दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
निमित्त अबरामच्या वाढदिवसाचे…
शाहरुख खानच्या धाकट्या मुलाचा… अबरामचा वाढदिवस आज 27मे रोजी आहे. अबराम सात वर्षाचा झाला. शाहरुख आणि गौरी यांचा सरोगसीच्या माध्यमातून झालेला हा मुलगा… शाहरुखनंतर बॉलीवूडमध्ये जणू सरोगसीद्वारे आई-वडील होण्याची स्पर्धाच लागली. अमिर खान, सनी लिऑनी, सोहेल खान, शिल्पा शेट्टी अशा ता-यांनी सरोगसीद्वारे मुलांना जन्म दिला. तुषार कपूर, एकता कपूर या भावंडांनी आणि करण जोहरने लग्न न करताच सरोगसीचा आधार घेत एकल पालकत्वाचा आनंद घेतला. अबरामच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरोगसीद्वारे आई बाबा झालेल्या स्टारच्या भावना नक्की काय हे कलाकृती मिडीयाने जाणून घेतले…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी यांची आर्यन आणि सुहाना ही मोठी मुलं… आर्यन आणि सुहाना मोठे झाल्यावर आपापल्या मित्रमंडळीत रममाण झाली. शाळा, कॉलेज अभ्यास यात हे दोघं बिझी राहू लागली. त्यात आर्यन लंडनला शिक्षणासाठी गेला… आणि सुहानाही लंडनला जाण्याची तयारी करु लागली…. एरवी आपल्या आसपास असलेली मुलं अशी वेगळी झाल्याने शाहरुख आणि गौरीला एकाकी वाटत होतं. घरात आणखी एक लहान मुल हव असं त्यांना वाटत होतं. गौरीनं वयाची चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सरोगसीचा पर्याय सुचवला… हा पर्याय खान कुटुंबाला आवडला आणि अबरामचा जन्म झाला. अबरामच्या जन्माच्या वेळी अनेक वादळं उठली… शाहरुखनं गर्भ लिंगनिदान चाचणी केली ते अगदी अबरामच्या नावावरुनही वाद उठले… नंतर काही दिवसांनी हे वाद शांतही झाले… आणि अबरामचे फोटो, व्हिडोओ समोर येऊ लागले..
बॉलिवूडचा परफेक्ट मॅन म्हणजे अमिर खानच्या छोट्या मुलाच्या जन्माचीही अशीच गोष्ट… अमिर आणि किरण राव यांनाही सरोगसीद्वारे मुल झालं. अमिर आणि किरणच्या या मुलाचं नाव आजाद राव खान ठेवलं. अमिरच्या पणजोबांचे नाव आजाद होतं. त्यांच्या नाववरुन किरणनं आपल्या मुलाचं नाव आजाद ठेवलं. आजाद म्हणजे स्वतंत्र, मुक्त… अमिरनं आपला मुलगा कोणत्याही जातीपातीच्या बंधनात नसेल हे त्याच्या जन्माच्या वेळीच स्पष्ट केलं होतं. त्याला पहिल्या बायकोपासून जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत.
तुषार कपूर आणि एकदा कपूर या बहिण भावांनीही सरोगसीद्वारे पालकत्वाचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे या कपूर भावंडांनी लग्न न करताच आपल्या मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे हे शक्य झाल्याने तुषार कपूरने त्याच्या मुलाच्या जन्मानंतर अनेक वेळा डॉक्टरांचे आभार मानले. तुषार कपूरने आपल्या मुलाचे नाव लक्ष ठेवलं आहे. सिंगल पेरेंट असलेला तुषार कपूर आपल्या मुलाला पुरेपूर वेळ देतो. त्याचे वाढदिवस साजरे करतो. त्याच्या नंतर त्याच्या बहिणीने, एकतानेही हाच पर्याय स्विकारला. लग्न करणार नाही असं एकता कपूरनं अनेक कार्यक्रमांमध्ये ठामपणे सांगितलं आहे. मात्र लक्षच्या आगमनानंतर आपल्यालाही बाळ हवं ही भानवा तिच्या मनात होती. त्यामुळे तिनेही भावप्रमाणेच सरोगसीचा पर्याय स्विकारला. तिलाही आता मुलगा आहे. आणि सिंगल पेरेंन्ट म्हणून घेण्यात आनंदही वाटत आहे.
या सिंगल पेरेंन्टच्या यादीत पुढचं नाव आहे ते करण जोहर यांचं. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक… करणनंही सरोगसीचा पर्याय निवडला. शाहरुख खान त्याचा परममित्र… शाहरुखच्याच सल्ल्यानुसार त्यांनी सरोगसीद्वारे पिता होण्याचा निर्णय घेतला. करणला आता यश आणि रुही अशी दोन जुळी मुलं आहेत. यश हे नाव करणनं आपल्या वडीलांच्या नावावरुन ठेवलं आहे. तर मुलीचं नाव आपली आई हिरु जोहर हिच्या नावावरुन ठेवलं आहे.
अभिनेत्री सनी लिऑनीही सुद्धा सरोगसीद्वारे आई झाली आहे. सनीला जुळी मुलं झाली आहेत. सनीने या मुलांचे अशर सिंह वेबर आणि नोहा सिंह वेबर असे नामकरण केले आहे. सनी आणि तिचा पती डॅनिएल यांनी यापूर्वीनिशा या मुलीला दत्तक घेतले आहे.
अभिनेता सोहेल खान याचा दुसरा मुलगाही सरोगसीद्वारे झाला आहे. सोहेल आणि सीमा यांच्या या दुस-या मुलाचे नाव योहान आहे. तर मोठ्या मुलाचे नाव निर्वाण आहे.
आता आपल्या शिल्पा शेट्टीच्या घरी आलेल्या आनंदाबद्दल जाणून घेऊया. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दाम्पत्याला विहान नावाचा मोठा मुलगा आहे. शिल्पाला आपल्या घरी छोटीशी परी हवी होती. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे तिला बाळ होण्यास अडचण येत होती. अशावेळी तिनेही सरोगसीचा आधार घेतला. आता तिला समीषा नावाची मुलगी झाली आहे. शिल्पा तिचा उल्लेख लक्ष्मी म्हणून करते. इंस्टाग्रामद्वारे ही गोड बातमी शिल्पाने तिच्या चाहत्यांना दिली. समीषाचा फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले होते, ‘ओम गणेशाय नमः आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळालं. आम्हाला हे सांगायला आनंद होतो की आमच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. समीषा शेट्टी कुंद्रा. समीषाचा १५ फेब्रुवारी २०२० ला जन्म झाला. घरात ज्यूनिअर एसएसके आली आहे.’शिल्पाची ही समीषा हुबेहुब तिच्यासारखीच दिसते म्हणे…
असो या स्टार कीडचे व्हिडोओ सध्या युट्यूबवर धम्माल करीत आहेत. आता ही मंडळी छोटी असली तरी काही वर्षांनी बॉलीवूड मध्ये त्यांचे स्थान नक्की झाले असेल. सरोगसीद्वारे झालेली ही बच्चे मंडळी अभिनयात कशी आहेत ते लवकरच समजेल…
-सईबने