‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
स्ट्रगल पिरीयडमध्ये बनवलेली धून झाली १५ वर्षांनी सुपर हिट
सुपरस्टार शाहरुख खानच्या पहिल्याच सुपरहिट सिनेमा ‘दिवाना’ च्या एका सुपर हिट गाण्याचा हा किस्सा आहे. दिग्दर्शक राज कंवर या चित्रपटातील एका गाण्याच्या निर्मितीच्या मीटिंगमध्ये होते. चित्रपटातील नायक एका विधवा नायिकेच्या प्रेमात असतो. सुरुवातीला ती नायिका ते प्रेम नाकारते पण नंतर ती नायिका देखील हळूहळू त्याच्यावर प्रेम करू लागते. या सिच्युएशनचे गाणे त्यांना हवे होते. गीतकार समीर आणि संगीतकार नदीम श्रवणसोबत त्यांची चर्चा चालू होती. त्यावेळी संगीतकार नदीम श्रवण यांना त्यांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांनी बनवलेली एक जुनी धुन आठवली.
सत्तरच्या दशकात त्यांनी बनवलेली ही धून त्यांना प्रचंड आवडली होती. त्यावर त्यांनी काही डमी शब्द देखील लिहिले होते. त्यांनी ती धून आणि ते शब्द निर्मात्याला ऐकवले. सर्वांना ती धून खूपच आवडली आणि त्यांनी ती वापरायची ठरवले परंतु शब्द मात्र बदलायचे ठरवले. त्या पद्धतीने गीतकार समीरने गाणे लिहिले. गाणे तयार झाले ‘ऐसी दिवानगी देखी नही कही…’ हे गाणे गाण्यासाठी त्यांनी एस पी बाल सुब्रमण्यम आणि मराठी गायिका रंजना जोगळेकर यांचा विचार केला. परंतु रेकॉर्डिंगच्या वेळेला एस पी बालसुब्रमण्यम उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे नदीम याने त्यांचे भाऊ विनोद राठोड यांना गायला बोलावले आणि हे गाणे विनोद राठोड आणि रंजना जोगळेकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. त्यांना असे वाटले की, नंतर एस पी बालसुब्रमण आल्यानंतर त्यांच्या आवाजात हे गाणे डब करून घेवूत. आता फक्त या गाण्याची रेकॉर्डिंग करून ठेवूत. रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्वांनी ते गाणे ऐकल्यावर त्यांना विनोद राठोड यांचा आवाज खूपच आवडला आणि त्यांनी हे गाणे विनोद राठोडच्या आवाजातच चित्रपटात ठेवायचे ठरवले.
परंतु निर्माते गुड्डू धनोवा यांना मात्र हे दोन्ही नवोदित गायक एवढ्या चांगल्या गाण्यासाठी नको वाटले. या दोघांपैकी एक तरी कोणी सीनियर गायक असावा असे त्यांनी ठरवले आणि रंजना जोगळेकरच्या जागी त्यांनी अलका याज्ञिकच्या आवाजात ते गाणे डब केले. गाणे खूपच सुंदर बनले होते. सर्वजण तेच गाणे गुणगुणत होते. योगायोगाने त्याच दिवशी संध्याकाळी फिल्मफेअर अवॉर्ड्स सेरेमनी होता. या कार्यक्रमात नदीम श्रवण यांना दुसऱ्यांदा उत्कृष्ट संगीतकाराचे पारितोषिक प्राप्त झाले. चित्रपट होता ‘साजन’.
======
हे देखील वाचा : अमीर खान आणि किट्टू गिडवानीचा लीप लॉक किसिंग सीन आठवतो कां?
======
पहिल्यांदा त्यांना त्याच्या मागच्या वर्षी ‘आशिकी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नदीम श्रवण यांना हे ‘दिवाना’चे गाणे खूपच लक्की वाटले ज्या दिवशी गाणे ते रेकॉर्डिंग झाले त्याच संध्याकाळी त्यांना दुसऱ्यादा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामुळे त्यांना या गाण्यात बद्दल विशेष प्रेम वाटू लागले. आणि त्यावेळी ते दोघे म्हणाले की,” या गाण्यासाठी नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षी तिसरा अवॉर्ड मिळेल!”
त्या पद्धतीने पुढच्या वर्षी नदीम श्रवण यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तो देखील याच चित्रपटासाठी. याच सिनेमातील गाण्यासाठी देखील पुरस्कार मिळाला पण गाणे मात्र वेगळे होते. कुमार सानू यांनी गायलेले याच सिनेमातील ‘सोचेंगे तुम्हे प्यार करे की नही…’ अशा पद्धतीने स्ट्रगल पिरीयडमध्ये तयार केलेल्या एका धून बनवलेल्या गाण्याच्या सिनेमाला फिल्म फेअर मिळाले आणि त्यांची हॅट्रिक झाली!