‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
धर्मेंद्र हेमाच्या प्रेमासाठी करत होता वाट्टेल ते….
सिनेमाच्या रुपेरी पडल्यावर ‘रिल लाईफ’मध्ये प्रेमप्रसंग रंगवताना ‘रियल लाईफ’मध्ये देखील काही कलाकार प्रेमाच्या नात्यात गुंफले जातात आणि मग रिल लाईफ आणि रियल लाईफ एक होऊन जाते. प्रत्येक दशकामध्ये भारतीय चित्रपटात वेगवेगळ्या रोमँटिक जोड्यांची आवक होत होती.
पन्नासच्या दशकामध्ये राज कपूर- नर्गिस, दिलीप कुमार- मधुबाला, देव आनंद- सुरैय्या, गुरुदत्त – वहिदा रहमान नंतर साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये शम्मी कपूर – शर्मिला टागोर, राजेश खन्ना- मुमताज, अमिताभ बच्चन – जया भादुरी, ऋषी – कपूर नीतू सिंग या आणि अशा अनेक जोड्यांनी रुपेरी पडदा प्रेमाच्या रंगात रंगून गेला. यातील काही जोड्या विवाह बंधनात अडकल्या. तर काही ‘अधुरी एक कहाणी….’ म्हणून प्रकरण संपून गेले.
सत्तरच्या दशकामध्ये धर्मेंद्र – हेमा मालिनी ही जोडी रसिकांच्या आवडीची होती. खरंतर धर्मेंद्र हेमा मालिनी (Dharmendra Hema Malini) पेक्षा दहा वर्षे आधी सिनेमामध्ये आला होता. तो हेमाच्या प्रेमात पडला. त्यावेळी तो खरं तर विवाहित होता. पण प्रेमात पडल्यावर या गोष्टींचा विचार कोण करतो? १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुम हसीन मै जवान’ या भप्पी सोनी दिग्दर्शित चित्रपटापासून ही जोडी रुपेरी पडल्यावर चमकू लागली. त्यानंतर नया जमाना, सीता और गीता, दोस्त, पत्थर और पायल, जुगनू या चित्रपटातून हे दोघे एकत्र येत होते.
प्रत्येक चित्रपटागणिक धरम – हेमाच्या (Dharmendra Hema Malini) जास्त जवळ जात होता. पण तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. हेमा मालिनीवर जान कुरबान करणारे काही कमी नव्हते. जितेंद्र, संजीव कुमार हे त्यात आघाडीवर होते. पण बाजी मारली धर्मेंद्रनेच. रमेश सिप्पी यांच्या गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या वेळचा हा किस्सा आहे. माणूस प्रेमात पडल्यानंतर किती ‘पागल’ होतो आणि आपल्या प्रेमिकेसोबत जास्तीत जास्त वेळ कसा काढता येईल यासाठी काय काय क्लुप्त्या शोधून काढतो हे यातून दिसते. ‘शोले’ चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी असलेल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला गेला आहे.
या चित्रपटात धर्मेंद्र हेमामालिनीच्या (Dharmendra Hema Malini) जास्तीत जास्त सहवासात कसे राहता येईल हे पाहत होता. या दोघांचे रोमँटिक सीन तसे या चित्रपटात कमी आहेत कारण चित्रपट हा ॲक्शन जॉनर मुव्ही असल्यामुळे दोघांत अतिशय कमी प्रेमप्रसंगाचे शॉट या दोघांच्या वाट्याला आले होते. यातील धर्मेंद्र हेमा मालिनीला (Dharmendra Hema Malini) बंदूक चालवायला शिकवतो हा शॉट तुम्हाला अजून आठवत असेल. या प्रसंगात धर्मेंद्र हेमा मालिनीला मागून मिठी मारून तिच्या हातात बंदूक देऊन तिला बरोबर निशाणा कसा साधायचा हे सांगत असतो. हा शॉट घेताना त्याला हेमाचा भरपूर सहवास लाभत होताच शिवाय मिठीचे स्पर्श सुख देखील मिळत होते. हे ‘आणखी’ मिळावे म्हणून त्याने एक ‘आयडिया’ केली.
धर्मेंद्रने सिनेमाचे शूटिंग करणाऱ्या एका लाईटमन चक्क पटवले. त्याला सांगितले, “प्रत्येक शॉटच्या वेळी तू मुद्दाम काही तरी चूक करत जा. त्यामुळे पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावा लागेल.” यातून धरमचा हेतू हेमा मालिनीला जास्तीत जास्त वेळी मिठी मारता येईल हाच होता. धर्मेंद्रने त्या लाईटमनला प्रत्येक चुकीसाठी शंभर रुपये द्यायचे कबूल केले. यांनतर लाईटमन देखील तयार झाला.
======
हे देखील वाचा : अभिनेता धर्मेंद्रने असे पूर्ण केले बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न…
======
लाईटमन प्रत्येक शॉटच्या वेळी मुद्दाम चूक करायचा. कधी रिफ्लेक्टर चुकीचा लावायचा, तर कधी ट्रॉलीची स्पीड कमी करून शॉट मध्ये दिरंगाई करायचा… यामुळे व्हायचं काय प्रत्येक वेळी दिग्दर्शक ‘कट’,’ कट’ म्हणून ओरडायचा आणि पुन्हा तो शॉट चित्रित केला जायचा. दिवसभर या शॉटचे चित्रीकरण चालू होते. या लाईटमनने दिवसभरात तब्बल वीस वेळा चुका केल्या. संध्याकाळी शूटिंग संपले त्यावेळी या लाईटमनच्या खिशात धर्मेंद्रने दोन हजार रुपये कोंबले. ही रक्कम त्या काळातली मोठी रक्कम होती. अशाप्रकारे धरम आणि हेमा यांच्या प्रेम प्रकरणाचा बहर ‘शोले’च्या वेळी दिसून आला. युनिट मधील लोकांना हे सर्व समजत होते, पण म्हणतात ना ‘प्रेमात आणि युध्दात सारं क्षम्य असतं…