Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

‘आई कुठे….’ मालिका घेणार नवीन वळण?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेची कथा उत्कंठावर्धक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या दोघांचं लग्न करण्याचं घरच्यांनी ठरवलं आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु झालीय. घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे या दोघांच्या लग्नाची धामधूम सुरु असताना संजना आणि अनिरुद्धच्या नात्याचाही उलगडा होणार की काय, अशी परिस्थीती निर्माण झालीय. या दोघांच्या नात्याबद्दल हळूहळू सर्वांनाच कल्पना येऊ लागली आहे. हळदी समारंभाच्या कार्यक्रमात तर संजनाच्या बेफाम वागण्यामुळे अरुंधतीच्या मनातही शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्टी हळद अनिरुद्ध आणि अरुंधतीचा संसार रंगवणार की मोडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.