‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एक मुस्लिम नारी सगळ्या परंपरांवर भारी !
७०-८०च्या दशकात जो फिल्म्समध्ये आणि समाजात एक प्रकारचा संकुचितपणा होता तो एका ट्रॅडिशनल मुस्लिम कुटुंबातील आलेल्या मुलीने वेगवगेळ्या स्तरांवर तोडत बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नावाचा एक नवीन ब्रँड तयार केला. ती म्हणजे झीनत अमान ! मूळची झीनत खान (Zeenat Aman) मुंबईत जन्मलेली आणि तिथेच शिक्षण झालेल्या झीनतचे वडील अमानुल्ला हे बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून काम करायचे. झीनत १३ वर्षांची असताना त्यांचे निधन झाले आणि मग झीनतला तिच्या तिच्या आईने योग्य रीतीने वाढवले तसेच जर्नलिझमच्या शिक्षणाला अमेरिकेत पाठवले.
अमेरिकेतून आल्यावर झीनतने जर्नालिझम सुरु केले. मूळचीच सुंदर असलेल्या झीनतला तिच्या मित्रांनी मॉडेलिंगसाठी प्रोत्साहित केले. त्याकाळी पॉण्ड्सच्या जाहिरातीत त्या झळकल्या होत्या. नंतर त्या १९७० मध्ये ‘मिस आशिया-पॅसिफिक’ हे टायटल जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय देखील बनल्या. झीनत अमान या देव आनंद यांची खोज आहे असे मानले जाते. ‘मिस आशिया पॅसिफिक’ नंतरही त्या जर्नालिझम करत होत्या पण देव आनंदनी त्यांना फिल्म्स यामध्ये काम करायला पटवले आणि इंडो-फिलपीन्स प्रॉडक्शनच्या ‘एव्हिल विदिन’ या फिल्ममध्ये त्यांनी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले पण हिंदी सिनेमांमध्ये त्या ओ.पी. रलहान यांच्या ‘हलचल’ मधून त्यांनी एंट्री केली.
पुढे देव आनंद यांनी त्यांना ‘हरे रामा हरे कृष्णा’ या फिल्मसाठी त्यांची एका सपोर्टींग रोलसाठी निवड केली. त्यावेळची टॉपची हिरोईन मुमताज सुद्धा त्यात होती. या फिल्मच्या शूटनंतर झीनतच्या सावत्र वडिलांची पोस्टिंग माल्टाला झाली होती आणि ती तिकडे शिफ्ट होण्याच्या तयारीत होती पण ऐन वेळी देव आनंदनी त्यांना फिल्म रिलीज होईपर्यंत थांबवले. फिल्म हिट झाली आणि झीनत अमानच्या बोल्ड इमेजचा असा काही जलवा चालला की, मुमताज त्यात झाकोळली गेली. झीनत अमानला (Zeenat Aman) त्या सालचा बेस्ट सपोर्टींग एक्टरेसचा फिल्मफेअर अवॊर्ड मिळाला.
भारतीय प्रेक्षकांनी एका बोल्ड इमेजच्या अभिनेत्रीला स्विकारण्याची ही पहिली वेळ होती. त्यांनी त्याकाळची ट्रेंडिंग पफवाली हेअर स्टाइल नाकारली, त्या खूप कमी वेळा बिंदी आणि साडीमध्ये दिसल्या, त्यांनी बिकिनी खूप स्टायलिस्टिकली कॅरी केली, त्यांच्या बऱ्याच भूमिका करियर करता यावे म्हणून ऍबॉर्शन करणाऱ्या किंवा पैशासाठी श्रीमंत माणसासोबत लग्न करणाऱ्या तसेच हिरोला स्वतःहून गाण्यातून ओपनली अप्रोच करणाऱ्या महिलांच्या होत्या. त्या भारतीय चित्रपट विश्वातील पहिल्या हिरोईन होत्या ज्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या फिल्ममधे स्क्रीनवर हिरोला किस केले आणि तरीही त्यांना त्या सालचा बेस्ट ऐक्ट्रेसचे नॉमिनेशन मिळाले. ‘इन्साफ का तराजू’ मध्ये त्यांच्यावरील चित्रित झालेला रेप सिन खूप कॉंट्रोव्हर्शिअल ठरला होता. त्यात त्यांनी रेप सर्वायव्हर जी न्यायासाठी लढते अशा पद्धतीचा रोल केला होता.
एक काळ असा होता की, त्यांनी बऱ्याच फिल्म देव आनंद सोबत केल्या होत्या. देव आनंदसोबत त्यांचे नाव जोडले जाऊ लागले होते. ५० वर्षांच्या देव आनंदनी २५ वर्षाच्या झीनत अमानला ताज हॉटेलमध्ये प्रपोज करण्याचे ठरवले होते पण त्याच ठिकाणी राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदर’ या फिल्मची लॉन्चिंग पार्टी ठेवली. त्यात राज कपूर सोबत नाचणाऱ्या झीनतला पाहून देव आनंदचे सर्व मनसुबे मनसुबेच राहिले.(Zeenat Aman)
पुढे अब्दुल्ला मध्ये संजय खान सोबत झीनतचे सूट जुळले. संजय खान त्यावेळी ऑलरेडी विवाहित होते पण तरीही या फिल्मच्या शुटवेळी त्यांनी चोरीछुपे रजिस्टर २ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न केले. काही दिवसातच या नात्याचा अंत झाला. झाले असे कि, अब्दुल्ला मधील एक गाण्याचे शूट पुन्हा करावे लागणार होते पण त्यावेळी झीनत लोणावळ्यात शूट करत होत्या. शूटसाठी त्यांनी झीनतला फोन केला पण त्या फोनवर येऊ शकल्या नाहीत.
संजय खानला या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी पुन्हा जेव्हा झीनतने फोन केला तेव्हा खूप शिव्या घातल्या. हे भांडण समोरासमोर सोडवण्यासाठी त्या संजय खानच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका कौटुंबिक पार्टीमध्ये जेव्हा पोहचल्या तेव्हा संजय खान आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना एका खोलीत कोंडून जबरदस्त मारहाण केली. ज्यामुळे त्या ८ महिने हॉस्पिटलायस्ड झाल्या आणि त्या दरम्यान त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. हा सर्व प्रकार ‘सिनेब्लिट्झ’ मासिकातून प्रकाशित झाला आणि खूप मोठा गोंधळ उडाला होता.
=========
हे देखील वाचा : भीमसेन जोशी यांनी अधिकचे पैसे घ्यायला दिला
==========
पुढे त्यांच्या जीवनात मजहर खान आला. मजहर खान यांनी ‘शान’ या फिल्ममधील अब्दुल्ला नावाचे पात्र साकारले होते. त्यांची त्याआधी २ लग्ने झाली होती. मजहर पासून झीनतला २ मुले झाली. मजहर यांचे १९९८ साली मूत्राशयाच्या कर्करोगाने निधन झाले. यानंतर खूप काळ झीनत यांच्या आयुष्यात कोणीच नाही आले. २०१८ साली ५९ वयाच्या झीनत अमान यांनी ३३ वर्षांच्या अमन खन्ना सोबत त्यांच्या लग्नाची खबर आली. अमनने त्यांच्यासाठी धर्मपरिवर्तन केले आणि तो सर्फराज झाला. पण हे देखील नातं जास्त काळ टिकले नाही. अमनवरती झीनतने रेप आणि मारहाणीचा आरोप केला आणि अमन २ वर्षांसाठी तुरुंगात गेला. पण नंतर दोघांच्या लग्नाचे पुरावे अमनने कोर्टात सादर केले आणि दोघांनी यावरती पडदा टाकला. अशाप्रकारे त्याकाळच्या एका स्त्रीबद्दलच्या सर्व क्रायटेरियांना छेदत ही कट्टर परंपरावादी मुस्लिम कुटुंबात वाढलेली मुलगी त्यांच्यावर भारी पडली.