‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘ती’च्या जाण्यानं आजही चुकतो रसिकांचा ‘काळजाचा ठोका’
दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या. स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.
मुंबई महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेवर ३० मिनिटांच्या डॉक्युमेंटरीचीही त्यांनी निर्मिती केली होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने या डॉक्युमेंटरीतून संदेश दिला होता.
स्मिता तळवलकर या ‘तळवलकर’ जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.
मराठी चित्रपटांमधील कसदार अभिनय रसिकांना चांगला भावला. मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ ह्या हिंदी मालिकांमध्येही त्या दिसल्या.
‘अडगुलं मडगुलं’, ‘एक होती वाडी’, ‘चौकट राजा’, ‘शिवरायांची सून ताराराणी’ (भूमिका – येसूबाई), ‘जन्म’, ‘टोपी घाला रे’, ‘सातच्या आत घरात’ आदी चित्रपटांमध्ये तर ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ नाटकात जनाबाईची भूमिका केली होती. त्यांनी काही चित्रपटाच्या निर्मात्याही आहेत. ‘कळत नकळत’ (१९८९), ‘चौकट राजा’, ‘तु तिथे मी’ (१९९८) या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार तर महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ‘सवत माझी लाडकी’ या चित्रटपाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
कॅन्सरने त्रस्त असलेल्या स्मिता तळवलकर यांनी ५९ वर्षी अखेरच श्वास घेतला. ‘चौकट राजा’ चित्रपटातील ‘एक झोका…चुके काळजाचा ठोका’ हे गाणं आजही प्रेक्षक आवर्जून ऐकतात.
‘चौकट राजा’ फेम दिग्गज अभिनेत्री ‘स्मिता तळवलकर’ यांच्या स्मृतीस ‘कलाकृती मिडिया’कडून विनम्र अभिवादन!