मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘दिवार’मध्ये अमिताभ ऐवजी दिसले असते राजेश खन्ना
यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिवार’ हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट. या सुपर डुपर हिट सिनेमाने अमिताभचे सुपरस्टार पद निश्चित झाले. २५ जानेवारी १९७५ या दिवशी ‘दिवार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर आठ महिन्यानंतर १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘दिवार’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील एक माइल स्टोन सिनेमा ठरला. देशभर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. देशातील प्रत्येक टेरिटेरी मधून एक कोटी रुपये कमावणारा हा सिनेमा सर्व दूर यशस्वी ठरला. हा चित्रपट सलीम जावेद यांनी लिहिला होता. याची स्टोरी त्यांनी १९७३ सालीच लिहिली होती. दिग्दर्शक यश चोप्रा यांना ती स्टोरी त्यांनी ऐकवली. त्यांना ती स्टोरी आवडली. त्यावेळी यश चोप्रा आपल्या यशराज चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने तयार होत असलेल्या ‘दाग’ या चित्रपटांमध्ये बिझी होते. त्यांनी हेच कथानक निर्माता गुलशन राय यांना ऐकवायला सांगितले. गुलशन राय यांना हे कथानक प्रचंड आवडले. गुलशन राय आणि यश चोप्रा त्यावेळी देव आनंदला घेऊन ‘जोशीला’ हा चित्रपट बनवत होते. आपल्या त्रिमूर्ती फिल्म्स या संस्थे तर्फे त्यांनी हा सिनेमा बनवायचे ठरवले.
गुलशन राय यांच्या डोक्यात यातील विजय वर्मा जी भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली ती राजेश खन्नाला देण्याचा विचार होता. त्यासाठी त्यांनी राजेश खन्ना सोबत बोलणे देखील सुरू केले. यश चोप्रांना मात्र या चित्रपटासाठी अमिताभ बच्चनच (Amitabh Bachchan) हवा होता. यातील रवी वर्मा (जी भूमिका नंतर शशी कपूर यांनी केली) च्या भूमिकेसाठी त्यांच्या डोक्यात नवीन निश्चल चे नाव होते. तो तयार देखील झाला. आईच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी वैजयंतीमाला विचारण्यात आले होते वैजयंतीमालाने १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘गंवार’ या चित्रपटानंतर चित्रपट सन्यास घेतला होता. चरित्र अभिनेत्री म्हणून तिने पुन्हा आगमन करावे असा निर्मात्याचा आग्रह होता. परंतु तिने नम्र नकार दिला. त्या काळात म्हणजे १९७३ साली राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरूढ होता आणि त्याचे सिनेमे सर्वत्र गाजत होते. त्याच्याकडे डेट्सचा मोठा प्रॉब्लेम होता. त्यामुळे हा चित्रपट करण्यास त्याने असमर्थांचा दर्शवली.
जेव्हा राजेश खन्ना या सिनेमातून बाहेर पडला तेव्हा अमिताभ बच्चन यांना या भूमिकेसाठी विचारण्यात आले कारण अमिताभचा जंजीर त्यावेळी सेटवर होता आणि त्याचे काही शॉट्स यश चोप्रा आणि गुलशन राय यांना दाखवण्यात आले. यश चोप्रा यांना अमिताभ भलताच इम्प्रेसिव्ह वाटला होता आणि त्यांनी अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) नावाला होकार दिला. अमिताभची चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून निवड झाल्यानंतर नवीन निश्चलने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करायला नकार दिला! कारण त्याच्या मते ‘परवाना’ (१९७१) या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता तर अमिताभ सहायक भूमिकेत होता त्यामुळे त्याने सिनेमा करायला नकार दिला. आता या जागी शशी कपूरला विचारण्यात आले. शशी कपूर आणि यश चोप्रा यांचे असोसिएशन खूप केले होते. शशी कपूर ला पहिल्यांदा नायकाची मोठी भूमिका यश चोप्रा यांनी त्यांच्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात १९६१ साली दिली होती. त्यामुळे त्यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.
अशा प्रकारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शशी कपूर यांचा चित्रपटात या प्रवेश झाला. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. अर्थात रोटी कपडा और मकान हा चित्रपट साईन झाला होता. वैजयंतीमालाने नकार दिल्यानंतर या सिनेमाच्या आईच्या भूमिका साठी वहिदा रहमान यांना फायनल करण्याचा गुलशन राय यांचा विचार होता. परंतु यश चोप्रा यांनी त्याला विरोध केला. कारण त्यावेळी त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्ट ‘कभी कभी’ मध्ये वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, राखी, शशी कपूर काम करणार होते आणि यात अमिताभची (Amitabh Bachchan) नायिका म्हणून वहिदा होती! एका सिनेमात नायिका आणि एका सिनेमात आई असे प्रेक्षक स्वीकारणार नाहीत. म्हणून वहिदा रहमानचा पत्ता कट झाला आणि तिथे निरूपा रॉयची वर्णी लागली. ‘दिवार’ चित्रपट हा सलीम जावेद यांची सर्वात उत्कृष्ट पटकथा आणि संवाद असलेला चित्रपट होता. या चित्रपटातील अनेक डायलॉग्स आज देखील प्रचंड लोकप्रिय आहेत.‘डावर साब मै आज भी फेकी हुए पैसे नही उठाता…’, ‘मेरे पास बंगला है गाडी है बँक बॅलेन्स तुम्हारे पास क्या है… मेरे पास मेरे पास मां है..!’, ’ मेरा बाप चोर है’, ‘भाई तुम साइन करोगे या नही…’, ’ जो पच्चीस बरस में नही हुआ वो अब होगा..’, ’ पीटर तुम मेरा बहार इंतजार कर रहे थे और मै तुम्हारा यहां…’ असे एकाहून एक जबरदस्त डायलॉग या चित्रपटात होते.
=====
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटातून सुपर स्टार राजेश खन्नाचा पत्ता कट
=====
या सिनेमातील शेवटचा मंदिरातील सीन जबरदस्त बनला होता. ‘आज खुश तो बहोत होगे तुम…’ या दीड मिनिटाच्या सीनसाठी तब्बल एक दिवसभर शूटिंग चालले होते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची या चित्रपटातील भूमिका काही अंशी हाजी मस्तान या कुख्यात स्मगलरच्या आयुष्यावर बेतली होती. या चित्रपटात शशी कपूर यांनी अमिताभच्या धाकट्या भावाची भूमिका केली आहे, परंतु वस्तुतः शशी कपूर हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. तसेच चित्रपटात आईची भूमिका करणारी निरुपा रॉय ही शशी कपूर पेक्षा तीन वर्षांनी आणि अमिताभ बच्चन पेक्षा आठ वर्षांनी मोठी होती! या चित्रपटात नीतू सिंग शशी कपूरची नायिका आहे परंतु अमिताभ (Amitabh Bachchan) आणि नीतू सिंग चा एकही शॉट या चित्रपटात नाही. फक्त एका ठिकाणी रेल्वे स्टेशनवर दोघे समोरासमोर येतात. हा चित्रपट लिहिताना सलीम जावेद यांच्या डोक्यात ‘गंगा जमुना’ आणि ‘मदर इंडिया’ हे दोन ब्लॉकबस्टर सिनेमे होते. या दोन सिनेमाचे व्यवस्थित मिश्रण करून ‘दिवार’ हा चित्रपट बनवला होता!