यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
![‘तुझेच मी गीत गात’ आहे मालिकेत दिसणार उर्मिला कानेटकरचा नवा अंदाज](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/05/Urmila-5-1.jpg)
‘तुझेच मी गीत गात’ आहे मालिकेत दिसणार उर्मिला कानेटकरचा नवा अंदाज
काही मालिका खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होऊन जातात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका त्यातलीच एक मालिका. वेगळा विषय, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे ही मालिका कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आता या मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावलाय. मालिकेत नुकतीच उर्मिलाची धमाकेदार एण्ट्री झाली आहे. मंजुळा सातारकरची भूमिका ती साकारात आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैदेहीच परत आल्याची खात्री झाली आहे. वैदेही सारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजे वैदेही नव्हे. आतापर्यंत स्वराज आणि तिची भेट झाली होती. मात्र आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे.(Tujhech Mi Geet Gaat Aahe)
![Tujhech Mi Geet Gaat Aahe](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/05/Urmila-3-1.jpg)
पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने कामतांच्या घरात प्रवेश केला असला तरी तिचा मनसुबा मात्र भलताच आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराज आणि मोनिकाच्या आयुष्यात नवं वादळ येणार हे नक्की.या आधी उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पडद्यावर पाहिलं आहे. मात्र ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतला अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे. एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसेल. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
![Tujhech Mi Geet Gaat Aahe](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/05/Urmila-4-1.jpg)
सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर मंजुळा हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय. एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.(Tujhech Mi Geet Gaat Aahe)
===============================
===============================
उर्मिला कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तसेच तिच्या लेकिसोबतचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी उर्मिला आणि तिचा नवरा आदिनाथ मध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. उर्मिला स्वतःच्या घरातील प्रोडक्शन हाउस सोडून दुसऱ्याच प्रोडक्शन हाउसच्या मालिकेमध्ये काम करते.त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होत.मात्र त्या दोघांनीही या विषयावर काही स्पष्टीकरण दिले नव्हते. महेश कोठारे दिग्दर्शित शुभ मंगल सावधान च्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची प्रेमकहाणी सुरु झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि डिसेंबर २०११ मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते.