“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

‘खाई के पान बनारस वाला…’ हे गाणं ‘डॉन’ साठी लिहिलेलं नव्हतं?
आजकाल समाज माध्यमांचा प्रभाव एवढा वाढला आहे की, प्रत्येकजण यातील तज्ञ बनला आहे यातूनच काही मजेदार अफवा देखील तयार होतात. त्या इतक्या व्हायरल होवून जातात की, कालांतराने हाच रेफरन्स देवून त्या खऱ्या सिद्ध करता येवू शकतात. सिनेमातील काही गाण्यांबाबत त्याच्या मेकिंग बाबत अनेक कथा या माध्यमातून निर्माण होतात. या सगळ्याच कथा खऱ्या असतात का? तर नाही.

अशीच एक अफवा किंवा लोणकढी थाप म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ (१९७८) चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या ‘खाई के पान बनारस वाला…’ या गाण्याबाबत मध्यंतरी सोशल मीडियावर या गाण्याबाबत एक चुकीची पोस्ट सर्वत्र फिरत होती. ती बातमी अशी होती की, ‘खाई के पान बनारस वाला….’ हे गाणे कल्याणजी आनंदजी यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या शंकर मुखर्जी यांच्या ‘बनारसी बाबू’ या देव आनंद- राखी च्या चित्रपटासाठी बनवले होते. परंतु देव आनंदला ही गाणे न आवडल्यामुळे ते गाणे मागे पडले आणि कल्याणजी आनंदजी यांनी पुढे १९७८ सालच्या ‘डॉन’ या चित्रपटासाठी हे गाणे वापरले. या अफवेला पुष्टी देण्यासाठी एक जुनी गोष्ट देखील त्यासोबत सांगीतली जाऊ लागली. अर्थात ती जुनी गोष्ट मात्र खरी होती. शम्मी कपूर मुमताज यांच्यावर चित्रित ब्रह्मचारी (१९६८) चित्रपटातील ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर…’ हे गाणं खरं तर ‘जब प्यार किसी से होता है’(१९६२) या सिनेमासाठी लिहिलं होतं. पण ते गाणं आहे ती चाल देव आनंद यांना न आवडल्याने ते पुढे अनेक वर्षांनी वापरले गेले ! (Don)
आता येवूत मूळ किस्स्याकडे. या बातमीच सत्य शोधण्यासाठी आपण प्रयत्न केला तर असे दिसते की, मुळात हे गाणे १९७३ साली तयारच झाले नाही. या गाण्याची एक ट्यून कल्याणजी आनंदजी यांनी तयार केली होती आणि ती देव आनंदला ऐकवली होती. परंतु देव आनंदला ती ट्यून काही आवडली नाही आणि तो विषय तिथेच संपला! दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बनारसी बाबू’ या चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. तर डॉन या चित्रपटाची गाणी अंजान यांनी लिहिली.अंजान यांचा ‘बनारसी बाबू’ या चित्रपटाची काडी मात्र संबंध नव्हता. त्यामुळे ते गाणे तेव्हा बनलेच नाही. ही बाब नक्की आहे! ट्यून मात्र जुनी आहे पण गाण्याचे शब्द म्हणजे ‘डॉन’(Don) या चित्रपटासाठीच लिहिले होते! याचा अर्थ हे गाणे ‘बनारसी बाबू’ या चित्रपटासाठी लिहिले नव्हते तर डॉन या चित्रपटासाठी लिहिले होते. या गाण्याला नंतर फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला. आज जवळपास ४५-५० वर्षानंतर देखील या गाण्याची गोडी अद्याप कायम आहे!
==========
हे देखील वाचा : हिरो विश्वजित यांचा फिल्मी आणि सुरेल प्रवास
=========
जाता जाता थोडंसं शंकर मुखर्जी या ‘बनारसी बाबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर मुखर्जी यांच्याबद्दल. त्यांनी देव आनंदला घेऊन बरेच चित्रपट दिग्दर्शित केले. बारिश, सरहद, प्यार मोहब्बत, महल आणि बनारसी बाबू. त्यांनी किशोर कुमारचा ‘झुमरू’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि सत्तरच्या दशकामध्ये अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर यांचा ‘फरार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आज मात्र शंकर मुखर्जी यांचं नाव त्यामुळेच देवानंद यांच्या साठीच घेतलं जातं. देवचा देखील तो नवकेतन च्या बाहेरचा लाडका दिग्दर्शक होता. ‘बनारसी बाबू’ या चित्रपटात राखी आणि योगिता बाली या दोन अभिनेत्री होत्या. योगिता बाली सोबतचा देव चा एकमेव चित्रपट. ‘राम और शाम’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ या दोन सुपरहिट चित्रपटाला नजरेसमोर ठेवूनच ‘बनारसी बाबू’ या चित्रपटाची निर्मिती झाली होती. यात देव आनंदचा डबल रोल होता. यातील त्याने साकारलेल्या कॅरेक्टर्स ची नावे मोहन आणि सोहन अशी होती. योगायोगाने ‘जॉनी मेरा नाम’ या गोल्डीने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात हीच दोन नावे देव आनंद आणि प्राण या दोन भावांची होती!