Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!

 हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!
बात पुरानी बडी सुहानी

हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!

by धनंजय कुलकर्णी 23/08/2023

हिंदी सिनेमाच्या संगीतातील साठच्या दशकातील गाणी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अजूनही रसिकांच्या लक्षात आहे. त्याकाळात गाणं बनवणं हे ‘टीमवर्क’ होते. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री हे सर्व तर एकत्र येऊन मीटिंग अटेंड करत असत. त्यामुळे या सर्वांच्या भावना या गाण्यांमध्ये आपोआप उतरत असत.

अलीकडच्या काळामध्ये डिजिटल रेकॉर्डिंगच्या काळामध्ये हा असला प्रकार राहिलेला नाही. प्रत्येकजण आपल्या वाट्याचा पीस गाऊन जातो किंवा वाजवून जातो आणि नंतर हे सगळे पिसेस एकत्र करून गाणं बनतं. त्यामुळे या गाण्यांना एक कृत्रिमता आलेली असते. पूर्वीच्या गाण्यांमधील होमोजीनियसपणा या गाण्यांमध्ये औषधालाही सापडत नाही. त्यामुळेच आज पन्नास-साठ वर्षे उलटून गेली तरी ही गाणी आपल्याला त्यातील म्युझिक पिसेस सहित आठवतात. इतकी ही गाणी आपल्या मनात खोलवर रुजलेली आहेत. या गोल्डन इरा मधील गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या कथा तर थक्क करायला लावतात. (Mukesh)

परस्परांवरील विश्वास, एकमेकांची घेतलेली काळजी आणि चांगलं असंच काही घडवायचं याचा ध्यास त्यातून अप्रतिम कलाकृती घडत होत्या. १९६७ साली सुनील दत्त आणि नूतन यांचा ‘मिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुनर्जन्मवर आधारित या चित्रपटातील गाणी अतिशय गोड होते. ही गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी आणि त्याला संगीत दिल होत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. (Mukesh)

या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं ‘सावन का महिना पवन करे सोर जियरा रे झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर’ हे गाणं १९६७ सालच्या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात या गाण्याने पहिला क्रमांक पटकावला होता. या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा खूप भावस्पर्शी असा आहे. झालं असं होतं या गाण्याच्या रिहर्सल झाल्या. गाणं रेकॉर्ड करायचा दिवस ठरला. पण रेकॉर्डिंग पूर्वी अचानक गायक मुकेश (Mukesh) यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही महिने आराम करायला सांगितला. 

त्यानंतर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर मुकेश (Mukesh) पुन्हा रेकॉर्डिंगसाठी फिट झाले. त्यांच्या आजारापूर्वी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गाण्याची जी धून बनवली होती त्यावेळी या गाण्यात लता मंगेशकर आणि मुकेश यांना दोन मोठे आलाप गायचे होते. परंतु आता सिच्युएशन बदलली होती. डॉक्टरांनी मुकेशला हाय पीचची गाणी गायला बंदी घातली होती. “आपली तब्येत सांभाळूनच गाणी गा” असाच सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी मुकेश यांच्या साठीचा आलाप काढून टाकला व त्या ठिकाणी म्युझिक पिसेस टाकण्याचा निर्णय घेतला. कुठून तरी ही बातमी मुकेश (Mukesh) यांना कळाली. त्यांना आधी वाईट वाटले पण संगीतकार आपली काळजी करतात हे ऐकून बरे देखील वाटले. गाण्याच्या पूर्वी पुन्हा रिहर्सल झाल्या. अर्थातच त्यात मुकेशचा आलाप नव्हता. फक्त लताचा होता. टेक पूर्वी लता आणि मुकेश आपापसात बोलत होते.

त्यावेळी मुकेश (Mukesh) यांनी लताला सांगितले, “ तू लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना काही सांगू नकोस पण या गाण्यातील आलाप मी घेणारच आहे!” त्यावर लता म्हणाली ,”मुकेश भैय्या तुम्ही असे करू नका. तुम्हाला डॉक्टरने हाय पीचची गाणी गायला मनाई केली आहे.” पण मुकेश आपल्या भुमिकेवर ठाम होता. तो लताला असे देखील म्हणाला,” जर माझा आलाप खराब असेल तर आपण तो काढून टाकायला सांगू.” मुकेशच्या (Mukesh) हट्टा पुढे लता शांत राहिली, मामला दोघांमध्येच होता. गाण्याचे फायनल रेकॉर्डिंग सुरू झाले. पहिला अंतरा झाला. त्यानंतर लताचा आलाप झाला. आता दुसरा अंतरा झाला. इथे मुकेशचा आलाप होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी म्युझिक पीसेस वाजवण्याकडे इशारा केला. पण त्याचवेळी म्युझिक रूम मधून मुकेशने आलाप गायला सुरुवात केली. सर्व जण अचंबित झाले. मुकेशने (Mukesh) हातानेच चालू ठेवा असे सांगितले. लक्ष्मीकांत प्यारेलालचा नाईलाज झाला. आणि मुकेशचा आलाप या गाण्यात आला! रेकोर्डिंग नंतर संगीतकारांनी मुकेशला विचारले ,” तुम्ही आलाप का घेतला? डॉक्टरांनी तुम्हाला हाय पीच ची गाणी गाऊ नका असे सांगितले आहे ना ?” त्यावर मुकेशजी यांचे उत्तर होते,” मेरी स्वास्थ की वजह से तुम्हारी इतनी सुंदर काम्पोजिशन खराब नही करना चाहता था. आलाप के बिना ये गीत अधुरा रहता!”

========

हे देखील वाचा : प्रीमियरच्या दिवशी एयरपोर्टवर का अडवल्या ‘शोले’च्या प्रिंटस

========

आज तुम्ही जेव्हा हा मुकेशचा आलाप ऐकता त्यावेळी कुठेही तुम्हाला तो बदसुरा वाटत नाही. मुकेश करीता ही मोठी आत्म विश्वास वाढवणारी घटना होती. पार्श्वगायक मुकेश (Mukesh) यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि परवा २७ ऑगस्टला मुकेश यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने ही एक सुरीली आठवण कलाकृतीच्या वाचकांसाठी! 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured Mukesh
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.