Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

‘जोकर’च्या फॅनसाठी गूड न्यूज !
टोड फिलिप्स दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट ‘जोकर’चा दुसरा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जोकीन फिनिक्सच्या अफलातून अभिनयानं सगळ्यानांच भूरळ पाडली. जगभरात जोकर चित्रपट आणि अभिनेता ‘जोकीन फिनिक्स’चे फॅन आहेत. ‘जोकर२’ चित्रपटासाठी जोकीनला ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याची माहिती मिळतेय.
९२ वर्षांच्या ऑस्करच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर मिळत आहे. यापूर्वी दिवंगत अभिनेता ‘हीथ लेजर’ला या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला होता.
‘जोकर’ चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई या चित्रपटानं केली होती.
‘जोकर’ चित्रपटात आर्थर फ्लेक या तरुणाची कथा मांडण्यात आली आहे. त्याला कॉमेडियन म्हणून करिअर करायचं असतं. पण प्रत्येक वेळेस त्याला समाजाकडून अपमान, हास्यास्पद वागणूकच मिळते. त्यामुळे त्याच्या मनात समाजाविषयी घृणा निर्माण होते. या रागात तो अनेकांचे खून करतो, अगदी आपल्या आईचा देखील.