मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
मजदूर आणि सायकल यांचं नातं…
रोजंदारीवर काम करणा-या मजदूराच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची असते तर त्याची सायकल… कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात स्वस्त साधन म्हणजे ही सायकल, या मजदूराच्या आयुष्यात सर्वकाही असते. मात्र एक सायकल घेतानाही मजदूराला परिस्थितीचे चटके सोसावे लागतात. एका मजदूराच्या आयुष्यात सायकल, कुटुंबातील सदस्यासारखी असते, हे सांगणारा चित्रपट म्हणजे “मट्टू की साइकिल” (Matto Ki Saikil) …
एम गानी यांची कथा आणि दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा आहेत. वास्तविक अनुभवावर कथा असणा-या या चित्रपटाला बुसान फिल्म फेस्टिवलमध्येही निवडण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिलेला “मट्टू की साईकिल” चित्रपट भारतात कधी प्रदर्शित होईल याची चर्चा आहे. वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटाला चित्रपटगृहात कितपत प्रतिसाद मिळेल असा प्रश्न असला तरी स्वतः प्रकाश झा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी आग्रहीत आहेत. त्यामुळेच “मुट्टू की साईकिल” ची टीम आता ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या पडद्यावरही चित्रपट प्रदर्शीत करण्याबाबत विचार करत आहे.
प्रकाश झा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे. भारतातही अनेक संवेदनशील विषय असलेले चित्रपट मोठ्या पडद्यावर यशस्वी झाले आहेत. तसेच यश “मट्टू की साईकिल” ला मिळेल, अशी आशा प्रकाश झा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच काही मोजक्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शीत करण्याबाबत बोलणी सुरु आहेत. एम गनी या चित्रपटातून दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं आहे. प्रकाश झा यांच्यासारख्या मातब्बर चित्रपट निर्मात्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्याचे त्यांनी सांगितले. एम गनी यांची ही वास्तववादी कथा आहे. त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवातून ही कथा साकारली आहे.
हे देखील वाचा: … म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली
उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. मट्टू नावाच्या मजदूराच्या आयुष्यात त्याची सायकल सर्वकाही आहे. या सायकलवर त्याचा रोजगार अवलंबून आहे आणि रोजगारावर त्याचे कुटुंब. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबातील सदस्यासारखे तो सायकलला जपतो. याच सायकलला एकदा अपघात होतो. सायकल तुटते, मग नवीन सायकल घेण्याशिवाय मट्टूपुढे पर्याय नसतो. एक नवी सायकल घेण्यासाठी मजदूरी करणा-या मट्टूला काय करावे लागते. हे “मट्टू की साईकिल” मध्ये बघता येणार आहे. गनी यांनी चित्रपटासाठी प्रकाश झा यांना प्रमुख भूमिकेत घेण्यासाठी अनेकवेळा आग्रह केला. झा यांचा “दामुल” चित्रपट त्यांनी पाहिला होता. त्यावरुन मट्टूला प्रकाश झा योग्य न्याय देऊ शकतील, असा गनी यांचा दावा होता.
अर्थात प्रकाश झा यांच्या या भूमिकेचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात अनिता चौधरी आणि आरोही शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सुधीरभाई मिश्रा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक मजदूरांना स्थलांतरीत व्हावे लागले. तेव्हा प्रवासासाठी सर्व साधनं बंद होती. मात्र सायकल हे एक माध्यम या मजदूरांसाठी फायद्याचे ठरले. “मट्टू की सायकिल” मध्येही असेच ह्दयस्पर्शी अनुभव मांडण्यात आले आहेत, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा दावा करण्यात येत आहे.