‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आई झाल्यावर असे केले वैशाली सामंत ने ‘कम बॅक’
करियरच्या उच्च शिखरावर असताना घ्याव्या लागलेल्या ब्रेकबद्दल वैशालीने काही खास गोष्टी रसिकांसमोर मांडल्या आहेत. अनुभव सांगताना वैशाली बोलते- ‘आई होणं म्हणजे नक्की काय, हे मी प्रत्यक्षात अनुभवत आहे. मी अगदी सातव्या महिन्यापर्यंत स्टुडिओत जाऊन गाण्याचे रेकॅार्डींग्स करायचे. कारण मी आधीपासूनच ठरवलेलं होतं की प्रेग्नंसीदरम्यान घरी बसून न राहता काम करत रहायचं. मी काम न करता राहूच शकत नाही. प्रेगन्सीनंतर बाराव्या दिवशीच कामाला सुरूवात केली. ते स्वामी समर्थांचं गाणं होतं.’
पुढे वैशाली सांगते- ‘त्यावेळी आईच्या घरापासून पाचव्या मिनिटावर स्टुडीओ होता. तिथे जाऊन मी गाण्याचं रेकॅार्डिंग केलं. मी रेकॅार्डिंगला गेले म्हणून आई मला ओरडली. पण मी तीला समजावलं. प्रेग्नंसीनंतर दीड ते दोन महिन्यानंतर मी माझ्या कामावर रूजू झाले. माझ्या मुलाचं नाव कुशान आहे. तो मला उत्तम सहकार्य करतो. कुशान झाल्यानंतर आईने मला सांगितलं हातं, आता मुलाकडे, कुटुंबाकडे लक्ष दे. पण मला ते पटलं नाही. मला गाण्याची आवड जोपासायची होती. हळूहळू माझं म्हणणं आईला पटायला लागलं. मी पुन्हा गाणी, शोज करू शकले ते माझी आई, नवरा, आजी यांमुळेच.’
कुशान ८ वर्षांचा झाल्यावर काही गोष्टी बदलल्या. आता सगळ्यांना माहीत आहे की, कतीही काही झालं तरी वैशाली तीच्या मुलाला शाळेत आणायला जाणारच. मग तीच्या गाण्याचं रेकॅार्डींगही तीच्या वेळेनुसार ठरवलं जातं. कुशानला शाळेतून एकदा घरी सोडल्यानंतर पुढील तीन ते चार तास वैशाली बाकीची कामं करायची. वैशाली शाळेत असताना तीची आई तीला शाळेत सोडायला- न्यायला यायची. त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो, असं वैशाली म्हणते. तो आनंद तीला तीच्या मुलालाही द्यायचा होता. यासाठी वैशालीने तीचं नेहमीचं शेड्यूल कुशालच्या वेळेनुसार करून घेतलं.
वैशाली (Vaishali Samant) व्यक्त होताना पुढे बोलते- ‘कुशानच्या जन्मानंतर पिझ्झा बॅाक्स नावाचा व्यवसाय सुरू केला. तोही जोमाने सुरू आहे. प्रेग्नंसीनंतर मी स्वत:ला समजावले की, तू आता एकटी नाही आहेस, तुझ्यावर आणखी एका जीवाची जबाबदारी आहे. ते सांभाळून सगळं तुला सांभाळायचं आहे. आई झाल्यानंतर माझं पहिलं प्राधान्य कुशानला च असणार.’
आपापल्या क्षेत्रात वैयक्तिक आयुष्यातले चढ उतार सांभाळून यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या वैशाली सारख्या अनेक स्त्रियांना सलाम!
शब्दांकन – शामल भंडारे.