‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
शुक्रवारी होणार २५ चित्रपट प्रदर्शित
येत्या शुक्रवारी, म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी तब्बल 28 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे. तमिळ सुपरस्टार समांथाच्या यशोदा या चित्रपटाच्या ट्रेलरनं आधीच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. शिवाय अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा उमंगही चर्चेत आहे. यासह जितेंद्र जोशीच्या गोदावरीच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे 11 रोजी प्रदर्शित होणा-या गोदावरीचीही प्रतीक्षा आहे. एकूण येता शुक्रवार चित्रपट रसिकांसाठी पर्वणीचा ठरणार आहे.(The film will be released)
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन बिगबजेट हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे दोन्हीही चित्रपट एकमेकांना जबरदस्त स्पर्धा देताना दिसणार आहेत. यापैकी एक म्हणजे दक्षिणेतील नंबर एकची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू चा यशोदा. तर दुसरीकडे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा उंचाई हा चित्रपट असेल. यशोदा हा हरी-हरीश यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला तेलुगु-भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात उन्नी मुकुंदन, वरलक्ष्मी सरथकुमार आणि मुरली शर्मा यांच्यासोबत सामंथा मुख्य भूमिकेत आहे. यशोदाच्या ट्रेलरला विक्रमी असे लाईक मिळाले आहेत. यशोदा सुरुवातीला 12 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र मध्यंतरी समंथाच्या तब्बेतीच्या तक्रारीनं चित्रीकरणास उशीर झाला, आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
यशोदा तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांच्या डब आवृत्त्यांव्यतिरिक्त तेलुगूमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. (The film will be released) उमंग हा चित्रपट सूरज बडजात्या दिग्दर्शित आणि राजश्री प्रॉडक्शन, बाउंडलेस मीडिया आणि महावीर जैन फिल्म्स निर्मित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता आणि सारिका यांच्या भूमिका आहेत. चौथ्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीन मित्र एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेक करतात. एक साधा ट्रेक हा वैयक्तिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास ठरतो. मैत्रीच्या नवीन कसोटीला या मित्रांना सामोरे जावे लागते. त्यातून त्यांना मैत्रीचा नवा अर्थ समजतो. प्रेम रतन धन पायो पासून सूरज बडजात्या उंचाई बाबत काम करत होते. सारिकाने या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे. तर छोट्या पडद्यावरील अभिनेते शीन दास आणि अभिषेक सिंग पठानिया यांनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. उंचाईचे चित्रिकरण लुक्ला आणि काठमांडू येथील जगातील सर्वात धोकादायक विमानतळ म्हणून ओळखल्या जाणा-या विमानतळावर झाले आहे. कारगिल, दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश येथेही उंचाईचे चित्रीकरण झाले आहे. उंचाई हा राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत 60 वा चित्रपट आहे
याशिवाय रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांचा मिस्टर मम्मी, एंट द एंड, थाई मसाज, रॉकेट गँग, करतुत आणि बधाई हो बेटी हुई है हे चित्रपटही 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहेत. यशोदा व्यतिरिक्त या आठवड्यात फक्त एक तेलुगु चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र यशोदा सोबत या आठवड्यात तमिळ भाषेतील तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत.(The film will be released) यामध्ये अगिलन, गिला बेट आणि पॅरोल या नावांचा समावेश आहे. हे चारही चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहेत. पॅरोल हा एक आगामी भारतीय तमिळ-भाषेतील क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. द्वारख राजा लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाचीही उत्सुकता आहे. लिंगा, आर.एस. कार्तिक, कल्पिका गणेश आणि मोनिषा मुरली यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. कोवलन आणि करिकलन या दोन भावांची कथा यात आहे. करिकलन हे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात आहेत, परंतु त्यांच्या तुरुंगाच्या काळात त्यांच्या आईचे निधन होते. करीकलन अंत्यसंस्कारासाठी तुरुंगाच्या बाहेर आला आहे. या दोन भावांमधले नाते एक होतं का…की त्यात आणखी दरी येते हे चित्रपटात पहाण्यासारखे आहे. दिग्दर्शक द्वारख राजा यांचा हा दुसरा चित्रपट आहे. लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपतीने संपूर्ण चित्रपटासाठी आवाज दिला आहे.
======
हे देखील वाचा : देवसेनाने केली चाळीशी पार….
======
अगिलन चित्रपटात जयम रवी, प्रिया भवानी शंकर आणि तान्या रविचंद्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सॅम सीएस यांनी संगीत दिले आहे. 11 नोव्हेंबर रोजी कन्नड चित्रपटसृष्टीतील पाच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार (The film will be released) आहेत. यात अॅक्शन थ्रिलर फिल्म यशोदासह , राणा, ओ कन्नड, कॉमेडी ड्रामा फिल्म दिलपसंद आणि यलो गँग्स यांचा समावेश आहे.
या आठवड्यात चार मल्याळम चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. त्यात येशोदा आणि गिला, आयलंड, बरमुडा, शोइलाई यांचा समावेश आहे. सध्या या साऊथ चित्रपट सृष्टीला चंदेरी दिवस आले आहेत. त्यामुळे या सर्व चित्रपटांचीही उत्सुकता सिनेरसिकांना आहे. याशिवाय 11 नोव्हेंबरला मराठी चित्रपट रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीतील दोन चित्रपट प्रदर्शित होणार(The film will be released) आहेत. जितेंद्र जोशीचा गोदावरी आणि कुलस्वामिनी हे दोन मराठी चित्रपटही मोठ्या पडद्यावर येत आहेत.
या आठवड्यात चार मल्याळम चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. त्यात येशोदा आणि गिला, आयलंड, बरमुडा, शोइलाई यांचा समावेश आहे. सध्या या साऊथ चित्रपट सृष्टीला चंदेरी दिवस आले आहेत. त्यामुळे या सर्व चित्रपटांचीही उत्सुकता सिनेरसिकांना आहे. याशिवाय 11 नोव्हेंबरला मराठी चित्रपट रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीतील दोन चित्रपट प्रदर्शित होणार(The film will be released) आहेत. जितेंद्र जोशीचा गोदावरी आणि कुलस्वामिनी हे दोन मराठी चित्रपटही मोठ्या पडद्यावर येत आहेत. एकूणच येणारा आठवडा हा चांगल्या चित्रपटांचा ठरणार आहे.
सई बने