Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सिनेमावृद्धीसाठी प्रयत्न की थिएटरची मार्केटिंग ?

 सिनेमावृद्धीसाठी प्रयत्न की थिएटरची मार्केटिंग ?
कलाकृती विशेष

सिनेमावृद्धीसाठी प्रयत्न की थिएटरची मार्केटिंग ?

by दिलीप ठाकूर 13/10/2023

आपल्याकडील मल्टिप्लेक्समध्ये १३ ऑक्टोबर हा “सिनेमा डे” म्हणून साजरा केला जात असून त्या दिवशी फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट दाखवला जाणार आहे. तो एक रुपया तरी कमी का? असो. छान उपक्रम आहे. खरं तर ही अमेरिकन कल्पना. विदेशात अशा पद्धतीने वर्षभर वेगवेगळे डे साजरे केले जातात आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याकडे फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे, सिनेमा डे असं पडलेलं आहे. पण हे एका दिवसासाठीच ‘फॅड’ का? अगदी दररोज खास कमी केलेल्या दरात प्रत्येक मल्टिप्लेक्समधील किमान एका स्क्रीनमधला एक शो ठेवायला काय हरकत आहे? प्रत्येक मल्टिप्लेक्स कुठे दोन किंवा चार-पाच, कुठे तर सात स्क्रीन आहेत. प्रत्येक स्क्रीनची प्रेक्षक संख्याही कमी जास्त आहे. त्यातला एक स्क्रीन तर अशा पद्धतीने जुन्या चित्रपटाच्या एखाद्या खेळासाठी ठेवला आणि त्याचे तिकीट दर असेच ९९ रुपये ठेवले तर कालच्या आणि आजच्या पिढीचे चित्रपट रसिक नक्कीच त्याचं “हाऊसफुल्ल” स्वागत करतील. ओटीटीच्या काळातही मोठ्या स्क्रीनवरचा चित्रपट लय भारी. पडद्यावरच्या जगात आपण हरखून, हरवून, रंगून जातो.(National Cinema Day)

आता मी कालच्या आणि आजच्या पिढीसाठी अशासाठी म्हटलं की साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्याकडे मोठ्या शहरांमध्ये “मॅटीनी शो कल्चर” अतिशय लोकप्रिय होतं. आज ज्यांनी पन्नाशीसाठी ओलांडलीय ते एव्हाना निश्चित जुन्या आठवणीत गेले असतील. काय होतं हे मॅटीनी शोचंकल्चर? तर जुने चित्रपट आता पुन्हा एक आठवड्यासाठी मॅटिनी शोला प्रदर्शित होणे. त्यामुळे काय व्हायचं तर मागच्या पिढीच्या चित्रपट रसिकांना तो आपण यापूर्वी एकदा दोनदा पाहिलेला चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळे, तर पुढील पिढीला आता तो मागच्या पिढीचा चित्रपट पाहायची संधी मिळे. हा चांगलं उपक्रम होता. हे चांगलं एक सर्कल होतं. चित्रपट संस्कृतीचा तो एक भाग होता.

समाजात चित्रपट रुजण्यास ते पूरक होते आणि अशा पद्धतीने गोष्टी व्हायलाच पाहिजे. समजा, साठच्या दशकातील एखादा चित्रपट रसिकांना पुन्हा पहावासा वाटला तर त्या काळामध्ये माध्यम असं काय होतं? तर “गल्ली चित्रपट”. पण त्यासाठी तसा योग यायला पाहिजे. मॅटिनी शो ही अतिशय चांगली सोय होती. त्याच्यातून रोज सकाळी साडेअकरा वाजताचा मॅटिनी शो हे कल्चर आलं. ते लोकप्रिय झालं. छान स्थिरावलं आणि विशेषत: रविवारी तर जवळपास सगळे मॅटनी शो हाऊसफुल गर्दीत चालत. मी स्वतः गिरगावात लहानाचा मोठा होत असताना सेंट्रल, रॉक्सी, इम्पिरियल, नाझ, सुपर, ड्रीमलँड, शालिमार अशा चित्रपटगृहात मॅटीनीला कितीतरी जुने चित्रपट पाहून माझा बॅकलॉग भरुन काढला. असे फिल्म दीवाने त्या काळात खूप होते. आता हे जुने चित्रपट पुढील पिढीत त्या काळामध्ये कसे पोहोचायचे? पालकांकडून काही गोष्टी माहित पडत जायच्या. त्या काळामध्ये कुटुंबामध्ये चित्रपटाबद्दल चांगले सकारात्मक आणि चांगल्या चित्रपटाबद्दल नेहमी चर्चा व्हायची. तसे चित्रपटही असत म्हणा. सहकुटुंब चित्रपटाला जाणे ही संस्कृती होती. १९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झाल्यावर शनिवारी मराठी, संध्याकाळी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट पाहायला मिळायचा. त्यानिमित्ताने त्या चित्रपटाचा दिग्दर्शक, कलाकार, गाणी यानिमित्ताने चर्चा व्हायची.(National Cinema Day)

गाॅसिप्स पलिकडे जात, या गप्पा असत. कुतूहल म्हणून गाॅसिप्स येई नि जाई. तेव्हाच्या मुद्रीत मध्यमात अशा प्रकारच्या जुन्या काळातील चित्रपटांना विशेष स्थान होतं आणि त्यांना वाचक वर्ग देखील असे. काही उदाहरणं सांगतो, “रसरंग” मधील इसाक मुजावरांचा फ्लॅशबॅक कैलास झोडगे यांचं ‘कहा गये वो दिन’, त्यानंतर चित्रानंदमध्ये पुन्हा मुजावरांचा ‘फ्लॅशबॅक’, रविवार महाराष्ट्र टाइम्समधील विजय नाफडे यांचं “घुंगट के पट खोल” अशा पद्धतीची सदरे होती. मराठी तर झालं हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिकांमध्ये देखील जुन्या चित्रपटांबद्दल विशेष कव्हरेज दिलं जाई आणि ते मागील पिढी आणि आजची पिढी दोन्ही वाचत असे.(National Cinema Day)

त्याचप्रमाणे ‘रसरंग ‘मध्ये मला आठवतंय, ” एक नाव अनेक चित्रपट” असे एक सदर असे. म्हणजे जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित “अंदाज” (शम्मी कपूर, हेमामालिनी व विशेष पाहुणा राजेश खन्ना) रिलीज होत असताना तत्पूर्वी “अंदाज” नावाचा चित्रपट कधी बरे आला? मेहबूब खान दिग्दर्शित “अंदाज” ( १९४९) आला होता. त्यात राज कपूर, नर्गिस आणि दिलीप कुमारच्या भूमिका होत्या. अशा पद्धतीच्या सदरातून जुन्या चित्रपटाची माहिती सतत नवीन पिढीसमोर येत जाई आणि जुनी पिढीसुद्धा त्या आठवणीत रमत असे. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा पुश होता वा बुस्टर डोस होता तो जुन्या काळातील चित्रपटाचं लोकप्रिय गीत, संगीत आणि नृत्य. विशेषतः विविध भारतीवरील भुले बिसरे गीत, इराणी हॉटेलमधील जुक्स बॉक्स, विविध सणांच्या निमित्ताने शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असलेले लाऊड स्पीकर, रेडिओ सिलोन, याच्यातून जुनी गाणी कानावर पडत गुणगुणली जात.

त्या गाण्यांनी त्या जुन्या चित्रपटाभोवतीचे वलय वाढत असे आणि ते चित्रपट आपण कधी पाहतोय असं व्हायचे. देव आनंद आणि शम्मी कपूर या दोघांच्या चित्रपटातील अनेक गाणी हिट असल्यामुळे ते चित्रपट जास्त आकर्षित करत. दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, सुनील दत्त, मनोजकुमार, राजकुमार याच्यानंतर राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र यांचे जुने चित्रपट नंतरच्या पिढीला पाहण्याचे अतिशय मोठं साधन म्हणजे ‘मॅटिनी शो’ होतं आणि तुम्हाला जुना चित्रपट पाहायला मिळणार तर त्याचे तिकीट दर कमीच असणार हा जणू त्या काळातला अलिखित नियम होता. म्हणजे स्टॉल एक रुपया पाच पैसे, अप्पर स्टाॅल एक रुपये पासष्ट पैसे, बाल्कनी दोन रुपये वीस पैसे असत. आज हे रुपया, दोन रुपये अगदी किरकोळ किंमत वाटत असली तर त्या काळामध्ये मुठीत ह्या एवढ्या पैशाची नाणी पकडून ती तिकीट विंडोमध्ये ठेवून मग ते बुकिंग क्लार्क मोजून घेऊन मग तिकीट हातामध्ये सरकवायचा आणि तेच तिकीट मुठीत धरुन कधी एकदा आपल्या सीटवर जाऊन बसतोय असं व्हायचं आणि मग ह्या मॅटीनी शोमुळे एक सवय लागली, जुनी चित्रपट आता परत पहावे. विशेषतः साठच्या दशकातील सस्पेन्स पिक्चर आणि भूत पट या अशा दोन प्रकारच्या चित्रपटाना मॅटीनी शोला एक खास ऑडियन्स असायचा. त्यात ‘ तिसरी मंदिर’, ‘ ज्वेल थीफ’ हे विजय आनंदचे चित्रपट आणि भूतपट बघायला गेलं तर ‘बीस साल बाद’, ‘ कोहरा’, ‘ महल’ यांना चांगला प्रतिसाद मिळायचा.(National Cinema Day)

तेच मॅटिनी शो चे युग आज पुन्हा एकदा यायला हवं असं मला अलीकडे कधी वाटलं माहितीये? देव आनंदच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्ताने पीव्हीआर आयनॉक्स मल्टिप्लेक्सने देशभरातील अनेक शहरांत दोन दिवस देव आनंदच्या चित्रपटाचा महोत्सव आयोजित केला होता. विजय आनंद दिग्दर्शित ज्वेल थीफ, जाॅनी मेरा नाम आणि गाईड तसेच राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’ चार चित्रपटांना त्या दोन दिवसांमध्ये रसिकांचा अक्षरश: उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे मागील पिढी आणि आजची पिढी अशा दोन्ही पिढीच्या रसिकांनी देव आनंदच्या ह्या चित्रपटांचे केलेले स्वागत चित्रपट अनुभवले. मी स्वतः जुहू पीव्हीआरला “गाईड” चित्रपटाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यायला गेलो. मी सर्वप्रथम गाईड सत्तरच्या दशकात खोताची वाडीत गल्ली चित्रपटात पाह्यला. त्यानंतर तो अनेकदा तरी मॅटिनी शोला पाहिला. मग तो मी उपग्रह वाहिनीवर पाहिला कधी व्हिडिओवर पाहिला. असा सतत अनेकदा पाहत राहिलो आणि तरीसुद्धा त्या चित्रपटाबद्दलची माझी ओढ कायम होती आणि या वेळेला मी पाहिलेल्या “गाईड”च्या शोला वहिदा रहमान खास उपस्थित होत्या.

त्यांनाही हा चित्रपट कधी बरे सुरु होतो आहे याची उत्सुकता होती. त्यांना भाषण करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी भाषण थोडक्यात आटोपल् आणि चला आपण सिनेमा बघू असं म्हटलं. मध्यंतरामध्ये आम्ही काही चित्रपट रसिकांनी विशेषतः देव आनंद भक्तांनी वहिदाजींची भेट घेतली आणि विशेष म्हणजे आजच्या सेल्फीच्या काळात मी वहिदांजीची स्वाक्षरी घेतली. चित्रपटाला जो रिस्पॉन्स मी बघितला, अबब अद्भूत. जवळपास प्रत्येक गाणे आणि अतिशय बोलक्या प्रभावी अशा संवादाला टाळ्यांचा टाळ्या मिळाल्या. आणि तेव्हाच मला वाटलं की आजही जुने चित्रपट मल्टिप्लेक्सच्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपट रसिक उत्सुक आहेत. जे एकेकाळी मॅटिनी शोचे कल्चर होतं आणि ग्लॅमर होतं, तसं ग्लॅमर पुन्हा एकदा असं येऊ शकतं. मल्टिप्लेक्समधला एक स्क्रीन मॅटिनी शोचा स्क्रीन म्हणून गणला जावा आणि तिथे असे कितीतरी जुने चित्रपट प्रदर्शित व्हावेत. मला विश्वास वाटतो फिल्म दीवानै उत्फूर्त प्रतिसाद देतील.

=========

हे देखील वाचा : विनोद खन्नाच्या कारकिर्दीतला ‘हा’ सर्वोत्तम चित्रपट

=========

आता जुन्या चित्रपटाची जर व्याख्या करायची झाली तर २००० साली आलेला ‘कहो ना प्यार क्या, ‘रिफ्यूजी ‘, २००१ साली आलेले “लगान”, ” दिल चाहता है” हे सुद्धा आता जुन्या चित्रपटांमध्येच गणले जात आहेत. आता डिजिटल मीडियाच्या काळामध्ये हे सगळे चित्रपट, त्या संदर्भातली माहिती गुगलवर असली तरी प्रत्यक्षात “पडद्यावरचा चित्रपट” हा लाईव्ह अनुभव. मॅटिनी शोसाठी जुन्या चित्रपटांचा खूप मोठा साठा मल्टिप्लेक्सना मिळू शकतो. म्हणजे आता साठ, सत्तर, ऐंशी, नव्वदचे दशक तर झालं त्याचप्रमाणे २००५ सालापर्यंतचे चित्रपट जुने म्हणून ओळखले जातात. ते एका शोसाठी प्रदर्शित केले आणि एक आठवड्याचा त्याचा मुक्काम ठेवला तर आजची पिढी हे चित्रपट नक्कीच पाहिल. आपल्या चित्रपट वेड्या देशांमध्ये इतिहासामध्ये डोकावणे, पूर्वी काय घडलं होतं याबद्दलची जागरुकता आणि ज्या चित्रपटाबद्दल आपण वारंवार ऐकतो, गाणी आपल्याला मिळतात. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये जुन्या गाण्याला मिळत असलेले स्थान ही सगळी केमिस्ट्री बघता जुने चित्रपट पाहण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहे हे मात्र नक्कीच. जुने ते सोने असे म्हणतात तो नियम चित्रपटांना जास्त लागू पडतोय.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Cinema Cinema Day National Cinema Day
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.