‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्पाप्पाराझी की स्टारच क्रेझी?
आजचा फिल्मी मिडिया सीसीटीव्हीच्या वेगाने काम करतोय असं अगदी सुरुवातीलाच म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. फिल्म मिडिया म्हणजे गॉसिप्स, गप्पा (अर्थात मिलजुलके प्रमोशन) गल्ला पेटी,( उत्पन्नाचे अबब भारी भारी आकडे) आणि ग्लॅमर (तोच मेन शो) असा ‘फोर जी’ हिट फॉर्मुला असताना हे एकदम सेट/फिट्ट असताना हा नवीन फंडा काय बरे असा एक सरपटी चेंडू कोणाला पडला असेलही (पूर्वी…. कदाचित फार पूर्वी रिव्ह्यू, फिल्म पाहूनच मुलाखत, फिल्मचे रोखठोक विश्लेषण आणि जुन्या आठवणी म्हणजे सिनेमा मिडिया होता. ते वाचक/प्रेक्षकांसाठी असे. गुजरा हुआ जमाना आता नही दोबारा).
आजच्या फिल्मी मिडियात बरेचसे फोटोच्या माध्यमातून! (दृश्य माध्यमाचे युग आहे ना? ) तेदेखिल किती झटपट बघा,
हे देखील वाचा: गुल्लक : सुखदुःखाची मध्यमवर्गीय झलक
विराट कोहली (Virat Kohli) व अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्याला मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदा घराबाहेर पडले रे पडले लगेचच त्या क्षणाचा फोटो बघता बघता सोशल मिडियात दिसायलाही लागला. तेथून तो चॅनलवर आलाही. नजिकच्या दिवसात ते आपल्या तान्हुल्या मुलीला घेऊन पहिल्यांदा घराबाहेर पडतील तेव्हाही ती ब्रेकिंग न्यूज असणार.
करिना कपूर(Kareena Kapoor) गर्भवती रुपात जिथे जिथे कुठे गेली त्याचे फोटो, शक्य तेथे मोबाईल अथवा व्हिडिओ क्लिप पटकन दिसू लागली. हा वेग इतका जबरदस्त असतो की, ती एकाद्या शॉमध्ये जाऊन घरी यायच्या आत फोटो दूरवर पोहचलेही.
रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) असो अथवा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट असो विमानतळावर पोहोचताच आणि ते तेथून बाहेर पडतानाचे फोटो असेच वेगाने पहायला मिळताहेत. जाताना विमानात ते बसण्यापूर्वी आणि आल्यावर आपल्या गाडीचा दरवाजा लावण्यापूर्वीच हे फोटो आपल्यापर्यंत पोहचतात.
अर्थात, या लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी तत्क्षणी तुम्ही सोशल मिडियात ऑनलाईन असायला हवे. आजचा युथ तर फेसबुक, ट्वीटर, इन्टाग्राम यावर आलटून पालटून ऑनलाईन असतोच. येथूनच मग मिडियाला करंट अफेअर्स, स्कूप, हॉट स्टोरीज मिळताहेत. टाईम बदल रहा है. ऑफ स्क्रीन गोष्टी महत्त्वाच्या झाल्यात.
हे वाचलंत का: सेलिब्रिटी वेडिंग: कल और आज…
सलूनमध्ये कोणता स्टार चाललाय, कोणती ॲक्ट्रेस आता घराबाहेर पडतेय, कोणती सेलिब्रेटिज जिममध्ये जातेय अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो सोशल मिडियात पोस्ट होत आहेत. याचाच एक अर्थ, मिडिया जणू सीसीटीव्हीचे काम करतेय. हे सगळे कॉमन गोष्टीच्या अलिकडचे/पलिकडचे आहे. नवीन फिल्मचा मुहूर्त/शूटिंग/प्रीमियर/पार्टीज हे कॉमन कव्हरेज देत असतात. तेथे एकाद्या सिनेपत्रकाराचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि एकादा फोटोग्राफर वेगळ्या अॅगलने एकादा फोटो हमखास मिळवेल. वर्षानुवर्षे ते चालत आले/घडत आले. ते मागे पडावे असे आताचे हे ‘कशा कशाचाही फोटो म्हणजे सबकुछ आणि जमलचं तर एस्क्युझिव्ह’ असे कल्चर रुजलयं.
एकदा तर कमालच झाली, जेनेलिया आपल्या माहेरी म्हणजे वांद्र्याच्या घरी आली असता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) तिला भेटायला गेला आणि ते पती पत्नी जवळच्याच कॉफी शॉपमध्ये जाऊन बसले, त्यांच्या खाजगी गप्पा सुरु असतानाच त्यांच्या भेटीचा फोटो पहायला मिळाला.
आता तुम्ही म्हणाल, अशा सगळीकडेच फोटोग्राफर कसे असणार? अनेक ठिकाणी पब्लिकमधीलच हौसे नवशे मोबाईलवर फोटो काढून मिडियात कोणाला तरी देत असतील. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सोशल मिडियात अशा छोट्या छोट्या क्षणाच्या धावत्या न्यूज पहाल तर फोटोग्राफर अनेकदा तरी सेलिब्रेटिजला मॅडम इधर देखो, मॅडम एक स्माईल अशा सूचना करताना दिसतील. अशा पध्दतीने सेलिब्रेटिज चालत असताना, गाडीत चढत अथवा उतरत असताना धावपळीत चांगला फोटो काढणे कला आहे. अनेक स्पॉटवर उन सावलीचा खेळ असतो, विमानतळावर गर्दी असते, अशा स्थितीत अलर्ट राहून फ्लॅश उडवणे आणि चांगला रिझल्ट मिळवणे सोपे नाही.
कैतरिना कैफ (Katrina Kaif) अधूनमधून जिममधील आपल्या वर्कआऊटच्या क्लिप शेअर करते. अर्थात अशा ठिकाणी मोबाईल बंदी आहे आणि हे प्लॅन शूट असते. पण हीदेखील न्यूजच.
हे सगळे पाहत असताना प्पाप्पाराझी (म्हणजे सतत वॉच ठेवून असलेला मिडिया) हे सगळे पब्लिकसमोर का आणतेय? आजच्या ग्लोबल युगातील युथला अशाच चटपटीत आणि लाईव्ह न्यूजमध्ये जरा जास्तच रस अथवा गोडवा असतो म्हणून का? सेलिब्रेटिजची छोटी छोटी सी बात न्यूज होते तरी हा असा एक प्रकारचा जणू पाठलाग करायचा? या स्टार्सनाही हे हवहवसं वाटते का?
हे नक्की वाचा: त्रिभंग: ‘आई’पण तीन पिढ्यांचं
पानपानभर अथवा वीस मिनिटाच्या एपिसोडची मुलाखत देऊन जे साध्य होत नाही ते असे एकेक फोटोही साध्य करु शकतात. बातमीच राह्यचयं ना? फोकसमध्येच रहायचयं ना? असे छोटे छोटे कव्हरेज जास्त इम्प्रेसिव्ह ठरते (एवीतेवी अर्ध्या तासात शंभर बातम्या असा ट्रेण्ड सेटही झाला आहे. त्याच्याशीच हे सुसंगत आहे. आणि काहीही न बोलता कव्हरेज मिळत असते.)
अशा फिल्डवर्कवरच्या फोटोग्राफर्सना वेळेवर टीप मिळावी म्हणून काही स्टार्सनी आपली पीआर टीम सज्ज ठेवलीय. ही तर आजच्या ‘फोकस मे रहने का ‘ या काळाची गरजच तर आहे. आज सर्वच भाषांतील फिल्म इंडस्ट्रीत निर्मिती वाढलीय आणि स्टारही वाढताहेत. अगदी वेबसिरिजमध्येही अनेक फिल्म स्टार बिझी आहेत. अशा वेळी पब्लिसिटी मस्ट होते. अनेक स्टार्सना ते सुखावणारे असते.
अशाच फोकसमधील स्टार्सना शॉप्सची उदघाटने, लग्नातील उपस्थिती वगैरे वगैरेत चांगली किंमत मिळते. सुपारी म्हणतात त्याला. आपलीच भरभरून पब्लिसिटी हा एक प्रकारचा सेलिंग पॉईंट आहे. हां, पण अगदी अतिरेकही होऊ नये. अशीच एक एका इंग्रजी मॅगझिनची एक पत्रकार अमृता सिंगची छान मैत्रीण झाली आणि काहीही गरज नसताना काही खाजगी गोष्टीच तिने प्रसिद्ध केल्याने अमृताने तिला चांगलाच इंगा दाखवल्याचे प्रकरण खूप गाजले. त्याचीच बातमी झाली. मी मात्र स्टारशी फ्रेन्डशीप करताना ‘त्यांच्या काही गोष्टी फक्त आपल्यापुरत्याच ठेवाव्यात, उगाच एक्स्युझिव्हजच्या मोहात विश्वास गमावू नये ‘ हे व्रत अथवा पत्थ कायमच पाळले आहे.
एकदा ओशिवरा परिसरातील कॉफी शॉपमध्ये एक महाराष्ट्रीय मॉडेल अभिनेत्री आणि हीरो गप्पांत छान रमलेले दिसले लगेचच मी मोबाईलवर फोटो काढला नाही आणि त्यांनाही डिस्टर्ब केले नाही. एवीतेवी मराठी स्टारच्या गॉसिप्सला अजूनही अनधिकृत का होईना पण मान्यता नाही. (का बरे?) पण मराठी स्टारचेही विमानतळावरचे फोटो न्यूज व्हॅल्यू ठरतात हे सई ताह्मणकरच्या (Sai Tamhankar) फोटोने दिसतेच.
ऐशीच्या दशकातील स्टार इतपत फोकसमध्ये राहत नसत. पत्रकार शूटिंग कव्हरेजसाठी सेटवर जायचे तेव्हा अगोदर स्टारला कल्पना देऊन फोटो काढले जात. मेहबूब स्टुडिओतील ‘शेषनाग’च्या सेटवर रेखा नागनृत्य करीत असताना सिनेपत्रकाराना आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी बोलावले होते. अशातच एक दोन फोटोग्राफर्सना मोह आवरला नाही आणि त्यानी फ्लॅश उडवल्याचे रेखाला आवडले नाही आणि त्या फोटोग्राफर्सच्या कॅमेरातील रोलच काढून घेण्यात आले. तर एका इंग्रजी गॉसिप्स मॅगझिनविरोधातील कोर्ट केससाठी रेखाने वांद्र्याच्या कोर्टात येताना आपली प्रायव्हसी जपत बुरखा घातला त्याचा मात्र फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला.
एक अभिनेत्री एका पंचतारांकित हॉटेलमधील स्वीमिंग पूलात नेहमीच उतरे, एकदा त्याच हॉटेलमधील फिल्मी इव्हेन्टसला आलेल्या फोटोग्राफर्सना ते समजताच ते पूलावर गेले पण त्यांनी तिला फोटो काढू का असे विचारताच तिने अत्यंत शांतपणे नको म्हणताच तेही त्याच सहजपणे निघालेही. फिल्मालय स्टुडिओत ‘छुपा रुस्तम’च्या सेटवर आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी बोलावले असता मनिषा कोईरालाने आजच्या आपल्या ड्रेसमध्ये मिडियासमोर येण्यास आपण कन्फर्ट नाही असे सांगितले.
आज कदाचित अगोदर फ्लॅश उडेल आणि मग विचारले जाईल. कारण आज सेलिब्रेटिजच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची न्यूज होतेय. तैमूर खान तर जन्मापासून न्यूजमध्ये आहे. चित्रपट महोत्सवाच्या बातम्यांपेक्षाही अशा गोष्टींना स्पेस मिळतेय. पूर्वी स्टारच्या घर आणि गाडीची बातमी होई आता ती मर्यादा ओलांडून फ्लॅश उडतोय. शक्ती कपूरच्या (Shakti Kapoor) व्हॅनिटीची फोटो स्टोरी सांगायलाच हवी. इंडिया टुडेने ती केली होती. त्याच्या व्हॅनिटीत चक्क छान बार होता.
हे नक्की वाचा: डिडिएलजे २५ वर्षांचा झाला!
आजच्या प्पाप्पाराझीनी स्टारच्या सार्वजनिक आयुष्यातील मोकळेपण हिरावलयं. सैफ आणि करिना तैमूरला घेऊन मरीन ड्राईव्हवर सहज फिरायला आले याचीही न्यूज होताना त्यांच्या तोंडाला मास्क नाही ही ब्रेकिंग न्यूज झाली. तर जुहू परिसरातील ग्रंथ या पुस्तकाच्या दुकानात अनेक स्टार्स येतात त्याचे फोटो का बरे येत नाहीत? पुस्तकाना ग्लॅमर नाही की काय? सोनाली बेंद्रे आपल्या पुस्तक वाचनाचे आपल्या घरातील फोटो सोशल मिडियात शेअर करीत असते इतकेच.
भविष्यात प्पाप्पाराझी काय करतील? फिल्म/अल्बम/मॉ डेलिंग/सिरियल/वेबसिरिज/यू ट्यूब चॅनल/ ऑनलाईन एन्टरटेन्मेन्ट/गेम शो/रिॲलिटी शो यांच्या पिकात वाढ होत चाललीय, स्टारही वाढताहेत. अनेक नवीन चेहरे झटपट स्टार होऊ इच्छिताहेत (मिडिया सपोर्टने स्टार घडत नाही, स्टारला मिडिया सपोर्ट सिस्टीमचे ऑक्सिजन देते ही रियॅलिटी आहे).
सगळ्यानाच फोटो स्टोरीत राह्यचेय. तेव्हा कालपर्यंत स्टुडिओत काय चाललयं हे पाह्यची असलेली सवय सोडून सेलिब्रेटिजच्या सोसायटीबाहेर सज्ज रहावे लागेल. तो स्टार बाहेर पडला रे पडला की गाडीत बसेपर्यंत जेवढे क्लिक होतील तेवढे आणि मग त्या गाडीचा पाठलाग, तो ड्रेस खरेदीला गेला की बाहेर पडेपर्यंत फिल्डिंग लावा…. जणू सीसीटीव्हीशी स्पर्धा असावी या छान गतीने हे सगळे चाललयं.
तात्पर्य, सेलिब्रेटिजची प्रत्येक गोष्ट न्यूज आहे, कधी ती मिडियाची गरज आहे (कारण त्यात वेळ जात नाही) तर कधी ती त्या सेलिब्रेटिजचीही गरज आहे (त्या गरजेची सवय कधी लागते हे कधी कधी समजत नाही.)