‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
निर्लज्ज बॉलिवूडकर
आरे लाजा वाटायला पायजेत.
खरोकर चोपायला पायजे एकेकाला. कुठला सेलिब्रेटी आन काय.. रस्त्यावर दिसला ही हाणायला पायजे असं वाटतं कधीकधी. तसं आपण करणार नाही हे आलंच ओघानं. कारण आपण सहनशील आणि विवेकी माणसं आहोत. धनंजय माने जरा जास्तच विवेकी आहेत. आता काय बोलायचं आणि कुठून सुरूवात करायची असं झालंय. लाजा म्हणून नाहीत हो या बॉलिवूडच्या लोकांना.
ती कंगना तोंडाचा पट्टा सुटल्यासारखं काय वाट्टेल ते बोलायला लागली आहे. पण एक पोट्टा यावर काही बोलायला तयार नाही. सुशांत गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिंन आपला पट्टा सुरू केला. आधी करण जोहर, सलमान खान, महेश भट्ट, आदित्य चोप्रा ही मंडळी झाली. मग आलिया भट, तापसी पन्नू, स्वरा भास्कर या नट्या झाल्या. त्यानंतर रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल हे लोक झाले. हे सगळं सुरू असताना अधेमधे आपली नेतेमंडळी होतीच तिला तोंडीलावणं म्हणून. अरे पण किती? ही बाई आता थेट आपले खासदार, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना बोलायला लागली. पण यापैखी एकही जण त्याविरोधा बोलायला तयार नाही. कमाल आहे.
अरे ज्या बॉलिवूडनं तुम्हाला पैसा प्रसिद्धी ग्लॅमर सगळं दिलं त्या बॉलिवूडला ती बया कंगना.. डायरेक्ट गटार म्हणाली.. आणि त्यावर यातला एकही सेलिब्रेटी बोलला नाही. आरे हुडुत. तुम्हालाच म्हणतोय.. तुम्हीच. हा कॉलम वाचणारे.. तुमचा आवडता हिरो कोण? सलमान? शाहरूख? आमीर? मग कोण? अक्षयकुमार? ह्रतिक रोशन? रणवीर सिंग? अरे एकजण बोलायला तयार नाही. ही मंडळी सोडा. अरे खुद्द बच्चन साहेब. अमिताभ बच्चन गप्प आहेत. आरारारारा.. लाज वाटली पायजे राव. या बच्चन साहेबांना परवा कुणीतरी ट्रोल केलं तर लगेच माझा फॉलोअर हा माझं कुटुंब आहे त्यांना एक आदेश दिला तर ते तुम्हाला ठोकून काढतील असं सुनावणारे बच्चन.. आता बॉलिवूडलाच गटार म्हणणाऱ्या मुलीविरोधात अवाक्षर काढत नाहीत याला काय म्हणणार?
अरे यापेक्षा आमचे मराठी कलाकार परवडले. ते बोलले नाहीतच. पण निदान सोशल मीडियामध्ये तर व्यक्त झाले. मुंबईत राहून.. इथंल्या सगळ्या व्यवस्था भोगून आमच्या मुंबईला बोल लावणाऱ्या त्या वाचाळवीर बाईला एकजण सुनावत नाही ही खेदाची बाब आहे. आता आणि काय लिहायचं.. तुम्हीच कुणाला फॉलो करताय बघा. हॅव अ गट्स..
मानेंना हे आवडलं नाहीय. तुम्हाला आवडलंय का? नसेल तर सोशल मीडियावर तुमच्या आवडत्या कलाकाराला करा टॅग आणि सांगा की बोल म्हणून.. येवढं तर करूच शकता.. आईच्या गावात. आजचा इतका डोस पुरे. रजा द्या.