Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘टाॅकीजची ही वेगळी गोष्ट’; हुकमाचा फंडा

 ‘टाॅकीजची ही वेगळी गोष्ट’; हुकमाचा फंडा
टॉकीजची गोष्ट

‘टाॅकीजची ही वेगळी गोष्ट’; हुकमाचा फंडा

by दिलीप ठाकूर 11/11/2022

चित्रपटाच्या चौफेर वाटचालीत हुकमाचा एक्का पब्लिक. त्यांनी ठरवले पिक्चर हिट. मग काळ आणि परिस्थिती कशीही असो. ते तो पिक्चर डोक्यात आणि डोक्यावर घेणारच. त्यांनी ठरवले, दूर हो जा मेरी नजर से, असे अनेक पिक्चर रिकाम्या खुर्चाना दाखवावे लागले.अर्थात,सिनेमा हमखास सुपर हिट ठरेल याचा कोणताही हुकमी फाॅर्मुला,रेसिपी,मेजरमेंट,टाईम टेबल,तराजू,कॅल्क्युलेटर, कॅम्युटर,फूटपट्टी नाही. पब्लिकला जो पिक्चर भारी आवडतो तोच आणि तोच पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत चालतो. मग तो ‘कांतारा ‘ही असू शकतो. भले पिक्चर हिट (Picture Hit) झाल्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू देत. काहीही फरक पडत नाही.

पब्लिकच्या हाती अनेक गोष्टी असतात. एकाद्या हुकमी फाॅर्मुल्यावरील पिक्चरची रिमेक जोपर्यंत रंगतेय तोपर्यंत त्याच्या अनेक ॲडिशन त्यांना आवडतात. हा देखील एक ‘हुकमाचा फंडा’ आहे. पण आता अमूकतमूक मसाला कालबाह्य होत चाललाय असे फिल्मवाल्यांना समजणेही भाग असते. तात्पर्य, काही काही रिमेक या त्या त्या काळातील हुकमी फंडा असतो. ‘टाॅकीजची ही वेगळी गोष्ट.’

जुळे भाऊ आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी ( लहानपणीच हे दोन अथवा तीन जुळे भाऊ हरवणे आणि पिक्चरच्या शेवटी त्यांनी एकमेकांना ओळखणे. दोनो के बीच बरेच काही मसालेदार नाट्य घडणे. गीत संगीत व नृत्याची ‘फोडणी’ असणे.) हे रुपेरी पडद्यावरील एक कथा सूत्र आहे. एकसारखे दिसणारे हे दोन नायक. एक धीट तर दुसरा भित्रा. योगायोगाने अथवा फिल्मी स्टाईलने त्यांची अदलाबदल होते. कहानी मे ट्विस्ट. त्यातूनच अनेक प्रकारची धमाल गडबड गोंधळ होतो. पब्लिकचा भारी टाईमपास होतो आणि त्यासाठीच अशा फाॅर्मुल्यावरील पिक्चर पुन्हा पुन्हा एन्जाॅय करणे. भित्र्या नायकाचा छळ करणाऱ्या खलनायकाला आता धीट नायक तडी देतो, त्याचाच चाबूक त्याच्यावरच चालवतो तेव्हा व्हीलन अचंबित होतो. यह क्या हो गया असे त्याचे एक्स्प्रेशन असते. आजच्या डिजिटल युगात, ओटीटी प्लॅटफॉर्म काळात हा ‘इधर का भाई उधर, उधर का भाई इधर ‘ हा फंडा अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. पण साठ,सत्तर,ऐंशीच्या दशकातील पब्लिकला यात भारी मसालेदार मनोरंजक वाटे. त्यात मी ही एक पारंपारिक असा चित्रपट रसिक होतो. स्वप्नरंजनात रमण्याची ही गोष्ट होती.डबल रोलचे पिक्चर्स अनेक. अनेकांच्या अनेक कल्पना. पण काही एकाच पॅटर्न अथवा पॅकेजचे.(Picture Hit)

अशा गोष्टीचा पाया रचला दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेल्या तापी चाणक्य दिग्दर्शित ‘राम और श्याम ‘ने ( १९६७). दिलीपकुमारच्या अष्टपैलू अभिनयाने नटलेला ‘दे धमाल पिक्चर’. वहिदा रेहमान आणि मुमताज अशा दोन नायिका. तर रुपेरी क्रूरकर्मा प्राण व्हीलन. मुंबईत अप्सरा थिएटरमध्ये ज्युबिली हिट.आता याच ‘स्टोरीवर किती पिक्चर आले आणि पब्लिकने एन्जाॅय केले’ ते बघा. चांगल्या गुणांचे प्रगती पुस्तक आहे. काहीत नायक तर काहीत नायिका डबल रोलमध्ये आहे. बाकीच्या मसालेदार गोष्टी जवळपास सारख्याच. थोडे मीठ कमी जास्त इतकेच अथवा जास्त शिजवलेला, रंगवलेला मसाला म्हणा.(Picture Hit)

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सीता और गीता ‘ ( हेमा मालिनी. १९७२) धर्मेंद्र व संजीवकुमार नायक.

मुरुगन कुमारन दिग्दर्शित ‘जैसे को तैसा’ ( जितेंद्र १९७३.) रिना राॅय व श्रीविद्या या नायिका. रमेश देव खलनायक.

शरद पिळगावकर निर्मित व मुरलीधर कापडी दिग्दर्शित ‘ चोरावर मोर ‘ ( उषा चव्हाण. १९८० )

पंकज पराशर दिग्दर्शित ‘चालबाज ‘ ( श्रीदेवी. १९८९) सनी देओल व रजनीकांत हीरो.

राकेश रोशन दिग्दर्शित ‘किशन कन्हय्या ‘ ( अनिल कपूर. १९९०) माधुरी दीक्षित व शिल्पा शिरोडकर या नायिका.

डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘जुडवा’ ( गोविंदा. १९९७) करिश्मा कपूर व रंभा या नायिका.

‘राम और श्याम ‘मधील रंजकता ‘जुडवा ‘त डेव्हिड धवन स्टाईल अतिरंजितपणे आली.

यातील जी. पी. सिप्पी निर्मित ‘सीता और गीता’ ( मुंबईत प्रदर्शन ३ नोव्हेंबर १९७२. ) च्या डबल धमाका प्रदर्शनाची पन्नाशी कधी बरे झाली हे समजलेच नाही. ( त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. त्यामुळेच हा चित्रपट देशात विविध ठिकाणी १० नोव्हेंबर, मग १७ नोव्हेंबर आणि त्यानंतर असा प्रदर्शित होत राहिला. तसे रिलीज हा देखील सही फंडा.)(Picture Hit)

या चित्रपटाची पटकथा सलिम जावेद यांची. एकाद्या जुन्या चित्रपटावर रंगरंगोटी करुन त्याची रिमेक फ्रेश क्रीम ठरेल अशी मांडणी बांधणी करण्यात ही जोडी बाकबगार होती. हिट चित्रपटाचे पुढील पिढीतही आकर्षण असते, म्हणूनच त्याची रिमेक अगदीच ‘काॅपी टू काॅपी ‘ करु नये, हेच तर आवश्यक असते. फिल्म दीवाने आवडते चित्रपट डोक्यात फिट्ट ठेवून असतो, त्याला रिमेक कितपत रंगलीय अथवा फसलीय हे पटकन लक्षात येते. ( प्रेक्षकांना कधीच गृहीत धरु नये हे वेगळे सांगायलाच नको.) म्हणून नवीन मसाला वापरावा. चव नवीन लागते.

हिट फाॅर्मुल्यावरील पिक्चरचे हे ‘माॅडेल ‘ आपण पाहूया. सीता आणि गीता या जुळ्या बहिणी. (अर्थात हेमा मालिनी) दुर्दैवाने त्या जन्मतःच वेगळ्या होतात. एक शहरात तर एक ग्रामीण भागात लहानाची मोठी होते. गीता एक धाडसी, धांदरट तर दुसरी सीता सोबर, भित्री. गीता आता शहरातून डोंबारी खेळत गुजरण करतेय. तिला ‘राका ‘ ( धर्मेंद्र) हा साथीदार भेटतो. त्यांच्यात प्रेमाचे धागे गुंफले जातात. सीताला रवि ( संजीवकुमार) हा प्रियकर मिळतो. पण तिची काकी कौशल्या ( मनोरमा) ही मात्र फारच जाच होत असतो. आईवडीलांच्या निधनानंतर सीताला तिच्या काका ( सत्येन कप्पू) आणि काकीने सांभाळलय. वाढवलयं. एकदा योगायोगाने सीताच्या जागी गीता आणि गीताच्या जागी सीता अशी अदलाबदल झाली आणि मनोरंजनाचे अधिकाधिक फटाके फुटतात. अगदी त्यांचे चुकीने लग्न लावण्यापर्यंत गोंधळ निर्माण होतो.

=======

हे देखील वाचा : अमिताभ बच्चन राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?

=======

फर्स्ट शोपासूनच पब्लिकने पिक्चर एन्जाॅय केला आणि रौप्यमहोत्सवी यशाचा जणू सिग्नल मिळाला. मुंबईत या पिक्चरचे मेन थिएटर मिनर्व्हा होते. के. वैकुंठ यांचे कुशल छायाचित्रण व एम. एस. शिंदे यांचे कसबी संकलन यांचा खास उल्लेख हवाच. त्या काळात फार तांत्रिक सुविधा नव्हत्याच आणि डबल रोलवरचे कॅमेरा व संकलनाचे काम सोपे नव्हतेच. आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत यांनीही या मनोरंजनात मस्त भर टाकली. अरे जिंदगी है खेल ( पार्श्वगायक आशा भोसले व मन्ना डे), अभी तो हाथ मे जाम है ( मन्ना डे), कोई लडकी ( किशोरकुमार व लता मंगेशकर), ओ साथी चल ( किशोरकुमार व आशा भोसले) ही गाणी चित्रपट रंगवण्यात भर घालतात आणि आजही ही गाणी लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे, धर्मेंद्रला मन्ना डेचा आवाज फिट बसलाय. नायक व पार्श्वगायक हा एक वेगळाच विषय आहे.हेमा मालिनीने भारीच धमाल भूमिका रंगवलीय. मिळालेल्या फुल्ल स्कोपचा तिने भन्नाट वापर केलाय. धर्मेंद्र व संजीवकुमारनेही रंग भरलाय.(Picture Hit)

आता थोडेसे गाॅसिपिंग. तेही हवेच. पिक्चरची हवा करण्यात त्याची सपोर्ट सिस्टीम असतेच. या चित्रपटाबद्दलही अनेक कथा दंतकथा, गोष्टी चर्चेत आहेत. सिनेमाचे जग म्हटल्यावर त्या असायलाच हव्यात. या चित्रपटासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अगोदर मुमताजला विचारले होते. पण निर्माते जी. पी. सिप्पी यांनी म्हणे भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी ‘ ( १९६८) च्या वेळेस ठरलेले मानधन न दिल्याने यावेळी तिने जरा अधिकची मागणी केली. बरोबरच आहे, एव्हाना ती स्टार होती. तिचा फॅन्स फाॅलोअर्स वाढला होता. तिची अधिक मानधनाची मागणी जी. पी. सिप्पीना मान्य नव्हती. सिप्पी पिता पुत्रानी आपल्या ‘ अंदाज मधील हेमा मालिनीची निवड केली. राजेश खन्नाने एक नायक साकारावा असे जी. पी. सिप्पीना मनोमन वाटत होते. त्यांच्याच भास्कर दवे दिग्दर्शित ‘राज ‘ ( १९६७) पासून राजेश खन्नाची करियर सुरु झाली. पण त्यांच्याच ‘अंदाज ‘( १९७१) मध्ये भूमिका साकारत असतानाच त्याला म्हणे रमेश सिप्पीची कामाची पद्धत आवडली नाही म्हणून त्याने दिग्दर्शकच बदलायची मागणी केली. ( असं म्हणतात). ती मंजूर कशी होईल? एका दृश्यात पंख्यावर चढून दृश्य देण्यापूर्वी रमेश सिप्पीने तसे करुन दाखवले म्हणून हेमा मालिनी त्या दृश्यासाठी तयार झाली. तो फोटो गाजला. डोंबारीच्या खेळातील अनेक साहसी दृश्ये शशिकला पवार यांनी हेमा मालिनीची डमी म्हणून साकारली. पडद्यावर हेमा मालिनी भाव खाऊन गेली. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात संजीवकुमार हेमा मालिनीकडे आकृष्ट झाला. एकतर्फी प्रेम होते ते. जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचेही याच चित्रपटाच्या काळात सूत जुळले.

एक चित्रपट घडत असतानाच अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात.’सीता और गीता’च्या ज्युबिली हिटनंतर निर्माते जी. पी. सिप्पी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शोले’च्या निर्मितीत पाऊल टाकले आणि ३ ऑक्टोबर १९७३ रोजी बंगलोरजवळ उभारलेल्या रामगढ गावाच्या सेटवर ‘शोले’चा मुहूर्त केला….

लहानपणी हरवलेले दोन भाऊ अथवा बहिणी पिक्चरच्या अखेरीस एकमेकींना भेटतात हा एक हिट फाॅर्मुला पब्लिकने सातत्याने पसंत केला. यातील मनोरंजनाची खिचडी पुन्हा पुन्हा हवीशी झाली म्हणून अशा पिक्चर्सना थिएटरवर हमखास हाऊसफुल्ल गर्दी झाली. त्याचसाठीच तर चित्रपट निर्मिती करायची असते. टाॅकीजच्या गोष्टीतील हाच मेन शो.

दिलीप ठाकूर

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.