दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभ बच्चन यांचा बंगाली सिनेमा ‘अनुसंधान’ पाहिलात का?
बॉलीवूडमधील काही घटना तशा छोट्या असतात पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो अमिताभ बच्चन (Amitabh) यांनी एका बंगाली चित्रपटात काम केले होते. ऐंशीच्या दशकातील ही तशी खूप छोटीशी घटना फारशी मीडियामध्ये चर्चिल्या देखील न गेलेली. पण हा चित्रपट बंगालमधील एक cult क्लासिक सिनेमा बनला आणि आज देखील बंगालमधील सुपरहिट सिनेमांमध्ये याचे नाव घेतले जाते. अमिताभने अलीकडे आपल्या ब्लॉगमध्ये या सिनेमाला ४२ वर्ष झाली म्हणून त्याबद्दल लिहिले होते. तेव्हा पुन्हा या सिनेमाची चर्चा सुरु झाली. आपल्या मराठी प्रेक्षकांना ही कदाचित अनटोल्ड स्टोरी असावी. कोणता होता हा बंगाली चित्रपट? ज्यात अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
हा चित्रपट १९८१ साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा दिग्दर्शित केला होता शक्ती सामंत यांनी. चित्रपटाचे नाव होतं ‘अनुसंधान’. हा सिनेमा म्हणजे आपल्या ‘बरसात की एक रात’ चा बंगाली व्हर्शन होता. डबिंगच्या वेळी अमिताभ आणि अमजद खान बऱ्यापैकी वैतागले होते ! नंतर बऱ्याच वर्षांनी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून या सिनेमाच्या आठवणी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. अमिताभसाठी १९८१ हे वर्ष सुपर हिट सिनेमांचे होते. या वर्षी याराना, बरसात की एक रात, नसीब, सिलसिला,कालिया, लावारिस या सोबतच दोन हिंदी चित्रपटात (कमांडर आणि चष्मेबद्दूर) अमिताभ बच्चन कॅमिओ अपिअरन्स यांचा होता. याशिवाय याशिवाय ‘बरसात की एक रात’ चा बंगाली अवतार ‘अनुसंधान’ याच वर्षी प्रदर्शित झाला होता. ‘बरसात की एक रात’ हा सिनेमा हिंदीमध्ये फारसा काही चालला नाही. पण बंगाली भाषेमधील ‘अनुसंधान’ या सिनेमाने अफाट यश मिळवले. अमिताभ आणि अमजद खान यांनी सफाईदारपणे बंगाली बोलण्याचे खूप कौतुक झाले. या बंगाली ‘अनुसंधान’ या सिनेमाची युट्युब लिंक मी खाली दिली आहे. अमिताभ प्रेमी/अभ्यासकांनी जरूर हा चित्रपट पहावा. अमिताभला थोडीफार बंगाली भाषा येत होती. पण अमजद खानसाठी मात्र मोठा प्रश्न होता. पण त्याने मेहनतीने ही भाषा शिकून घेतली आणि हा बंगाली सिनेमा आपल्याला पाहताना कुठेही काहीही खटकत नाही ! (Amitabh)
हा सिनेमा अमिताभ बच्चन (Amitabh) यांनी कसा स्वीकारला याचा एक मस्त किस्सा आहे. जेव्हा दिग्दर्शक शक्ती सामंत या चित्रपटाची निर्मिती करत होते; त्यावेळी हा चित्रपट आपण बंगाली भाषेत देखील निर्माण करावा असे त्यांना वाटले. आधी वेगळी स्टार कास्ट घ्यावी असे वाटले पण नंतर याच स्टार कास्टला रिपीट करावे असे त्यांनी ठरवले. हा चित्रपट तुम्ही बंगाली मध्ये डब करताना वेगळा व्हाईस ओव्हर वापरा असा देखील सल्ला दिला पण तो सल्ला दिग्दर्शक शक्ती सावंत यांनी आवडला नाही. अमिताभ बच्चन (Amitabh) यांच्याकडे जेव्हा बंगाली सिनेमा डबिंग चे प्रपोजल घेऊन शक्तीदा गेले तेव्हा अमिताभ ने नम्र नकार दिला.
===========
हे देखील वाचा : आर के फिल्मच्या ‘हिना’ ची नायिका झेबा आता करते तरी काय?
===========
पण शक्ती सामंत म्हणाले,”तुमची बायको बंगाली असताना तुम्हाला काय अडचण आहे ? तुमचं काही काळ वास्तव्य देखील कलकत्त्यामध्ये होतं. हा चित्रपट केल्यानंतर तुमच्या सासरवाडीची मंडळी खुश होऊन जातील !” असं म्हटल्यानंतर मात्र अमिताभ बच्चन (Amitabh) यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी चित्रपट केला. या सिनेमातत उत्पल दत्त ,अभि भट्टाचार्य, निमू भौमिक, असीत सेन यांच्या देखील भूमिका होत्या. हे सर्व जन बंगाली भाषिक होते. या ‘बरसात की एक रात’ चित्रपटाचे संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते तेच संगीतकार बंगालीमध्ये देखील कायम होते. फक्त गीतकार हिंदीमध्ये आनंद बक्षी होते आणि बंगालीमध्ये गौरी प्रसन्न मुजुमदार होते हे दोन्ही सिनेमे युट्युब वर निशुल्क उपलब्ध आहेत. अमिताभ बच्चन यांचा बंगाली परफॉर्मन्स पाहायचा असेल तर हा सिनेमा नक्की पाहायलाच पाहिजे. या सिनेमातील ‘अपने प्यार के सपने सच हुए’ हे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे गीत त्या काळात खूप गाजले होते. दार्जीलिंग परिसरातील चित्रीकरण डोळ्याला आजही सुखद अनुभव देते चित्रपटाचे कथानक यांचे होते.