नयिकेची होणार खलनायिका! अभिनेत्री Akshaya Hindalkar ची होणार अबोली मालिकेत एण्ट्री…

लाडक्या आजीच्या आठवणींना उजाळा
मराठी टी.व्ही मालिकेतली सगळ्यांची लाडकी आजी, अभिनेत्री शुभांगी जोशी.
आपल्या सहज अभिनयानं ज्येष्ठ अभिनेत्री ‘शुभांगी जोशी’ घराघरात पोहचल्या आणि बघता-बघता प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनून गेल्या. ‘आभाळमाया’ मालिकेत ‘अक्का’, ‘कुंकु टिकली आणि टॅटू’ मध्ये ‘जीजी’, ‘काहे दिया परदेस’मध्ये गौरीच्या आजीची भूमिका त्यांनी केली. यात विशेषत: गौरीच्या आजीची भूमिका चांगली गाजली. ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील त्यांचा मालवणी लहेजा, मालिकेतील जावई मोहन जोशींशी उडणारे खटके प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.
शुभांगी जोशी यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. आणि ५ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांची प्राणज्योत मालावली.
कलाकृती मिडीयाकडून त्यांस स्मृतीस विनम्र अभिवादन !