‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘का रे दुरावा’ मधील आपल्या जय चे प्राणी आणि पक्षी प्रेम…
सुयश हा तो दुर्वा, बाप माणूस, का रे दुरावा अशा सिरियल्स मधून आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या प्रत्येक भूमिकेला त्याने आपलंसं केल आणि मग ती भूमिका प्रेक्षकांसमोर मांडली. अभिनयाच्या कॉन्टिटी पेक्षा क्वालिटीला महत्व देणार्या सुयशचा आजवरचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास.
सुयश टिळक मूळचा पुणेकर. अभिनय क्षेत्रात त्याने पहिल्यांदा काम केले ते इयत्ता चौथीत असतांना. अनघा देशपांडे या त्याच्या शाळेतल्या बाईंनी शिवाजी महाराजांच्या कथेवर आधारित एक नाटकं स्वतः लिहून बसवले होते. तेव्हा सुयशने सेट, कॉस्च्युम वापरुन आपण काहीतरी छान सादर करतोय अशा अर्थाने त्यात भूमिका केली होती. पण पुढे जसा तो मोठा होत गेला तस त्याचं नाटकाप्रतीच प्रेम वाढत गेल. तो वेगवेगळ्या भूमिका करायला नेहमी पुढे असायचा. मग शाळेत अथवा बाहेर कविता पाठांतर असेल, मराठी वक्तृत्व स्पर्धा असतील त्यात तो कायम भाग घ्यायचा. शाळेतील कुठलीही स्पर्धा असो सुयश टिळक नाव कायम ठरलेल असायच!
पुढे त्याने कलाक्षेत्र आणि कलाकार या दोन्ही गोष्टी अजूनही जिथे समृद्ध आहेत अशा फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतले. तिथे बारावी पर्यंतची दोन वर्षे अगदी प्रामाणिकपणे अभ्यास केला. पण कुठेतरी बारावी संपल्यावर त्याला स्वस्थ बसवत नव्हतं. प्रयोगिक रंगभूमी त्याला खुणावत होती. आणि मग त्याने अभिनय क्षेत्रात असलेली आवड लक्षात घेतली आणि ठरवलं आपल्याला यातच करियर करायचयं. पुढे त्याने त्याकरिता शिक्षणातून एक वर्षाची गॅप देखील घेतली. आणि त्याने घेतलेला निर्णय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
आंतर महाविद्यालयीन पातळीवर पुण्यात वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात. पुरषोत्तम करंडक, सुमन करंडक, फिरोदीया आणि अजून बर्याच, त्यात त्याने भाग घेतला. सुयशच म्हणणं आहे, प्रत्येक स्पर्धा, नाटकं, एकांकिका त्याला काहीतरी शिकवत गेली. त्याने लोक कशाप्रकारे जीव लावतात, तहान भूक विसरून कलेच्या प्रेमापोटी काम करतात हे जवळून अनुभवलं ज्याचा त्याला पुढील प्रोजेक्टस मध्ये खूप फायदा झाला. ‘आम्हाला आमचं’ ही त्याची पहिली एकांकिका होती.
सुयश नाटकं, एकांकिका करून झाल्यानंतर सिरियलकडे वळला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही ठिकाणी त्याने ऑडिशन दिल्या. अनेकदा नकार मिळाले. पण प्रयत्नांना यश आले आणि ‘अमरप्रेम’ ही झी मराठीवरील त्याची पहिली मालिका ठरली. तेव्हा त्याला सिरियल हे क्षेत्र किती चॅलेंजिंग आहे याचा अंदाज आला. रोज तुम्हाला लोकांच्या पसंतीस उतराव लागत. त्यामुळे तो कायम म्हणतो, टेलीव्हीजन हे खूप जबाबदारीच क्षेत्र आहे.
‘का रे दुरावा’ ही झी वरची त्याची मालिका त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होती. या मालिकेमुळे त्याच्या आयुष्यात प्रॉफेशनली खूप बदल झाले. त्याच्या आधी त्याने ‘दुर्वा’ नावाची मालिका केलेली त्यात भूपति पाटील हे पात्र त्याने उत्तमरीत्या सादर केल होत. ‘बाप माणूस’ यात त्याने वेगळ्या प्रकारची भूमिका केली. त्याचबरोबर त्याने बंध रेशमाचे, पुढचं पाऊल, भैरोबा अशा मालिकांमध्ये अनेक पात्र साकारली. असा त्याचा मालिकांचा प्रवास अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर त्याने ‘शॉक’ आणि ‘बूमरँग’ या वेब सिरीज मध्ये काम देखील केली आहेत.
‘क्लासमेट्स’ आणि ‘कॉफी आणि बरचं काही’ अशा सिनेमांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत.
सिरियल बरोबर पुन्हा त्याने नाटकात काम केले. ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटकं नुकतचं त्याने केलं. लव्ह आफ्टर ब्रेकअप अशी त्याची मांडणी असून त्याला आवडलेला विषय तिथे करायला मिळाला. थोडा विक्षिप्त, स्वतःवर प्रेम करणारा माणूस त्याने त्यात साकारलाय.
याव्यतिरिक्त सुयशचा ‘प्राणी’ हा अतिशय लाडका विषय आहे. त्यामुळेच त्याने बायो डायव्हर्सिटी विषयात कॉलेजमध्ये असतांना पदवी घेतली आहे. तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्याच बरोबर पक्षीनिरीक्षण करायला त्याला आवडत. अगदी लहान असल्यापासून अनेक प्राणी, पक्षी त्याने रेस्क्यु करून घरी आणलेत. त्यामुळे त्याचं हे प्रेम कधीच कमी होणार नाही हे तो ठामपणे सांगतो.
सुयश उत्तम स्वीमर आहे. शाळेत त्याने अनेक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकली आहेत. कॉलेजमध्ये असतांना तो वॉटरपोलो खेळायला लागला. तिथेही तो नॅशनल लेव्हल पर्यंत गेला होता. भटकायला देखील त्याला खूप आवडत.
सुयश त्याच्या आयुष्यात अनेक जणांचा आभारी आहे. त्यातले पहिले म्हणजे सगळे मायबाप प्रेक्षक. कारण त्यांनी दिलेल्या आजवरच्या प्रेमामुळे तो करियरच्या या टप्प्यावर पोहोचलाय. आणि दुसरे म्हणजे सगळे लेखक आणि दिग्दर्शक. त्याच्यामते त्याला मिळालेल प्रत्येक पात्र हे वेगळ होत आणि त्यामुळे त्याला अभ्यास करायची संधी मिळाली. हॉरर असेल, डबल रोल असेल या प्रत्येक पात्राला त्याने आपलस करून घेतल. प्रत्येक पात्राचा आधी नीट विचार केला आणि मग प्रेक्षकांसमोर मांडल.
सुयशला सध्याच्या परिस्थिती बद्दल जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला की मी आराम करतोय. विविध पुस्तक वाचतोय, घरातली काम करतोय. फोटो एडिट करतोय, सिरिज बघतोय. सुयशच फॅन्सना सांगणं आहे की तुम्ही सध्याच्या परिस्थितीकडे पॉझीटिव्हली बघा, तुमचं माइंड फ्रेश ठेवा. आराम करायची संधी आहे तर आराम करून घ्या.
सुयशचे येत्या काही काळात नवीन प्रोजेक्टस येणार आहेत. त्यातलाच एक म्हणजे ‘प्रेम’ नावाचा मराठी सिनेमा आहे. अजूनही काही नवीन प्रोजेक्टस वर तो काम करतोय. प्रेक्षकांना नवीन काहीतरी कथानक देता येईल का याचा विचार करतोय. त्याच्या या सगळ्या प्रोजेक्टस साठी त्याला शुभेच्छा आहेत. आणि त्याने अशीच वेगवेगळी काम करून आपले मनोरंजन करत रहावे हीच इच्छा आहे.
विपाली पदे