Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?

 अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?
बात पुरानी बडी सुहानी

अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?

by धनंजय कुलकर्णी 30/11/2022

ऐंशीच्या दशकामध्ये रुपेरी पडद्यावर आलेला अभिनेता गोविंदा(Govinda Story) नंतर प्रचंड लोकप्रिय झाला परंतु सुरुवातीला त्याला फार मोठा स्ट्रगल करावा लागला होता. त्याची पार्श्वभूमी जरी सिनेमाची असली तरी त्याला त्याचा काही एक उपयोग झाला नाही. गोविंदाला अक्षरशः या स्टुडिओतून त्या स्टुडिओ अशा चकरा माराव्या लागल्या. कुठेच काम होत नव्हते. पण मनात जिद्द होती; एक दिवस पडद्यावर चमकण्याची! त्या जिद्दीवरच तो महिनोन्महिने मायानगरीत अक्षर भटकत होता. २१ डिसेंबर १९६३ या दिवशी गोविंदाचा जन्म झाला. त्याचे आई-वडील सिनेमाशी संलग्न होते पण त्याच्या वडिलांनी सिनेमामध्ये खूप मोठे अपयश पाहिले होते. या अपयशाने त्यांचे संपूर्ण कुटुंब जणू आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाले होते. त्यांना त्यांचा कार्टर रोड वरील बंगला विकावा लागला होता आणि दूर विरारला शिफ्ट व्हावे लागले होते. अशा परिस्थितीतच गोविंदाचा(Govinda Story) जन्म झाला होता. वर्तक कॉलेज मधून त्याने कॉमर्सची डिग्री घेतली पण  गोविंदाचे चित्रपटातच काम करायचे हे  पहिल्यापासूनच स्वप्न होतं. मिथुन चक्रवर्तीचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘त्याच्यासारखाच व्हायचं’ असं त्यांना मनोमन ठरवले होते. त्यासाठी त्याचा संघर्ष चालू होता.

त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रवेशाचा किस्सा खूपच इमोशनल असा आहे. एकदा आपले फोटो घेऊन गोविंदा (Govinda Story)प्राणलाल मेहता यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी मेहता ‘लव 86’ या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. मुख्य भूमिकेमध्ये महेंद्र कपूर यांचा मुलगा रोहन कपूर होता. दुसऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांचा शोध चालू होता. ज्यावेळी गोविंदाला ही बातमी कळाली तो ताबडतोब मेहरा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला परंतु तोवर ऑफिस बंद झाले होते आणि वॉचमनने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले. त्याप्रमाणे गोविंदा दुस(Govinda Story)ऱ्या दिवशी मेहरा यांच्या ऑफिसमध्ये हजर झाला. आता ऑफिस ओपन होते परंतु मेहरा साहेब तिथे उपस्थित नव्हते. तिथे केवळ ऑफिस बॉय अशोक उपस्थित होता. मेहरा साहेब ऑफिसच्या जवळच राहत होते.  गोविंदाने विनवण्याकरून अशोकला  समजावून सांगितले,” कृपया मेहरा साहेबांना फोन करून सांगा मी त्यांना भेटायला आलो आहे.” परंतु ऑफिस बॉय असल्यामुळे तो त्यांना थेट फोन करायला घाबरत होता आणि तो गोविंदाला पुन्हा दुसऱ्या दिवशी यायला सांगत होता. गोविंदा रडकुंडीला आला होता आणि तो सारखा ऑफिस बॉय अशोकला विनंती करत होता. 

========

हे देखील वाचा : हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी

========

गोविंदाची दया येऊन अशोक त्याला म्हणाला,” तू इथेच थांब. मी मेहरा साहेबांना सांगून येतो.” परंतु लगेच त्याच्या डोक्यात वेगळीच शंका आली. तो म्हणाला,” तू ऑफिसच्या बाहेर थांब.” त्यावर गोविंदा म्हणाला,” मी काही चोर नाही. मी इथे चोरी करायला आलो नाही. मी इथे काम मागायला आलो आहे. तुला जर याचीच भीती वाटत असेल तर तू ऑफिसला बाहेरून कुलूप लाव आणि मेहरा साहेबांना जाऊन सांग. मी आत थांबतो.” ही आयडिया ऑफिस बॉय अशोकला पटली. त्याने गोविंदाला ऑफिसमध्ये बंद केले आणि बाहेरून कुलूप लावून तो मेहरांच्या घरी गेला. योगायोगाने मेहरा साहेब घरी उपलब्ध होते. त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ देखील तिथे आले होते. ऑफिस बॉय अशोकने सर्व प्रसंग त्यांना सांगितला. मेहरा यांनी कपाळाला हात लावून घेतला आणि म्हणाले ,” अरे असे काय केले तू?” म्हणून ते अशोकला रागावले आणि त्याला गाडीत घालून इस्माईल श्रॉफ सोबत ते तडक ऑफिसवर आले. अशोकने पुढे येऊन कुलूप उघडले. गोविंदा(Govinda Story) आत तसाच उभा होता. तो खाली खुर्चीवर बसला देखील नव्हता.

इस्माईल श्रॉफ आणि प्राणलाल मेहरा हे गोविंदाकडे पाहत राहिले. त्याची काम वरची श्रद्धा पाहून ते दोघे अवाक झाले. त्यांनी त्याची स्क्रीन टेस्ट घेतली आणि अशा प्रकारे गोविंदाचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. सिनेमा फ्लॉप झाला पण गोविंदा क्लिक झाला. त्यानंतर गोविंदाच्या(Govinda Story) चित्रपटांची मोठी रांगच लागली. पण गोविंदाने ऑफिस बॉय अशोकजी जाणीव ठेवली. नंतर त्याने अशोकला आपल्या सोबत ठेवून घेतले!

धनंजय कुलकर्णी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.