‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
किती ते अंदाज..!
आपल्या हिंदी सिनेमाच्या दुनियेत काही टायटल्स हे यशाला बरोबर घेऊनच येतात. या नावाचे जितके सिनेमे बनतात, ते सर्व सुपर हिट होतात. असलं भाग्य लाभलं ‘अंदाज’ या टायटलला. या नावाचे आजवर चार सिनेमे आले व चारही अफाट यशस्वी ठरले.
पहिला ‘अंदाज’ आला होता १९४९ साली मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला. यात दिलीपकुमार- नर्गीस-राजकपूर हा प्रणयी त्रिकोण होता. या सिनेमाने हिंदी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलवून टाकला. हि एक नांदी होती येणार्या सुवर्णकाळाची. या सिनेमात राज श्रेष्ठ की दिलीप, हा वाद मागच्या तीन पिढ्या सोडवू शकल्या नाहीत. शेवटी या दोघांपेक्षा नर्गीसच ग्रेट, असा सर्वमान्य तोडगा काढला गेला. या सिनेमातील मजरूहच्या गाण्यांनी व नौशादच्या संगीतांनी कानसेनांना तृप्त केले. राज करीता रफी आणि दिलीप करीता मुकेश, असा अभिनव प्रयोग केला गेला. झूम झूम के नाचो आज गाओ आज, हम आज कही दिल खो बैठे, तू कहे अगर जीवन भर मै गीत सुनाता जाऊं, उठाये जा उनके सितम, डर ना मोहब्बत करले, टूटे ना दिल टूटे ना…या गाण्यांनी सिनेमाच्या यशाला चार चांद लावले.
यानंतरचा ‘अंदाज’ आला १९७१ साली. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात विधवा व विधुर यांच्या विवाहाची कहाणी फार सुंदर रितीने चितारली होती. शम्मी कपूर आणि हेमा मालीनी या जोडीचा हा एकमेव चित्रपट. पणपण यात खरा चमकून गेला स्पेशल अॅपीयरन्स दाखवून गेलेला राजेश खन्ना. मोठ्ठा गॉगल लावून मरीन ड्राईव्हवर बुलेटवर कोवळ्या हेमाला फिरवीत गायलेलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ त्या वर्षीचं बिनाका टॉप ठरलं. यातील दिल उसे दो जो जान दे दे जान उसे दो जो दिल दे दे, सुनलो सुनाता हूं तुमको कहानी, है ना बोलो बोलो, हि गाणी व यात काम केलेल्या दोन बाल कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. सलीम जावेद यांनी पहिल्यांदा या सिनेमापासून एकत्र संवाद लिहायला सुरूवात केली. हसरतची गाणी (त्यांना फिल्म फेअर मिळाले होते) व शंकर जयकिशन यांचं संगीत प्रचंड गाजलं.
या नंतरचा ‘अंदाज’ आला होता १९९४ साली. डेव्हीड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनिल कपूर-जूही चावला-करीश्मा कपूर असा प्रणयी त्रिकोण होता. शिक्षक व विद्यार्थिनी अशी लव्ह स्टोरी यात होती. बप्पीचं संगीत यथातथाच होतं; पण डेव्हीडच्या खास शैलीने सजलेला हा सिनेमा गाजला.
२००३ साली राज कंवर यांनी अक्षय कुमार – लारा दत्त – प्रियांका चोप्रा या तिघांना घेऊन ‘अंदाज’ दिग्दर्शित केला. त्यात या दोन्ही नायिकांचा हा पहिला सिनेमा होता. दोघींनी फिल्म फेअर पटकावले. नदीम श्रवणच्या संगीताने सिनेमाला हात भार लावला. या चार ‘अंदाज’चा एकत्रित विचार केला, तर चारही सिनेमात प्रणयी त्रिकोण होते व सिनेमे संगीतमय होते.
‘अंदाज’ या टायटलची जादू ओळखून राजकुमार संतोषी यांनी १९९४ साली ‘अंदाज अपना अपना’ या विनोदीपटाला दिग्दर्शित केले. अमीर खान, सलमान खान या जोडीचा हा एकमेव सिनेमा. यांच्या जोडीला या सिनेमात रवीना, करीष्मा,परेश रावल व शक्ती कपूर होते. ओपी स्टाईलने तुषार भाटीयाने दिलेलं संगीत हा ही एक चर्चेचा विषय झाला होता.पहिल्या रनला सिनेमाला फारसे यश मिळाले नसले, तरी रिपीट रनला याने उदंड यश मिळविले.