मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
नाट्य /चित्रपट क्षेत्रातील निरागस हसरा चेहरा: आसावरी जोशी.
“ढुंढते रेह जाओगे” म्हणत जाहिरात क्षेत्रात प्रवेश केलेल्या आसावरी जोशी, या याच टॅगलाईनमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्याचबरोबर प्रेक्षक त्यांना विसरुच शकले नाही ते त्यांच्या चारचौघी या नाटकातल्या वैजूच्या भूमिकेमुळे. नैसर्गिक स्वर, खळखळून हसणं आणि प्रसन्न वावर यामुळे वैजूची भूमिका आसावरी जोशींसाठीच बनवली आहे अशा शब्दात चंद्रकांत कुलकर्णी, या नाटकाचे दिग्दर्शक यांनी आसावरी जोशींच वर्णन केलं आहे. 1992 – 93 साली लता नार्वेकर यांची निर्मिती असलेलं हे एक वेगळ्या विषयाचं नाटक आणि आसावरी जोशी यांनी या नाटकाचे 500 प्रयोग केले होते.
आसावरी (Asawari Joshi) यांनी फक्त रंगभूमीच नाही तर मालिका आणि चित्रपट क्षेत्रातही आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. मराठीत त्यांनी एका लग्नाची दुसरी गोष्ट, मला सासू हवी, माझे मन तुझे झाले या सिरीयल केल्या तर हिंदी मध्ये ऑफिस ऑफिस या मालिकेत उषा हे त्यांनी साकारलेलं पात्र खूप गाजलं होत. तसेच माझं घर माझा संसार, एक रात्र मंतरलेली, ओम शांती ओम, मुंबई पुणे मुंबई २, हॅट्रिक, डबलसीट यांसारख्या चित्रपटातही आसावरी यांनी उत्तम भूमिका केल्या.
पुरस्कार हे आपल्या मेहनतीचं फळ असतं. आसावरी जोशी या अनेक पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांना इंडियन टेली अवार्डसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेचं नामांकन मिळालं होतं. तर 2012 साली मला सासू हवी या सिरिअलसाठी सर्वोत्कृष्ट सासू हे झी मराठीच अवॉर्ड मिळालं, ईआरटीसीच्यावतीने महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान केला जातो त्यात आसावरी जोशी यांना मनोरंजन क्षेत्रातली महाराष्ट्राची प्रेरणादायी अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
आसावरी जोशी यांची अभिनयाची आवड जर कुठे जोपासली गेली असेल तर ती त्यांच्या शाळेत. दादर येथील आय इ एस पाटकर विद्यायलातल्या त्या आदर्श विद्यार्थीनी. वक्तृत्व, नाट्य, अभिनय, गाणं या कला ओळखून शाळेपासूनच त्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या शाळेचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हा जसा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तसाच तो आसावरी जोशी यांच्याही आहे. शाळेत खूप अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाबरोबर त्यांनी आपल्या कला जोपासण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तीच मेहनत आज आपण त्यांच्या अभिनयात पहातो.
आज जवळ जवळ 30 वर्ष अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या आसावरी यांना अजूनही खूप छान छान भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला याच खूप खूप शुभेच्छा की तुमच्या कडून या अभिनय क्षेत्रात असंच नवनवीन काम होऊ देत.
– सई मराठे