विद्या बालन : एकेकाळी बॅड लक समजली जाणारी हिरोईन !
विद्या बालन (Vidya Balan) म्हणजे सोज्वळ दिसणारा आकर्षक चेहरा, सळसळता आत्मविश्वास, कसदार अभिनय ! ‘परिणीता’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मुख्य अभिनेत्रीची बॉलिवूडमधील प्रतिमाच बदलवली. ‘डर्टी पिक्चर’ सारखा त्या काळातील बोल्ड समजला जाणारा पण काळाच्या पुढच्या सिनेमाद्वारे तिने वुमन ओरिएण्टेड फिल्म्सचा ट्रेंड सुरु झाला. तोपर्यंत फिल्म्स नटांच्या नावावर विकल्या जात होत्या आणि मुख्य अभिनेत्रीचे काम फक्त छान दिसणे आणि मुख्य अभिनेत्याच्या प्रेयसीचा रोल प्ले करणे एवढेच होते. म्हणजे सोज्वळ दिसणारा आकर्षक चेहरा, सळसळता आत्मविश्वास, कसदार अभिनय ! ‘परिणीता’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मुख्य अभिनेत्रीची बॉलिवूडमधील प्रतिमाच बदलवली. ‘डर्टी पिक्चर’ सारखा त्या काळातील बोल्ड समजला जाणारा पण काळाच्या पुढच्या सिनेमाद्वारे तिने वुमन ओरिएण्टेड फिल्म्सचा ट्रेंड सुरु झाला. तोपर्यंत फिल्म्स नटांच्या नावावर विकल्या जात होत्या आणि मुख्य अभिनेत्रीचे काम फक्त छान दिसणे आणि मुख्य अभिनेत्याच्या प्रेयसीचा रोल प्ले करणे एवढेच होते.
‘डर्टी पिक्चर’ नंतर कहाणी, इश्किया, पा, नो वन किल्ड जेसिका अशा सारख्या दर्जेदार मेन स्ट्रीम बॉलिवूड फिल्म्समध्ये काम केले. तिला २०१४ साली फिल्म इंडस्ट्रीमधील योगदानासाठी ‘पदमश्री’ किताबाने पुरस्कृत करण्यात आले. आज विद्या बालनला बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका समजले जाते पण तुम्हाला माहितेय का ? करियरच्या सुरुवातीलाच तिला अनलकी किंवा प्रोजेक्टसाठी बॅडलक समजले जायचे.
वयाच्या १६व्या वर्षी विद्या बालन (Vidya Balan) एका सीरियलमध्ये काम करणार होती पण ऐनवेळी तो प्रोजेक्ट बंद झाला. मग एकता कपूरच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ ने ‘हम पांच’ मधील एका रोलसाठी तिची ऑडिशन घेतली, ज्यात ती सिलेक्ट झाली. पुढे काही वर्षे हा शो चांगलाच चालला. हा शो बंद झाल्यानंतर विद्याने आपल्या कॉलेजवरती लक्ष केंद्रित केले. तिच्या आईला तिने पहिले शिक्षण पूर्ण करून रेगुलर जॉब करावे असे तिचे म्हणणे होते. कॉलेजमध्ये असताना तिला ऍडव्हर्टीझमेंटसाठी ऑफर येत होत्या आणि तिच्या आईला वाटले की, हिने जर हे काम केले तर अभिनयाचे भूत उतरेल आणि असे करत करत तिने ९१ प्रोजेक्ट्स केले. पण झाले उलटेच तोपर्यंत अभिनयाने विद्याला भलतेच झपाटले होते.
एका शूटसाठी ती बँगलोरला गेली असताना तिला मल्ल्यालम सिनेमाचा सुपरस्टार मोहनलाल सोबतच्या एका फिल्मसाठी ऑडिशन बाबतीत विचारण्यात आले, आपल्या सगळ्यात आवडत्या नटासोबत फिल्मच्या ऑफरमुळे विद्या खूपच एक्ससायट झाली होती. तिने ऑडिशन दिली आणि सिलेक्ट देखील झाली आणि त्या फिल्मचे पहिले शेड्युल पार पडल्यानंतर प्रोड्युसर आणि मोहनलाल यांच्या इगो क्लॅशेस झाले आणि चित्रपटाचे शूट थांबले.
या शूट दरम्यान विद्याने एकामागून एक अशा १६ फिल्म्स साइन केल्या होत्या. या फिल्मआधी त्या प्रोड्युसरने आणि मोहनलाल यांनी ८ फिल्म्स सलग हिट दिल्या होत्या आणि आता या इक्वेशनमध्ये विद्या नवीन होती. त्यामुळे या क्लॅशची कारण विद्या बालन आहे व तिने या फिल्मला बॅडलक आणले असे प्रोड्युसरने ठरवून टाकले आणि ही बातमी सर्व मल्ल्यालम इंडस्ट्रीमध्ये पसरली त्यामुळे तिच्या हातातून १६ फिल्म्स निघून गेल्या. सर्वानी काही ना काही कारण सांगत तिला फिल्म्समधून काढून टाकले.
या सर्व घटनांनंतर विद्याने तामिळ फिल्म्स वरती लक्ष केंद्रित करायला सुरु केले. तिला सर्वात आधी ‘रन’ या फिल्मसाठी निवडण्यात आले होते, ही तीच फिल्म ज्याचा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांना घेऊन बॉलिवूडमध्ये रिमेक बनवण्यात आला होता. त्याचे पहिल्या शेड्युलचे शूट देखील तिने केले होते पण निर्मात्यांनी कोणतेही कारण न देता तिला काढून टाकले आणि मीरा जास्मिनला घेण्यात आले. २००२ साली ‘बाला’ फिल्मसाठी तिचे सिलेक्शन करण्यात आले पण त्यात सुद्धा तिला काढून मीरा जास्मिनला घेण्यात आले.
========
हे देखील वाचा : ‘बॉबी’ नंतरचा राज कपूर
=======
पुढे २००३ साली ‘मनसेलम कलारी विक्रम’ हा सिनेमा तिला मिळला तो व्यवस्थित शूटदेखील झाला पण तो कधीच रिलीज झाला नाही. असे सगळे एका मागून एक अपयश येत असताना तिची मोठी बहीण तिला कसे अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या ११ फिल्म फ्लॉप झाल्यानंतर यशाची चव चाखली होती किंवा तब्बूला पहिलय सिनेमासाठी ६ वर्षे वाट पाहावी लागली होती अशा प्रकारचे किस्से सांगून तिचे मनोधैर्य उंच ठेवण्याचा प्रयत्न करत असत. पण आतल्या ऍक्टर मधील भुकेने तिला कधीच निराश होऊ दिले नाही आणि ती प्रयत्न करत राहिली. तिच्या प्रयत्नांना पहिले यश आले गौतम हलदार दिग्दर्शित बंगाली सिनेमा ‘बालो ठेको’ मध्ये तिला मुख्य भूमिका मिळाली. तो व्यवस्थित शूट होऊन प्रदर्शित देखील झाला आणि प्रेक्षक व क्रिटिक्स यांच्या पसंतीस उतरला आणि मग त्या फिल्म यामधील काम बघून २००५ साली प्रदीप सरकार यांनी तिला ‘परिणीता’मधील मुख्य रोल साठी निवडला पण निर्माते विधू विनोद चोप्रा यान त्या रोलसाठी कोणी प्रसिद्ध अभिनेत्री हवी होती आणि प्रदीप सरकार विद्या वरतीच ठाम होते त्यामुळे विद्याला ६ महिने ४० स्क्रीन टेस्ट मधून जावे लागले होते. परिणीता ही फिल्म हिट झाली आणि मग तिचे काम पाहून विधू विनोद चोप्रा याणी लगे राहो मुन्नाभाई फिल्ममधे घेतले ती फिल्म सुद्धा हिट ठरली आणि मग विद्याने मागे कधीच वळून पहिले नाही.