‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
..असा बनला सिगरेट विकणारा ‘हिरो’
आपण इंस्टाग्रामवर जगगू दादा उर्फ जॅकी श्रॉफचे रेसिपीचे मजेदार रिल्स पाहिलेच असतील. त्याने स्वतःच्या वेगळ्या टपोरी स्टाईलने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यात टायगर श्रॉफचा बाप म्हणून वेगळा भाव खातो ते वेगळंच ! पण आताची जी प्रसिद्धी मिळतेय ती एका रात्रीत आलेली नाही त्यासाठी खूप खडतर परिस्थितीत त्याने दिवस काढले आहेत आणि त्याला जोड होती अपार मेहनतीची. (Jackie Shroff)
जॅकी श्रॉफची सुरुवातीची परिस्थिती खूपच हलाखीची होती. तो आपल्या आईसोबत एका चाळीत राहत असे आणि पैसे मिळवण्यासाठी तो रस्त्यांवर चारमिनार सिगारेट्स विकत असे, एके दिवशी कोणीतरी त्याला सांगितले की, आपले फोटो काढून घेतात आणि त्याचे पैसे मिळतात. तिथून जॅकी श्रॉफच्या मॉडेलिंग करियरची सुरुवात झाली. देव आनंद ‘स्वामी दादा’ या आपल्या फिल्मची स्टारकास्ट फायनल करण्याच्या प्रोसेसमध्ये होते.(Jackie Shroff)
एके दिवशी ते रस्त्यावरून जात असताना सिग्नलला सिगारेट्स विकणाऱ्या जॅकी श्रॉफने त्यांची नजर वेधून घेतली आणि देव साहेबांना त्याच्या डोळ्यात वेगळेच पोटेन्शियल भासले आणि त्यांना तिथे या मुलाला आपल्या सिनेमात घ्यावे अशी दाट इच्छा झाली पण तिथून त्यांना ट्राफिक सुटल्यामुळे निघावे लागले. पण नशिबाने जॅकी श्रॉफ दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये आपले फोटो द्यायला गेलं आणि देव साहेबांची नजर परत त्याच्यावरती पडली आणि त्यांनी त्याला त्या क्षणी स्वामी दादा साठी फायनल करून टाकले. ही फिल्म कधी आली आणि कधी गेली कुणालाच कळालं नाही कारण देव साहेब फिल्म प्रमोशन हे कन्स्पेट फॉलो करत नव्हते. त्या सिनेमात जॅकी श्रॉफचा रोल एका हत्याराचा आणि तो पण अवघा १० मिनिटांचा होता.
एकीकडे सुभाष घई यांचे कर्ज आणि क्रोधी असे दोन चित्रपट सपाटून आपटले होते. ‘कर्ज’ त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तोच जेव्हा फ्लॉप झाला तेव्हा ते सावध झाले. ते खूप दिवसांपासून ‘संगीत’ नावाच्या स्क्रिप्ट वरती काम करत होते आणि त्यांना त्यात संजय दत्त याला घेऊन काम करायचे होते. संजय दत्त त्यावेळी ड्रग ऍडिक्ट होता. त्यांनी कमल हसन यांच्याकडे मोर्चा वळवला. ‘एक दुजे के लिये’ सुपरहिट ठरल्यामुळे कमल हसन खूप बिझी होता. मग त्यांनी ‘मुक्ता आर्टस’ केली आणि त्याद्वारे नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ‘संगीत’ बनवायचे ठरवले.(Jackie Shroff)
नवीन चेहऱ्याचा शोध सुरु असताना त्यांची नजर रफ अँड टफ लूक असलेल्या जॅकी वरती पडली. त्यांना त्याच्यात आपला हिरो दिसला. जॅकीला त्यांनी ऑफिसला बोलवले तेव्हा तो दाढी करून क्लीन शेव्ह करून नीटनेटका पोहचला तेव्हा सुभाष घई याणी ओळखलेच नाही. पुढे जॅकीची कॅमेरासोबत टेस्ट झाली आणि त्याला एक्टिंग करता येत नाही असे त्यांना कळले.
सुभाष घई यांनी त्याला एक्टिंग शिकवायला सुरुवात केली. जॅकीवरती देव आनंदचा प्रभाव दिसून येत होता आणि त्यांनी मग जॅकीला ऍडव्हाइस दिली की हा रोल शत्रूघन सिन्हाच्या झोनमधील आहे तू त्यांच्यासारखी एक्टिंग करायचा प्रयत्न कर. मीनाक्षी शेषाद्री तिला मिस इंडियाचा टायटल मिळालया नंतर मनोज कुमार यांच्या भावासोबत फिल्म केली होती जी फ्लॉप झाली होती. या अपयशाने ती इंडस्ट्री सोडण्याच्या इराद्यात होती. सुभाष घईनी तिला कथा ऐकवली कारण तिचा चेहरा नवीन होता. पुढे फिल्म हिट झाली, गाण्यांनी अमाप प्रसिद्धी मिळवली. मीनाक्षीचे जे एक फिल्मचे करियर होणार होते ते पुढे १५ वर्षे या फिल्मच्या हिट होण्यामुळे खेचले गेले.(Jackie Shroff)
===========
हे देखील वाचा : रसिकांच्या मनात घर करून राहिलेली ‘कथा’
===========
आता ज्या ब्रँड प्लेसमेंट कन्सेप्टचा बोलबाला आहे तेव्हा या फिल्ममधे सुभाष घई यांनी ब्रँड प्लेसमेंट नावाची कन्सेप्ट सुरु केली होती. त्यांनी राजदूत ३५० या बाईकला हिरोची बाइक म्हणून इंट्रोड्यूस केली होती. नंतर जॅकी श्रॉफ रियल लाइफमध्ये पण बाइकवरून शूट साठी येत जात. लोकांना त्यांचे फार आश्चर्य वाटे.