Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा धमाकेदार टीझर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी‘ चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, प्रथमदर्शनी ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूपच भन्नाट असेल असं दिसत आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना राणावत पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा पात्रांचा लूक आणि चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण नंतर त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधानांवर बनवण्यात आला आहे. भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या १९७५ च्या घटनांना त्या कशा सामोरे गेल्या हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.(Emergency Movie Teaser)
सुमारे 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर शेअर करत कंगनाने लिहिले की, “रक्षक की हुकूमशहा? आपल्या इतिहासातील सर्वात काळ्या कालखंडाचे साक्षीदार व्हा जेव्हा आपल्या देशाच्या नेत्याने आपल्याच देशातील लोकांवर युद्धाची घोषणा केली.” या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर देखील या चित्रपटात झळकणार आहेत. इमर्जन्सी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौतने केले असून पटकथा रितेश शहा यांनी तयार केली आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात एका मजकुराने होते, ज्यात २५ जून १९७५ ची तारीख दिसते, जेव्हा या देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. यानंतर आणीबाणीचा गोंधळ, वृत्तपत्रातील बातम्या आणि अनुपम खेर यांना तुरुंगात डांबल्याची काही दृश्ये आहेत. टीझरमध्ये काही दमदार डायलॉगही देण्यात आले असून कंगनाची उर्फ इंदिरा गांधी ही शेवटची एन्ट्री आहे. त्यानंतर इंदिरा गांधींचा शक्तिशाली आवाज येतो ”इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा.”
‘इमर्जन्सी’ हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या १९७५ च्या घटनांच्या वेळी त्यांना कशा प्रकारे अडथळ्यांचा सामना करावा लागला हे प्रेक्षकांना या सिनेमात पहायला मिळणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या आणि आजपर्यंत त्या पंतप्रधान बनलेल्या एकमेव महिला आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या.(Emergency Movie Teaser)
===============================
हे देखील वाचा: Adipurush मधील हनुमानाचे ‘ते’ डायलॉग बदलले; तिकिटांची किंमत ही केली कमी
===============================
कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेला कसा न्याय देते याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिली आहे. तसेच यापूर्वी कंगनाने तामिळनाडूच्या माजी पंतप्रधान जयललिता यांच्या बायोपिकमध्ये ‘थलाइवी’ची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.