दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’
इत्तेफाक(१९६९)
निर्देशक – बी.आर चोप्रा
संगीतकार- सलिल चौधरी
गीतकार – कलाकार – राजेश खन्ना, सुनीव कुमार बिन्दु जहागीरदार मदन पूरी, इफ्लेखार ,जगदीश राज
लो बजेट गीतविरहित रहस्यमय नाट्य…(Mysterious story)अंधारी रात्र, एकांतातील घर, त्यामध्ये सुंदर विवाहित तरुणी (रेखा) संगीत ऐकण्यासाठी रेडिओ चालू करते, तिला बातमी ऐकायला मिळते, एक वेडा खूनी हॉस्पिटलमधून फरारी झाला आहे. दार ढकलून दिलीप रॉय (राजेश खन्ना) घरात प्रवेश करतो. रेखा (नंदा) स्वताच्या घरात त्या वेडया दिलीप रॉयची कैदी बनते.
दिलीप रॉयला पोलिसांना चुकवून पळून जाण्यासाठी रात्रीचा मुक्काम करण्यासाठी सुरक्षित जागा सापडलेली असते. सुरवातीला रेखाला तो धमकावितो, नंतर त्याला रेखाची दया येते, पहाटे निघून जाण्याचा प्रस्तावावर दोघे जण रात्र भरण्याची प्रतीक्षा करत बसतात. आणि ‘ तिथे एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात होते, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते.
बी. चार चोप्रांचा इतेफाक (Mysterious story) व राज खोयलांचा दो रास्ते या दोन्ही चित्रपटात राजेश खन्ना एकाच वेळी काम करीत होता. इत्तेफाक मध्ये वेड्याच्या भूमिकेसाठी त्याला दाढी ठेवावी लागली, म्हणून दो रास्ते मध्येही त्याने दाढी ठेवूनच भूमिका केली.
धुंद(१९७३)
निर्देशक – बी.आर.चोप्रा
संगीतकार – रवी
गीतकार – साहिर लुधियानवी
कलाकार – संजय खान, झीनत अमान, डॅनी, देवेन वर्मा, उर्मिला भट्ट, मदनपुरी, जगदीश राज, नाना पळशीकर, पद्मा खन्ना, जयश्री टी
एका धुक्याच्या रात्री ते घडले–(Mysterious story) तीन पुरुष–एक सुंदर तरुणी आणि डोंगरावरील एका भीतीदायक सुनसान घरात पडलेले प्रेत अशी एका खुनाची रहस्यमय कथा! एक निर्जन जागा नागमोडी रास्ता, वेगात जाणारी कार आणि अपघात, त्या अपघातग्रस्त गाडीतून एक माणूस कसाबसा बाहेर पडतो. त्या जंगलात आडबाजूला त्याला एक घर दिसते. टॉर्च पेटवून, धुक्यातून मार्ग काढत तो घराकडे पोहचतो. आत अंधारात व्हीलचेअर बसलेला एक माणूस त्याला टॉर्चच्या प्रकाशात दिसतो. “सॉरी, तुम्हाला अवेळी त्रास दिला. माझ्या गाडीला अपघात झाला आहे. मी तुमचा फोन वापरू शकतो का?” समोरून कोणतीच प्रतिक्रिया येत नाही. व्हीलचेअर वरील व्यक्ती बहुदा गाढ झोपेत असावी. तो जवळ जाऊन त्या व्यक्तीला जागे करण्याचा प्रयत्न करतो ती मृत व्यक्ती त्या धक्क्याने चेअरवरून खाली कोसळते, घाबरून त्या माणसाच्या हातातला टॉर्च खाली पडतो. टॉर्चच्या प्रकाशात, कोपऱ्यात हातात पिस्तूल घेऊन उभी असलेली एक सुंदर तरुणी त्याला दिसते. तो त्या मृतदेहाकडे आणि तरुणीकडे घाबरून पाहत राहतो. ती तरुणी शांतपणे सांगते, मी हा खून केलेला नाही. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने पुढील नाट्य घडते व उत्कंटावर्धक शेवट होतो.
========
हे देखील वाचा : किशोरच्या एका सिनेमाने शक्ती सामंत यांना रडवले, तर दुसऱ्याने हसवले… काय होता हा किस्सा
========