Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

निर्लज्ज बॉलिवूडकर

 निर्लज्ज बॉलिवूडकर
आईच्या गावात

निर्लज्ज बॉलिवूडकर

by Kalakruti Bureau 10/09/2020

आरे लाजा वाटायला पायजेत.
खरोकर चोपायला पायजे एकेकाला. कुठला सेलिब्रेटी आन काय.. रस्त्यावर दिसला ही हाणायला पायजे असं वाटतं कधीकधी. तसं आपण करणार नाही हे आलंच ओघानं. कारण आपण सहनशील आणि विवेकी माणसं आहोत. धनंजय माने जरा जास्तच विवेकी आहेत. आता काय बोलायचं आणि कुठून सुरूवात करायची असं झालंय. लाजा म्हणून नाहीत हो या बॉलिवूडच्या लोकांना.

ती कंगना तोंडाचा पट्टा सुटल्यासारखं काय वाट्टेल ते बोलायला लागली आहे. पण एक पोट्टा यावर काही बोलायला तयार नाही. सुशांत गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिंन आपला पट्टा सुरू केला. आधी करण जोहर, सलमान खान, महेश भट्ट, आदित्य चोप्रा ही मंडळी झाली. मग आलिया भट, तापसी पन्नू, स्वरा भास्कर या नट्या झाल्या. त्यानंतर रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल हे लोक झाले. हे सगळं सुरू असताना अधेमधे आपली नेतेमंडळी होतीच तिला तोंडीलावणं म्हणून. अरे पण किती? ही बाई आता थेट आपले खासदार, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना बोलायला लागली. पण यापैखी एकही जण त्याविरोधा बोलायला तयार नाही. कमाल आहे.

अरे ज्या बॉलिवूडनं तुम्हाला पैसा प्रसिद्धी ग्लॅमर सगळं दिलं त्या बॉलिवूडला ती बया कंगना.. डायरेक्ट गटार म्हणाली.. आणि त्यावर यातला एकही सेलिब्रेटी बोलला नाही. आरे हुडुत. तुम्हालाच म्हणतोय.. तुम्हीच. हा कॉलम वाचणारे.. तुमचा आवडता हिरो कोण? सलमान? शाहरूख? आमीर? मग कोण? अक्षयकुमार? ह्रतिक रोशन? रणवीर सिंग? अरे एकजण बोलायला तयार नाही. ही मंडळी सोडा. अरे खुद्द बच्चन साहेब. अमिताभ बच्चन गप्प आहेत. आरारारारा.. लाज वाटली पायजे राव. या बच्चन साहेबांना परवा कुणीतरी ट्रोल केलं तर लगेच माझा फॉलोअर हा माझं कुटुंब आहे त्यांना एक आदेश दिला तर ते तुम्हाला ठोकून काढतील असं सुनावणारे बच्चन.. आता बॉलिवूडलाच गटार म्हणणाऱ्या मुलीविरोधात अवाक्षर काढत नाहीत याला काय म्हणणार?

अरे यापेक्षा आमचे मराठी कलाकार परवडले. ते बोलले नाहीतच. पण  निदान सोशल मीडियामध्ये तर व्यक्त झाले. मुंबईत राहून.. इथंल्या सगळ्या व्यवस्था भोगून आमच्या मुंबईला बोल लावणाऱ्या त्या वाचाळवीर बाईला एकजण सुनावत नाही ही खेदाची बाब आहे. आता आणि काय लिहायचं.. तुम्हीच कुणाला फॉलो करताय बघा. हॅव अ गट्स..

मानेंना हे आवडलं नाहीय. तुम्हाला आवडलंय का? नसेल तर सोशल मीडियावर तुमच्या आवडत्या कलाकाराला करा टॅग आणि सांगा की बोल म्हणून.. येवढं तर करूच शकता.. आईच्या गावात. आजचा इतका डोस पुरे. रजा द्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Chitchat Bollywood Topics Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.