‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’मुळे ट्विंकल खन्नाला पोलीस कोठडीची हवा खावी लागली…
कधी कधी कलावंतांकडून अनपेक्षितपणे किंवा नकळतपणे घडलेली एखादी कृती त्यांना चक्क जेलपर्यंत नेऊ शकते. ही कृती करताना त्यांच्या मनात अजिबात ही शंका आलेली नसते. परंतु त्या कृतीचा अर्थ भलताच काढला गेल्यामुळे हा अनर्थ ओढवला जातो. कुणाबाबत झाला होता हा किस्सा? आणि काय होता हा सगळा प्रकार?
२००९ साली लॅक्मे फॅशन वीकच्या दरम्यान फॅशन डिझायनर तरुण ताहिलीयांनी एक शो अरेंज केला होता. ज्यामध्ये डेनिम जीन्सच्या नव्या प्रॉडक्टला लाँच करायचे होते. त्यासाठी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला आमंत्रित केलं होतं. हा प्रॉडक्ट होता अनबटन जीन्स. यासाठी अक्षय कुमारला ही जीन्स परिधान करून रॅम्प वरून चालत यायचे होते. अक्षय कुमारच्या हस्ते हे प्रॉडक्ट लाँच होणार प्रेक्षकांची या शो ला मोठी गर्दी होती. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेतच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बसली होती. शो सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारने घातलेल्या त्या जीन्सच्या झिपमध्ये त्याला थोडासा प्रॉब्लेम वाटला. ही झिप प्रॉपरली वर्क करत नव्हती. त्यामुळे त्याने प्रेक्षकात बसलेल्या आपल्या पत्नीला मदतीसाठी बोलावले. तिने सुरुवातीला नकार दिला पण खूपच अन कम्फर्टेबल फील होत असल्याने अक्षय कुमार स्वतः खाली आला आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) समोर उभा राहिला व आपला प्रॉब्लेम सांगितला. तिने त्याच्या पायाशी बसून त्याच्या जीन्सची झिप खालीवर करून ती व्यवस्थित करून दिली! तसं पाहिलं तर हे अगदी छोटीशी घटना होती. परंतु मीडियाने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायला झाला !
यानंतर मुंबईतील एका सामाजिक कार्यकर्त्यांने हा सर्व अश्लील प्रकार असून सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दल ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि अक्षय कुमार तसेच या शोचे आयोजक यांच्या विरुद्ध वाकोला पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल केला. अक्षय आणि ट्विंकलसाठी हा सर्व प्रकार नवीन होता. ८ एप्रिल २००९ या दिवशी त्यांच्यावर समन्स बजावण्यात आले आणि दोघांनाही पोलीस चौकीमध्ये हजर राहायला सांगितले. त्या दोघांची दोन तास पोलिसांनी चौकशी केली आणि अक्षय कुमारला त्यातून निर्दोष सोडले पण ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) वर खटला दाखल केला. तिला पाचशे रुपयाच्या जामिनावर सोडले. त्याकाळी बऱ्याच जणांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला. या दोघांनी मुद्दाम पब्लिसिटी मिळावी म्हणून असला प्रकार केला असा समज त्यावेळेला झाला. संस्कृती रक्षक खडाडून जागे झाले आणि या दोघांना प्रचंड ट्रोल केले गेले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दल हा खटला बहुधा अजूनही चालूच आहे. न्यायमूर्ती ठीपसे यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी ट्विंकलच्या (Twinkle Khanna) विरोधी वकिलांनी असा दावा केला की, भले अक्षय कुमार तिचा पती जरी असला तरी सार्वजनिक ठिकाणी त्याच्या पॅन्टच्या झिपची उघडझाप करणे हे अश्लील गटामध्ये मोडते! २०१६ साली ट्विंकल आणि अक्षय कुमार हे दोघे करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात आले होते तिथे देखील ट्विंकलने (Twinkle Khanna) या प्रकरणाचा उल्लेख केला आणि तिने सांगितले,” मी आजही पाचशे रुपयांच्या जामीनावर बाहेर आहे अजूनही तो खटला चालू आहे.”
=======
हे देखील वाचा : अमीर खान आणि किट्टू गिडवानीचा लीप लॉक किसिंग सीन आठवतो कां?
=======
या इव्हेंटच्या दुसऱ्याच दिवशी अक्षय कुमारला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळणार होता त्यासाठी हे दोघे लगेच दिल्लीला रवाना झाले. तिथे अक्षय कुमारची सासू डिंपल कपाडियाचा मेसेज ट्विंकलला आला “मुंबई पोलीस तुम्हा दोघांच्या शोधात आहे आणि काल तुमच्या हातून जे वर्तन घडले आहे त्याच्याविरुद्ध मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तुमच्याविरुद्ध केस दाखल केलेली आहे!” आयुष्यातील सर्वोच्च सन्मान घेत असतानाच अक्षय कुमारला काही क्षणातच या एका पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार ही माहिती मिळाली!
आता हा सर्व प्रकार खरोखरच अनावधानाने आणि नकळत झाला होता की, वकील म्हणतात त्याप्रमाणे हा पब्लिसिटी स्टंट होता हे माहिती नाही परंतु हा खटला अजूनही प्रलंबित आहे, असे ट्विंकल खन्नाने एका अलीकडेच मुलाखतीत सांगितले!