लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

‘द रॉक’चा ब्लॅक ॲडम…
हॉलिवूडमध्ये ‘द रॉक’ म्हणून प्रसिद्ध असणा-या डेवन जॉन्सन याने नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. ब्लॅक ॲडम या चित्रपटात डेवननं पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिका केली आहे. डेवनच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी होती…मात्र या बातमीमुळे आनंदीत झालेल्या द रॉकच्या चाहत्यांसाठी एक काळजीत टाकणारी बातमी आली, ती म्हणजे डेवन जॉन्सन आणि त्याच्या कुटुंबियांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अठ्ठेचाळीस वर्षाच्या डेवनवर आणि त्याच्या कुटुंबियांवर आता उपचार सुरु आहेत.
द रनडाउन, बी कूल, वाकिंग टाल, ग्रिडआयरन गैंग, द गेम प्लैन, गेट स्मार्ट, रेस तिसरी दुनिया तक, प्लैनेट 51, टूथ फेरी, डूम, द ऑदर गाईज़, फास्टर और हाल यासारख्या हिट चित्रपटांमुळे डेवनचे चाहते जगभरात आहेत. सहा फूट पाच इंच उंची आणि त्या उंचीला साजेसे पिळदार शरीर असलेल्या डेवन ॲक्शनपटांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय त्यात विनोदाची झालर असलेल्या संवादासाठीही त्याचे चित्रपट पाहिले जातात. हाच डेवन पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत झळकणार आहे.
ब्लॅक ॲडम या त्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलज झाला. डवेन यात मुख्य भूमिकेत असला तरी त्याची भूमिका निगेटीव्ह आहे. याची झलक टीजरमध्ये बघायला मिळते. डीसी कॉमिक्समधील एक काल्पनिक देश, खानडकमध्ये ब्लॅक ॲडम हे नाव एका गुलाम व्यक्तीसाठी ठेवलं जातं. त्याला नंतर सुपर पॉवर मिळतात. पण यातच काही नकारात्मक शक्ती जन्म घेतात. या शक्तींचा चुकीचा वापर करण्यात येतो. त्यानंतर ब्लॅक ॲडमला बंदी बनवण्यात येतं. पण पाच हजार वर्षांनी तो सुटून पुन्हा येतो, आता त्याला जगावर राज्य करायचं आहे.
ब्लॅक ॲडम चित्रपटाचं दिग्दर्शन ‘जाउमे कोलेट सेरा’ यांनी केलं आहे. अर्थात चित्रपटाचा निर्माता स्वतः डवेन जॉन्सन आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होईल. डवेनच्या चाहत्यांसाठी त्याचा चित्रपट येतोय, ही आनंदाची बातमी असली तरी, त्यासाठी किमान वर्षभर वाट पहावी लागणार आहे.
डवेनच्या ब्लॅक ॲडमची घोषणा झाली, चित्रपटाच्या टिझरला त्याच्या लाखो चाहत्यांनी लाईक केलं आणि त्याचवेळी बातमी आली, की डवेन आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. या बातमीमुळे डवेनच्या चाहत्यांची अवस्था एका डोळ्यात हसू तर दुस-या डोळ्यात अश्रू अशी झाली आहे.