‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ गाण्यासोबत आहे किशोरजींचे खास कनेक्शन
आपल्याकडे चित्रपटांमध्ये दोन नायिकांची एकत्रित येऊन गायलेली गाणी तशी कमीच आहे. आपल्याकडे दोन पुरुषांच्या मैत्रीची भरपूर गाणी आहेत त्यामानाने दोन मुलींच्या मैत्रीचे आणि तशी कमीच गाणी आहे आणि त्याहून कमी आहेत तीन नायिकांची एकत्र येऊन गेलेली गाणी. याला कारण आपली फिल्म इंडस्ट्री मेल ओरिएंटेड आहे. हे एकमेव कारण आहे का? कदाचित असेल. पण एकूणच तीन नायिका एकत्र येऊन गाणे गातात हा प्रसंग आणि ही गाणी तशी संख्येने कमीच आहे. पण एक गाणे आहे या प्रकारातले. जे त्याकाळी भरपूर लोकप्रिय देखील झालं होतं. १९८९ साली एक चित्रपट आला होता ‘बटवारा’. (Kishor Kumar)
या सिनेमाचे दिग्दर्शक होते जे पी दत्ता. राजस्थानच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट जबरदस्त बनला होता. हा तसा मल्टीस्टारर मूव्ही होता. या सिनेमांमध्ये तीन नायक आणि तीन नायिका आणि डॅशिंग खलनायक होते. चित्रपटाची गाणी हसन कमाल यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. या चित्रपटात तीन नायिकांना एकत्र येऊन एक अप्रतिम गाणे तयार झाले होते. या त्रयी गीताचे बोल होते ‘तू मेरा कौन लागे…?’ या गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळचा एक किस्सा आणि या गाण्याचा आणि किशोर कुमारचा (Kishor Kumar) तसा अर्था अर्थी काही संबंध नसला तरी एक हळवी आठवण किशोर कुमार बाबतची या गाण्यासोबतची आहे. काय आहे ही आठवण? आणि काय आहे हा किस्सा?
या चित्रपटात तीन नायक होते धर्मेंद्र ,विनोद खन्ना आणि मोहसीन खान. (हाच तो मोहसिन खान जो एकेकाळी पाकिस्तान क्रिकेट मधील आघाडीचा फलंदाज होता नंतर त्याने दिलेल्या रॉय सोबत लग्न केले!) या चित्रपटात त्यांच्या नायिका होत्या डिंपल कपाडिया, अमृता सिंग आणि पुनम धिल्लो. या चित्रपटातील एका सिच्युएशनमध्ये तीन नायिका आपल्या नायकांना आठवत एक गाणे गातात. हे गाणे गाण्यासाठी संगीतकाराने अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांची निवड केली. बरेचसे राजस्थानी शब्द असलेल्या या गाण्याची धून राजस्थानी फोक ट्यूनवर आधारीत होती. चित्रपटात डिम्पलसाठी अलका याग्निक, अमृता सिंगसाठी कविता कृष्णमूर्ती आणि पूनम धिल्लांसाठी अनुराधा पौडवाल यांचे स्वर वापराचे ठरले. गाणे रेकॉर्ड झाले पण चित्रपटात चित्रीकरणाच्या वेळी बऱ्यापैकी गडबड झाली. म्हणजे ज्या गायिकेने ज्या नायिकेसाठी ज्या ओळी गायल्या होत्या त्यांची बऱ्यापैकी अदलाबदल झाली! अर्थात प्रेक्षकांच्या हे काही लक्षात आले नाही.
या चित्रपटाच्या निमित्ताने आपण जेव्हा भारतीय सिनेमातील तीन गायिकांनी एकत्र येऊन गायलेली गाणी आठवायचा प्रयत्न करतो तेव्हा अक्षरशः बोटावर मोजता येतील इतकीच आपल्याला आठवतात. पहिले गाजलेले गाणे आठवते ते १९४५ बनलेल्या ‘झीनत’ या चित्रपटातील! ही सुप्रसिद्ध कव्वाली आहे. ‘आहे ना भर शिकवे न…’ हे गाणं जोहराबाई अंबालीवाला, नूरजहान आणि कल्याणी यांनी एकत्र गायला होते. त्यानंतर पन्नासच्या दशकामध्ये गाजलेलं गाणं म्हणजे तीन मंगेशकर भगिनींनी गायलेलं ‘मदर इंडिया’ या चित्रपटातील ‘दुनिया मे हम आये है तो जीना ही पडेगा..’ यानंतर गाणी येत होती पण फारशी लोकप्रिय होत नव्हती. (Kishor Kumar)
१९८२ साली आलेल्या ‘जीवनधारा’ चित्रपटातील ‘जल्दी से आ मेरे परदेसी बाबुल जल्दी से…’ हे गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं. याच तीन गायिकांनी म्हणजे अलका याद्निक, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी ‘बटवारा’ या चित्रपटातील गाणे गायले होते. या काळात या तिघीतही तशी एकमेकांशी सुप्त स्पर्धा असल्यामुळे आपलं गाणं जास्तीत जास्त लोकप्रिय व्हाव चांगलं व्हावं यासाठी प्रत्येकीचा प्रयत्न होता. त्यामुळे या गाण्याचे रेकॉर्डिंग चढाओढीत पण गाणं छान झालं.(Kishor Kumar)
==========
हे देखील वाचा : जेव्हा भीमसेन जोशी यांना ‘या’ खतरनाक डाकूने अडवलं…
==========
या गाण्यासोबतची एक हळवी आठवण म्हणजे गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर तिघी बाहेर आल्या त्यावेळी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल चेहरा पाडून बसले होते. त्यांना वाटलं आपल्याकडून नक्कीच चूक झाली आहे म्हणून त्या एकमेकीकडे अपराधी भावनेने पाहू लागल्या. पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सांगितले ,”गाणं छान झालं पण एक वाईट बातमी आत्ता कानावर आली आहे.” त्यांनी विचारलं,” काय झालं?” तर त्यांनी सांगितलं,” आपल्याला सोडून गेले!”. तो दिवस होता १३ ऑक्टोबर १९८७. त्यामुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल अलका याज्ञिक अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांना ज्या ज्या वेळी हे गाणे आठवते त्यावेळी लगेच किशोर कुमारच्या निधनाची बातमी देखील आठवते. ही हळवी आठवण या गाण्यासोबत जोडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी हा सिनेमा सेटवर असतानाच अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘बंधुआ’ या चित्रपटाची घोषणा केली होती त्याचा मुहूर्त देखील मोठा शानदार झाला होता पण हा सिनेमा काही बनलाच नाही. त्यानंतर दहा वर्षांनी अभिषेक बच्चन ला घेऊन दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी ‘ रेफ्युजी’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट मात्र १४ जुलै १९८९ रोजी प्रदर्शित झाला होता.