्सुक होती. किशोरकुमार ने सुरूवातीला हा सिनेमा नाकारला होता कारण १९६६ साली आलेल्या श्रीधर च्या ’प्यार किये जा’ या सिनेमा करीता महमूदला त्याच्या पेक्षा जास्त मानधन मिळाले होते.पण महमूदला त्या भूमिकेकरीता किशोरच हवा होता.त्या मुळे त्याने दुप्पट मानधन देवून त्याला साईन केले.
किशोरने काय धमाल केलीय ! ’मेरी प्यारी बिंदू’ या गाण्यातील त्याची अदाकारी त्याच्या डान्स स्टेप्स या त्याने स्वत: कोरीओग्राफ केल्या होत्या.त्याने यातील गेट अप त्याच्या काकाला नजरेसमोर ठेवून केला ते क्लासिकल सिंगर होते व कायम पान खात असत!सिनेमातील हास्याचा उत्कट बिंदू म्हणजे ‘एक चतुर नार करके सिंगार’ हे गाणं! यात शेवटी मन्नाडे यांचा गाण्यात पराभव होतो याची कल्पना त्यांना नव्हती.कारण शास्त्रीय संगीतात ते सर्वांचे बाप होते.पण सिनेमाची सिच्युएशनच अशी होती की त्यांना पराभूत होणं हे क्रमप्राप्त होतं. अर्थात मन्ना समोर मी संगीतात बाजी या जन्मी मारू शकणार नाही अशी प्रांजळ कबुली किशोरने दिली.या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी मन्नाला काहीच कल्पना नसताना किशोरने अचानक ’ओ टेढे सीधे हो जारे…’ म्हणत सूत्र हातात घेवून गाणं कंप्लीट करून टाकलं.त्या मुळे यातील काही ओळी मग महमूद ने गायल्या होत्या!