‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एकात्मकतेचं सांगीतिक प्रतिक
राष्ट्रगीतानंतर ज्या गीताला अफाट लोकप्रियता लाभली ते गीत म्हणजे ’मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’.१५ ऑगष्ट १९८८ रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण व भाषण केल्यावर लगेचच याचे याचे प्रक्षेपण पहिल्यांदा दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून करण्यात आले आणि तमाम भारतीयांनी त्याचे उत्साहात स्वागत केले.
लोक सेवा संचार परिषद द्वारा निर्मित या गीताच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा होता संगीतकार अशोक पत्की यांचा! या गीताच्या निर्मितीची कथा त्यांनी आपल्या पुस्तकातून अतिशय सुरेलप्रमाणे मांडली आहे.पत्की जिंगल्स चे बादशहा आहेत.या गीताच्या सुरूवातीच्या दोनच ओळी त्यांच्याकडे आल्या.पत्कींच्या हातात कागद आला की दुसर्या क्षणापासून त्यांच्या मनात चाल सुचायला सुरूवात होते.
या दोन ओळींना त्यांनी पहिली चाल यमन रागात दुसरी भीमपलास मध्ये आणि तिसरी भैरवी मध्ये चाल लावली.या तिन्ही चाली त्यांनी टिम मधील सर्वांना ऐकवल्या.भैरवीची चाल सर्वांना आवडली.या ओळींच्या पुढे बारा-तेरा भाषातल्या स्क्रिप्ट मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत या गीताचा प्रवास होणार होता.सुरूवातीच्या ओळी पंडीत भीमसेन जोशी गाणार होते.
ध्वनीमुद्रणाच्या वेळी या ओळींकरीता दिलेल्या ४५ सेंकदात काही केल्या गणित जमत नव्हतं.गायला सुरूवात करा म्हटल्यावर पत्की पंडीतजींना खूण करायचे पंडीतजी तंबोरा वाजविणार्यांना खूण करायचे यामुळे वेळ वाढत होता.पंडीतजींचही बरोबर होतं सूर मिळाल्याशिवाय ते गाणार कसे? शेवटी पत्की रेकॉर्डीस्ट सूद यांना म्हणाले ” त्यांना त्यांच्या पध्दतीने गाऊ दे आपण एडीट नंतर करूया .” ही मात्रा लागू पडली.पंडितजींचा भारदस्त आवाज, सुंदर चाल, नाना मुळेंचा तबला.. सगळं जमून आलं होतं.
त्यानंतर काश्मिरी भाषेचा सुपरवायझर आला. तोच लेखक आणि तोच गाणार होता. प्रोडय़ूसर मलिकचा एकच आग्रह होता- ‘मीटर बदललं तरी चालेल, पण ऐकताना ‘मिले सूर’ची ओरिजिनल सुरावट ऐकतोय असं वाटायला हवं.’ या वेळी एक अडचण आली कश्मीरी भाषेच्या रेकॉडींगच्या वेळी नेमकं संतूर हे वाद्य नव्हतं.साइड र्हिदम-प्लेअर दीपक बोरकर यांच्याकडील हार्पवरच संतूरचा इफेक्ट मिळविला!
कविता कृष्णमूर्ती व पंकज मित्रा यांच्या आवाजातलं बंगालीतला पोर्शन केला.प्रत्येक भाषेसाठी ठराविक सेकंद मिळाले होते त्यात ते संपवण गरजेचं होतं.भारतातील विविध प्रांताच्या संस्कृतीचा फील तिथे येणं आवश्यक असल्याने अशोक पत्की विशेष मेहनत घेत होते.तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड भाषांतील गाण्यांसाठी आणि सुपरव्हायजर म्हणून ती- ती माणसं हजरच होती.
रघू व कुरुविला अशी दोन गायक मंडळी व एम. पी. शर्मा, नानप्पन व बाकी भाषेवर प्रभुत्व असणारी मंडळी तिथे उपस्थित होती.या गीताची सुरूवात भीमसेनजींच्या स्वरात झाली असल्याने शेवट देखील(सूर की नदीया…) तितकाच शाही स्वरात होण्यासाठी सूरश्री लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला.
लता दिदी नेमक्या त्याचवेळी परदेशात असल्याने कविता कृष्णमूर्तीच्या स्वरात रेकॉर्ड केलं गेलं.कारण या गीताच्या व्हीडीओ चित्रीकरणाच्या तारखा ठरल्या होत्या.काही दिवसांनी लताने त्या गीताचे डबींग केले.त्याच दिवशी दीदींचं शूटिंगही वेस्टर्न आऊटडोअरमध्ये होतं.लुईस बॅंक्स यांनी हे सारे सूरांचे तुकडे एकत्र गुंफले.हा राष्ट्रीय एकात्मतेचा व्हीडिओ फार सुंदर बनला होता.आज तीस वर्षाचा कालावधी उलटला तरी या गीताची खुमारी काही कमी होत नाही